सोबत काय असावे ?….

आयुष्य कस आहे आणि कस जगावं हे विचारांंवर ठरतं. जीवन प्रवाही आहे परंतु हा प्रवाह कोणत्या दिशेने ? याला बऱ्याच गोष्टी सहभागी असतात नक्की जसे जडणघडण, भेटणारी माणसे, आलेले अनुभव असा आपण विचार करतो. परंतु यापेक्षाही मूल मानवी विकासातील टप्पे तसेच स्वतःला विविध आघाड्यांवर सिद्ध होण्याची हाव. हावच म्हणावे लागेल कारण ध्येय झाले आणि समाधान अवस्था मिळाली अस सहसा कधी होत नाही. प्राप्तीपेक्षा तो प्रवास कोणत्या भावनेने केला हे महत्त्वाचे आहे,
कधी लक्षात येईल तेव्हा खऱ्या अर्थाने समाधान मिळत आहे असे म्हणता येईल. हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी वृत्ती समजून घेता यायला हवी. आपण सहसा पाहतो एखाद्या व्यक्तीला जीवनात सुरुवातीला पोषणाची चिंता असते म्हणून आधी भाकरी साठी सगळा सायास करतो. यावेळी काहीजण जगाचा , नैतिक, अनैतिकतेचा विचार करत नाही फक्त असते ती भुक. यासाठी काहीही… ह्या अवस्थेत मानवी मूल्य बाबतीत फार काही विचार नसतात. पण ती मिळाली तरी थांबतो का ? नाही ! मग इतर गोष्टी जसे घर, आवश्यक कपडा , वस्तू यांचा संग्रह कुवतीनुसार. तरीही असा विचार येत नाही. आपण समाधानी आहोत का ? ईश्वर, भक्ती, वगैरे सारख्या काही गोष्टींना महत्त्व देण्याची सुरूवात होते.  काही जणांच्या बाबतीत फार वास्तववादी नसतं, स्वार्थी आणि कधी भिती पोटी असतं. अडकून रहातात तिथेच..हळूहळू आर्थिक सुबत्ता आली की..परत मग धनसंचय, शानशौक, आवडीनिवडीला वावचवाव…..इथेच सावध होण्याची आवश्यकता. खरी जाणीव होण्याची आहे..नंतर परत पहिल्या टप्प्या सारखी ..मानवी मुल्यांचे अवमुल्यन करणारी अवस्था यायची भिती ..म्हणजे जग, लोकसेवा वगैरे
जाणीवा बोथट झालेल्या असतात. हळूहळू या गरजा आवडीनिवडी, वस्तूंचा संग्रह झाला की मग येते ती अनैतिक श्रीमंतीची हाव, प्रसिद्ध होण्यासाठी केलेली हुजरेगिरी यासाठी व्यक्ती कोणत्याही पातळीवर जाण्याची शक्यता असते…इथे सर्व जाणीवा, भावना बोथट नाही तर संपुनच जातात, मग काहीही दाव लावले जातात. माणूस, माणूस रहात नाही. कारण ती अतिमहत्वाकांक्षाच आयुष्य उद्ध्वस्त करते आपल्या माणसाला दूर करते .फक्त भौतिक दृष्टीने यशस्वी होतात ही माणस. मग नंतर सुरू होतो तो म्हणजे, परत उलट प्रवास. सर्व मिळूनही काय हव असत त्याला परत समाधानच न् ! मग सुरूवात आणि शेवट म्हणजे गरजा पासून इच्छा पर्यंत कोणताही टप्पा असो अवस्था असो किंवा परिस्थिती असो ही जीवनमूल्ये जोपासली तर सर्वच स्तर सुखी होतील…पण सहसा अस घडत नाही याला कारण मानवी अवास्तव इच्छा ! 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

9 thoughts on “सोबत काय असावे ?….”