गवताचं पातं

गवताचं पातं..   बरे झाले जरा खाली जमिनीवर बसले मी… नजरेत प्रसन्न सगळी गवताची पाती होती … चार बाजूंनी डोंगर अन् लागून खाई… तरी निश्चींत, एकांत अन् अभेद्य शांताई… इथे घुमतात फक्त आता आवाज मनीचे… तुम्ही ऐकली ती केवळ कर्मसाद होती… इथे क्षणात विरतात  सारेच बुडबुडे… जे तिथे वरवर भ्रमात […]

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

  ममै वांशो जीवलोके जीवभूत: सनातन:। साक्षात परमेश्वरानेच माणसाला त्याचा अंश मानलेले आहे म्हणून इथली संस्कृतीही त्याचीच आहे. ती मानवाला म्हणजेच समाजाला निरंतर उन्नत, स्थिर राहण्याचे मार्गदर्शन करते.  आपणही आपल्याला ईश्वर शक्तीचा अंश मानून दृढ विश्वासाने त्या मार्गावर राहिले पाहिजे. या संस्कृतीच्या महान मार्गाच्या विचार सूत्रांचे पुढे प्रतिकांमध्ये रुपांतर झाले.  […]

आजीच्या आठवणी…

    आजीच्या आठवणी १)आषाढी एकादशी देवा विठ्ठलानं केली रूकमिनं वागाट्याला गेली तिनं सवळ्याची वटी केली ( वागाटे नावाची एक  रानावनातील फळभाजी जी आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागात खातात.) २) रूसली बाई रुकमिना विठ्ठला शेजारी बसना ! तिला गरदी सोसंना… भोळ्याभाळ्या भक्तांची तिला गरदी  सोसंना! रूसली बाई रुकमिनी जाऊनी […]

माहित आहे का !

तिला ओळखता का! आता जरा कुठं मिळतंय स्वातंत्र्य चिमुटभर, सत्ता मुठभर, अन् अधिकार घडाभर … तरीहीआश्रित,शोषित,पिडीत, जन्मापूर्वीच मरण मनात मात्र प्रश्न ढीगभर! माहिती आहेत का ! खरं सांगा न् माहिती आहे का! आणि माहिती असेलच तर जाणीव आहे का! दररोज एक पाऊल सोबत चालताना…. स्वतःला सिद्ध करताना एक पाऊल पुढे […]

गुरुपौर्णिमा…

आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा, व्यासपौर्णिमा असे म्हटले जाते. व्यासांचे नाव कृष्णद्वैपायन असे होते. त्यांनी वेदांचे संकलन, संपादन करून चार वेदांमध्ये विभागणी केली. त्यामुळे त्यांना व्यास असे नाव पडले. व्यासांच्या या कार्यामुळे वेदांचे अध्ययन सोपे झाले. यासाठी व्यासांनी साऱ्या भारतभर भ्रमण केले शहरे, गाव, पाडे,वस्त्या जिथे जिथे मिळतील तिथून वेद संहिता […]

कृष्णाई…

      पौराणिक, ऐतिहासिक, समृद्ध नैसर्गिक आणि तिर्थाटन – पर्यटनाच्या दृष्टीने जगभर नावाजलेलं असं विलोभनिय क्षेत्र, महाबळेश्वर. अनेक पूरातन मंदिरांचा वारसा असणाऱ्या या भागात १९५८ साली उत्खननात एक मंदिर आढळले. हे मंदिराचे ठिकाण अगदी उंच पर्वताच्या माथ्यावर आहे. चहुबाजूंनी विशाल वृक्षांची सावली त्याच्या मध्यभागी मंदिर स्थान. आजूबाजूला उंच पर्वतरांगानी […]

जे दिसते ते असेच का!

जे दिसते ते असेच का? हे उलगडण्याला शिका! प्रत्येक गोष्ट का घडते? प्रत्येक गोष्टी मागचे कारणं समजून घ्यायचा प्रयत्न तो लहानपणापासून करत असे. त्याचा हा खूप चांगला गुण होता. या प्रश्नांच्या उत्तरातून तो बहुतेक इतिहास घडवणार होता. त्यांची प्रश्न जर त्याने स्वतः, इतरांनी टाळली असती तर! त्याच्या मनातील शंका तशाच […]

लक्झरी लाईफ..

कुछ न होके भी सब बन बैठ। सब बन के भी कुछ न हो बैठ। मागे लक्झरी लाईफ विषयी एक छान पोस्ट आली.. वाचली आणि मनात विचार सुरु झाले… आपण भारतात रहाणारे मग या इंग्रजी शब्दानुसार मुळात आपल्या जीवनशैलीचे अर्थ का काढत बसतो?… प्रत्येक देशातील भाषेत तिथली संस्कृती, लोकजीवन,समाजमन विरघळलेले […]

या जगण्यावर शतदा असही प्रेम करावं…

या जगण्यावर शतदा असही प्रेम करावं…अवघड कठीण असं माणसात काहीच नसतं ! शेवटी आपण माणसचं कोणी खरचं चुकणारं असतं….कोणी मुद्दाम चुकवणारं असतं…उगी नकळत मनाला मात्र चुकचुकल्यासारखं वाटंत रहातं.. कधी कोणी समजावल्यासारखं करतं… कुणी समजून घेतल्यासारखे करतं.. सगळं समजून उमजून कोणी शांत रहातं…कधी माणसं सहभागी करायला कुणाकडे जागा नसते ….कधी जागा […]

“अधी हि भगवो ब्रह्मेती”….

अधी हि भगवो ब्रम्हेती”! वैभव संपन्न होणे म्हणजे काय! निसर्गाचे वैभव, अन्नाचे वैभव, भावनेचे वैभव, ईश्वर म्हणजे वैभव, मग या सर्वांना जीवनातून वजा करून कसे चालेल! समजा उद्या आपल्या घरी एखादा ग्रेट! खूप मोठा माणूस आला… सोबत पोलीस येणार! आपली, घराची, गल्लीची,गावाची चौकीदारी सुरू होणार! आपली ऐपत नसली तरी लोकचं […]