बाय माझी…

 

 

बाय माझी….

बोलीभाषा मराठवाडी..

बाय माझी सुगरणं सुगरणं साताची
घरीदारी रानीवनी कष्ट तिच्या हाताची।।धृ।।
गारपाण्यानं गं वली, सारवते भुईसर
चोपडं गं अंगण, सारा परवार
घोंगडी नेटकीचं, बाजेवर गोधडी
यळ झुंझरूकाची कामं पोतराभुईची।।
राबतं गं जातं, एकलं तिच्या साथीला
रामंसीता नाते, सारे गं तिच्या ओवीला
पिवळीचं पीट बाई, आलं आज गोडीला
गाणं तिचं सांगते साऱ्या जीवाला।।
एकं नात पुढ्यात गं एक बाई पाठीशी
चढाओढ लागते,आजीच्या मयेशी
गोठ्यातून हालचाल निरशा दुधाची
ताटम्होरं काश्याचं यडी मया साईची।।
रविदोर खेचली डेर्यातल्या दह्याची
घागरीनं वतली, धारं गं पाण्याची                                जीव तिचा मऊशार, वर आल्या लोण्याशी
नातं माझं बाई किती, किती गोकुळाशी।।।                   बाय माझी सुगरणं, सुगरणं साताची
घरीदारी रानीवनी, कष्ट तिच्या हाताची…..©

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

4 thoughts on “बाय माझी…”