कशासाठी ? अट्टाहास….
खूप विशेष विशेष बनण्याच्या अट्टाहासात आपण शेष राहिलो आहोत का? साधारण आणखी अतिसाधारण गोष्टी शोधत गेलं की असाधारण असंच काहीतरी नक्कीच सापडणार ! ते शोधता आलं पाहिजे.बालपणी काडेपेटीची चित्रे, शिंपले, नदीतले गोटे, जाळी पडल्यावर छान दिसते ते पिंपळपान, मोरपीसं, वृत्त पत्रातील गाड्यांची चित्र वगैरे वगैरे….ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे….पण एकही वस्तू विकत न घेता केलेला संग्रह…किती कौतुक, एक एक गोष्ट मिळवण्यासाठीचा प्रयत्न, तो प्रवास सुखाचा, अनुभवताना होणारा आनंद….हा आनंद टिकवणारेच निरलसं, निरागस आणि निर्लेप ….निखळ मनाचे….. हे सगळं प्रवासात पुढे जातांना मागे का रहातं? संग्रह कितीतरी प्रकारे आणि कशाचाही करता येतोच की…वयानुसार, समजंनुसार, कुवतीप्रमाणे….दररोजच्या छोट्या छोट्या गोष्टींचाच संग्रह समाधान देत असतो. आनंद घेता आणि देता आला पाहिजे. रोजचं खूप मोठ, भव्यदिव्य वगैरे घडत नसत…. म्हणून घड्याळ्याचा काटाचं बनायला हवं का ? शिस्तीतच विचार केला की… बेशिस्तीतलं बे म्हणजे कधी कधी दुप्पट असा अर्थ असतो. हा विचार मनात येत नाही… एखाद्याचा आनंद दुप्पट करणं असतं. बे दुणे चार करावे कधी कधी !…. प्रत्येकासाठी हा आनंदविषय वेगळा असतो, जपला पाहिजे. जिविका आणि उपजिविका एक होण्यासाठी फार भाग्य लागतं. नाही लाभलं ते मला ! म्हणून कोशातच रहायचं का ? उपजिवीकेचं साधन बनवता आलं पाहिजे इतके ते संग्रही बनवता आलं पाहिजे. कधी आपण हतबल होऊ शकतो. व्यवस्था बदलता येत नसतात म्हणून स्वतःला पुर्णच बदलायच का ? सरड्याप्रमाणे रंग बदलण्यापेक्षा मांजरीसारखं कसही फेकलं, कुठूनही उडी मारली तरी चार पायावर उभ रहाणे केव्हाही चांगले.आपण कोशात इतके गुरफटून जातो की, अस काही आयुष्य असतं हे मान्यच होत नाही आपल्याला. धारणा इतक्या पक्क्या करून घेतो की आपली भुमिका म्हणजे आपणच होऊन जातो . त्याच चष्म्यातून सगळं पहायला लागतो या भुमिका म्हणजे आपण असतो का ? प्रामाणिकपणे खरचं ! एकच प्रश्न स्वतःला विचारावा मी काय केल म्हणजे स्वतःला आनंदी ठेवणार ? फार अवघड आणि अशक्य गोष्टी नसतात फक्त आपण दुर्लक्ष करत असतो. भुमिका निभावत असताना नकळत संपवत असतो का स्वतःला. या भुमिकांच्या आड एक लपलेले छोटेखानी विश्व असते. हे विश्व जपलं की कोणत्याही भुमिकेचा अट्टाहास रहात नाही. ही भुमिका चांगल्याप्रकारे निभवण्यासाठी मिळणारे ऊर्जा स्त्रोत म्हणजे ही उपजीविका असते. आपण उगीचच त्याला गप्प बसायला लावतो ! म्हणजे हे शोभतय का आता ? अस कुठ असतं का वगैरे ? छोट्या छोट्या गोष्टींमधल्या आनंदाला मुकतो.
एखाद्या चित्रपटात जस नायक, नायिकेचे दूसर रूप आरश्यातून, तर कधी खिडकीतून फक्त त्यांनाच दिसतं समोर आणि काय काय सांगत असतं ! हे चूक,हे बरोबर, अपमान, पश्चाताप, माफी, बदला, सुड … इत्यादी इत्यादी…आता तु अस करचं, स्वप्रेरणा देतं असतं इंग्रजी मध्ये सेल्फ रियलायझेशन् काय म्हणतात ते ! “जा सिमरन जी ले अपनी जिंदगी” वगैरे वगैरे…यातला विनोदाचा भाग सोडून देऊ. सांगण्याचा उद्देश स्वतःला ओळखून, कुठे ? काय बदल करावा ? कशाचा संग्रह ? कशासाठी ? स्वतः सोबत भोवताल आनंदी कसा करता येईल ! माझ्या आनंदात सगळ्यांना सहभागी करेन आणि सगळ्यांच्या दुःखात मात्र मी सोबत असेन मग सुरु होतो दुसऱ्यासाठीचा विचार, त्याग, कर्तव्य, मदत, कष्टाची तयारी..जाणीव जागृती , सहसंवेदना. थोडक्यात काय तर “जे दुसऱ्याकडे आहे ते माझ्याकडे असलेच पाहिजे… यापेक्षा माझ्याकडे जे जे आहे ते सगळ्यांकडे का नाही?” यासाठी शक्य तेवढे प्रयत्न अश्या सध्याच्या प्रवाहापेक्षा उलट प्रवास जेव्हा करायला लागू तेव्हा व्यक्ती ते समष्टीच्या खऱ्या प्रवासाला सुरुवात होईल. आसू आणि हासू चा संग्रह, अनुभवांचा, विचारांचा, आयुष्यात चांगल्या भेटलेल्या व्यक्तींचा संग्रह. अगदी स्वतः तटस्थ ठेवून कोणताही जगरहाटीचा नियम न लावता अशा व्यक्ती भेटणं आपलं नशीब, पण हे जपून ठेवण संग्रह कौशल्यच. जितक्या गरजा, अपेक्षा, व्यवहार जास्त तितके हे अवघड.
अवघड झाले की मग निर्माण होतात औपचारिक संबंध कामापुरता मामा आणि ताकापुरती आजी….. मुळात विसरण्याची कला अवगत झाली की पुन्हा वाहत्या पाण्याच्या झऱ्याप्रमाणे सगळं सुरळीत. कारण आपल्याकडे ज्या गोष्टींचा संग्रह आहे तेच आपण इतरांना देणार. हा संग्रह मोजकाच असला तरी चालेल पण ज्या पद्धतीने साध्यासुध्या गोष्टी घेतांना काहीजण विचार करतात तसाच (Original, branded, designer, ultimate one piece) अस्सल, शुद्ध , खास, एकमेव अस काय काय म्हणतात न् अगदी अश्याच लोकांचा संग्रह असावा अस काही नाही. हळूहळू हा प्रवास या संग्रह सहवासाने चांगला घडतच जात असतो. घडावा म्हणून प्रयत्न आपल्या हाती आहे. समजा ढीगभर गट आणि मनात मात्र तट! मग काय करायचं ? असू देत तट आपण पुढे होऊन तटबंदी पाडावी किमान प्रयत्न करून पहावा. कधी यश कधी अपयशही. तटबंदी असते अहंकाराची, स्वतः श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची, अधिकार, सत्ता, मनात काहीतरी धरून ठेवण्याची ही तटबंदी पाडण्यासाठी कधी माफी, पश्चाताप, चूक, दोन पावलं मागे जाण्याची स्वतः हून तयारी दाखवावी. असं करणं म्हणजे कमीपणा नसतो तो मनाचा मोठेपणा असतो. मोकळ्या मनाने कौतुक करता आलं पाहिजे. विसरून पुढे जाता आलं पाहिजे. ज्याचं त्यान ठरवावं आतून मनातून. एक क्षण पुरेसा असतो जाणीव व्हायला पण हा क्षण आला आहे हे समजायला मात्र दर्शबुद्धीला बंद ठेवाव लागत. मनानेच हृदयातून आलेल्या आवाजाला ऐकता आलं पाहिजे. नाहीतर मग, “एकला चलो रे !” थोड थांबा ! मागे आलो रे ! अस म्हणायची वेळ येईल आणि हा संग्रह थांबेल !
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
15 thoughts on “संग्रह कशाचा?….”
अगदी खरय
छान
खूप छान
चित्त को एकत्रित करो… बाकी सबकुछ वितरित… मनूजों का संग्रह करो… मनदोषों का विसर्जन करो…
I like it
Very nice
मस्त
Nice
👌👌
👌👌
अतिशय सुंदर विचार.निवडक सकारात्मक व आपल्या ला व इतरांनाही प्रसनता देईल असा संग्रह हवा.
Very well written and it’s true … after reading this I memories my childhood days
सुंदर
apratim lekh
खरंंच खूप छान समोर बोलतायत असंच वाटत होतं 👍🏻👌🏻👌🏻😊