निसर्गातून निर्माण झालेले, निसर्गतः एकरुप असलेले आणि पुनश्च निसर्गातच सामावणारे… सर्वकाही म्हणजेच ज्ञान. हे ज्ञान विविध मार्गाने समजावून घेण्याचा आपला फक्त प्रयत्न असू शकतो. हे मार्ग कोणते ? यापैकी कोणत्याही मार्गाने अभ्यासले तरी शेवटी हे ज्ञान एकरूप आहे हे लक्षात येते. एकमेकांना परस्परविरोधी वाटणारे विज्ञान आणि अध्यात्म यामध्ये देखील एकरूपता , समानता आहे. या दोन्हींंच्या अभ्यास मार्गाने, आधारे ज्ञान होत असते. विज्ञानानेेेे माहितीचे ज्ञान तर अध्यात्माने आत्मज्ञान होते. एक कसेे जगावेे तर एक कसेे जगत आहोत याचे भान देते. म्हणजे दोन्ही मार्गदर्शक. एक अनुभवाने समजते तर एक अनुभुतीने. दोन्हीच्या अभ्यास पद्धती एकच फक्त त्यांच्या जाणिवांच्या पातळीपर्यंत पोहोचता आले की अध्यात्मातील विज्ञान समजते आणि मग विज्ञानातील अध्यात्म समजायला लागते. विज्ञान विश्लेषण करते तर अध्यात्म संश्लेषण करते. विज्ञान बाह्य व दर्श प्रमाणाने शोध घेते तर अध्यात्म आंतरिक अनुभूतीने शोध घेते. वनस्पतीची बी पासून होणारी वाढ ते सुंदर फूलेे, फळेे यांंचा अभ्यास, प्रकार, नावे, रंग, उपयोग, लागवड, शास्त्रीय नाव…. यासारख्या अनेक गोष्टींचा विचार वनस्पतीशास्त्रात होतो आणि चांगल्या प्रकारची वाढ होण्यासाठी, विविध शास्त्रोक्त पद्धतीने लागवड, रोपवाटिका कशी करता येईल हा विचार प्रत्यक्ष कृती, अनुभव म्हणजे विज्ञान. तर त्यातील जीवंतपणा, सुंगध, त्यांच्या अस्तित्वामुळे चैतन्यमय झालेला परिसर याची अनुभूती म्हणजे अध्यात्म. हेेेेे खूपच सोपे आणि दैनंदिन उदाहरण. असे अनुभव आणि अनुुभूती आली की आपणही जाणतो, विश्वासाने मानतो आणि मग या गोष्टींना जपतो यारखे अनेक अनुभव आणि अनुुुभूूती आपल्याला दैनंदिन जीवन जगत असताना येत असतात. कधी आपण जाणून घेतो, कधी कधी दुर्लक्षित होतात….
परंतु विज्ञान नैतिक, अनैतिक जाणत नाही. कारण या निर्जीव संकल्पनांना, शोधांंना हाताळणारे, दिशा देणारे हात, शक्ती मानवी असतात म्हणून या मानवी मनांना, जाणिवांना संस्कारित करणे आवश्यक आहे. नाहीतर या सर्व शक्ती अमानवी कृत्यांसाठी खर्च होऊ शकतील ! विज्ञान सेवाही करू शकते किंवा संहारही. याचसाठी विज्ञानाला मूल्याची, अध्यात्माची आवश्यकता आहे. अध्यात्म म्हणजे कोणतीही अंधश्रद्धा नसणे जी काही कृती असेल ती श्रद्धापूर्वक केलेली असेल. इथेच खरी गफलत होते. आपण वैयक्तिक अंधश्रद्धांना अध्यात्माशी जोडतो म्हणून सत्य जाणून घ्यायला कमी पडतो. अध्यात्माचे विज्ञान म्हणजे चिकित्सक पद्धतीने विचार करून अधिष्ठान देणारा विचार होय. जो प्रत्यक्ष कृतीतच असतो, विज्ञानाप्रमाणे अनुभवातून सिद्ध झालेला असतो. सजीव सृष्टीची सर्व तांत्रिक यंत्रणा विज्ञानशास्त्र नियमांना अनुसरून उभी असते परंतु ती कशी असावी याच्या विचारांची बैठक मात्र अध्यात्मशास्त्र सांगते. खरेतर ते एकरूप व परस्पर पूरक आहे. एकमेकांच्या अभ्यासाच्या पद्धती, मूळ हेतू या अनुषंगाने अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर एकरूपता आढळते. ऋषीमुनी, महर्षी, शास्त्रज्ञ यांच्या विचारांची बैठक समजून घेतली तर हे लक्षात येते. दोन्ही शास्त्रांचा हेतू मानवी जीवन सुखी, समाधानी करणे हाच आहे. विज्ञान जीवनाला रूप व गती देते. तर अध्यात्म या गतीला, जीवनाला योग्यशक्ती व दिशा देते. आजची पिढी ही चमत्कारावर नाही तर निसर्ग नियमांवर विश्वास ठेवणारी आहे. हे विज्ञान, तंत्रज्ञान युग आहे म्हणून आज सर्वाधिक आवश्यकता आहे योग्य कारणभाव समजावून देणाऱ्या विज्ञान आणि समजावून घेणाऱ्या अध्यात्माची मार्गदर्शकांची…संश्लेषकांंची…ज्या विज्ञानामुळे माणसाला सर्व भौतिक गोष्टीतील एकमेंकास पूरक अशी एकरूपता दिसते ते विज्ञानशास्त्र. या एकरुपतेचा साक्षात्कार होतो तेव्हा अध्यात्मशास्त्र. अध्यात्म, वेद यातील अवघड वाटणाऱ्या संकल्पना आपल्या सारख्या सामान्य माणसांनी समजून घ्याव्यात यासाठी तर चमत्कारी रूपक कथांचे लेखन केले गेले आहे. यामागील वैज्ञानिक सत्य बौद्धिक पातळीवर विश्लेषित करून घेतले की विश्वास अधिक दृढ होऊ लागतो. उदा. विष्णूच्या दहा अवतारांबद्दल सामान्य लोकांच्या मनात अनेक शंका आणि गोंधळ उडालेला दिसतो. खरेतर मत्स्यावतार, वराहावतार, कूर्मावतार हे अवतार तर पृथ्वीच्या निर्मितीपासून मानवाच्या प्रगती पर्यंतच्या उत्क्रांती वादावर आधारित आहेत. लेखनात आलेली कालसापेक्ष व्यक्तिनिष्ठता टाळून समजून घ्यावे लागते. निसर्गाचे भौतिक, प्रकृती विज्ञान, रूपककथांमागील सत्य सार, सणवारांच्या निमित्ताने प्रसाद, विधी,कृती वगैरे…. यांचे प्रयोजन समजायला लागले की परस्पर पूरकता समजून येते. आणि लक्षात येते भारतीय विज्ञान, अध्यात्म क्षेत्रातील अतिप्राचीन ज्ञान किती प्रगत होते जे आजही उपयुक्त ठरत आहे. पंचेंद्रिये बंद करून विचार केला की अंधश्रद्धाच पसरविली जाणार ! अध्यात्माचा मूळापर्यंत वैज्ञानिक सत्य शोध घेत जाणे आणि विज्ञानातील न उलगडणारी, रहस्यमयी गोष्टी मागील…विचार प्रक्रिया समजून घेणे किंवा तसा प्रयत्न करणे म्हणजे या दोन्ही शास्त्रांशी एकरूप होणे होय. धर्मभावनेच्या मुळाशी गेले की सर्व अंधश्रद्धा गळून पडतात. आपल्या विवेकाचे केंद्र नेहमीच गोंधळात असते. त्याचे जागरण होण्यासाठी विज्ञानाची साथ तर हवीच याच बरोबर अध्यात्माची स्थिर वैचारिक बैठक देखील आवश्यक आहे. व्यक्ती आपापल्या धर्माशी भावनिक, मानसिकरीत्या घट्टपणे जोडल्या गेलेला असतो. लहानपणापासून त्याच्यावर कुटुंबातील धर्माप्रमाणे संस्कार झालेले असतात. हे पूर्वापार चालत आलेले, टिकून आहे, पुढेही चालू राहणार आहे. यासाठी तर पुर्वजांनी वैज्ञानिक गोष्टी धर्माशी जोडल्या आहेत. यातील कार्यकारणभाव लक्षात येणे महत्त्वाचे.
धर्म तरी वेगळे काय सांगतो ! सर्व प्रकारचे मानवनिर्मित भेद विसरून बंधूभाव व एकात्मता साध्य करायची असते म्हणून तर ‘चराचर सोयरे होतु सकळजण’. हे ज्ञानेश्वरांचे विश्व धर्माचे ध्येय आहे. व्यक्ती व्यक्तीं मधील बंधुभाव व एकात्मता जोडणे आहे. विज्ञान तंत्रज्ञान देखील विश्वातील व्यक्ती व्यक्तींचे जीवन कसे जोडल्या जाईल यासाठी तांत्रिक पद्धतीने प्रयत्न करतच असते. परंतू आधी उल्लेख केल्याप्रमाणे, सांगितल्याप्रमाणे या तंत्रज्ञानाला, तांत्रिकतेला सारासार विचार नाही. तो मात्र ते तंत्रज्ञान हाताळणाऱ्या आपल्या मनाला प्राप्त करून घेऊ शकतो आणि देऊ शकतो.
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
12 thoughts on “एकरूप….”
Khup chan.
मूळ एक शाखा अनेक
True, nice
छान
छान
खूप छान वर्षा
Nice article 👍👍awesome
अध्यात्म व विज्ञानाची सांगड अप्रतीमचं!
👌🏻👌🏻🙏🏻💐
विज्ञान आणि अध्यात्म धर्म यांचा समन्वय👌
छान
चिंतनयोग्य….