रुक्मिणी रोज पहाटे बागेतले फुलं तोडत असे…आज मात्र फुले तोडताना हातावर दुसरा एक हात पडला….आणि आईवडीलांकडे आग्रही मागणी करून कायमचा हातात घेतला. चालून आलेलं चांगले स्थळ म्हणून लगेच होकार… आणि परीक्षा तोंडावर आलेली असताना विवाह सोहळ्याचा घाट शिक्षण,वाचन काय काय सगळ्यांवर हा हात फिरला! प्रत्येक गोष्ट रूक्मिणीच्या आवडीचीच…गाणे, फुले, काम…पूजा तर देवाला गप्पा मारण्यापर्यंत मजल दोन्ही बाजूंनी तीच बोलणार प्रश्न तिचेच आणि देवाच्या वतीने उत्तरही तीच देणार….प्रसंगी रागवणार, रुसणार आणि स्वतःच स्वतःचे सांत्वन करणारी… नवीन दिसलेली प्रत्येक गोष्ट आलीच पाहिजे हा हट्ट! माहिती कुठून कशी मिळवत होती देवालाच ठाऊक होते. सगळ्या जणी बसल्या की सगळ्यांच्या घरची खबरबात हीच घेणार, ” नंदिनी काग तुझी आई फारच भांडते म्हणे वडिलांना, आपण सगळ्यांनी मिळून आईला समजून सांंगायचेे का ? आणि मग सगळ्याजणी मान हलवून होकार देणार. नकळत्या वयात काय काय कळणार होते ? संघर्ष…. संसाराच्या जबाबदारीचा…. अकाली मातृत्वाचा…. कोणती कोणती जबाबदारी पडणार होती ? आणि काय काय त्याग करावा लागणार होता. हे मात्र अंधारातच होते. घरातील मोठी मुुुलगी आणि नातेवाईकांचा मागणीचा भर… म्हणून लवकर दोनाचे चार हात ! सासर आणि माहेर खरंच जमीन-अस्मानाचं अंतर…. प्रत्येक गोष्ट वेगळी…. किमान समायोजनासाठी वय तरी योग्य असावे… सगळे अंधारात ढकलून दिल्यासारखे.. मुळातच स्त्रीमध्ये ही क्षमता कोठून येते ?… सासरची होऊन रहाते. “हरिणीचे पाडस व्याघ्रे धरीयेले” अशी अवस्था. खेळण्या-बागडण्याच्या, शिकण्याच्या वयात आणि मोठ घर म्हणून सर्वांना खूप कौतुक पण मोठ मोठं आणि खोटं खोटं…. पहिल्यांदा माहेरी आल्यावर मैत्रिणींनी तर ओळखले नाही. हीच आहे का ती ? आपली रूक्मिणी…. उत्साहाचा झरा, हास्याचा खळखळाट, पुढाकार घेऊन सगळ्यांना सामावून घेणारी, खेळणारी नवनवीन युक्त्या सांगून चक्रावून टाकणारी, सगळे कामे आटोपून खेळण्यासाठी जास्तीत जास्त वेळ कसा काढता येईल याच्या अजबगजब युक्त्या म्हणजे ही रूक्मिणी ! साडेतीन भाकरी बनवायची…वेळ कमी लागतो म्हणून शेवटची भाकरी चंद्राचा अर्धा गोल. अशी भाकरी थापायचे कौशल्य फक्त तीच जाणो! सगळी काम करून सगळ्यात आधी खेळायला तयार, खेळाशिवाय दुसरे काही न सुचणारी, आज काय करायचे, अन् उद्या काय करायचे ? सारखी आपली बडबड…दगडाला सुद्धा बोलायलाा लावणारी ! तिने शोधलेले खेळ, भिती दाखवण्यासाठी केलेले उपाय तर स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाणारे. एकीचीसुुद्धा नकार द्यायची हिम्मत नाही. कारण पुन्हा भितीसाठी नकार देणाऱ्या मैैत्रिणींंचा क्रमांक…. रूक्मिणीला कशाचीच भिती नव्हती. आमचे डोके विचार करून थकले की तिचे डोके सुरू व्हायचे. एकमेकींची फजिती करणे, मजा करणे, खोडी काढणे शेतात घेऊन जाणे. नद्या, डोंगर, माळरान पालथे घालणे. आणि ! आणि! आज हा काय अवतार ? बडबडी ची अबोली ? काय झाले असेल ? सगळ्याजणी एकदम शांत झाल्या. आजीच्या बारीक,अनुभवी नजरेने मात्र ओळखले. मैत्रीणींना म्हणाली ,”अगं तिला तिच्या विठ्ठलाच्या पंढरपूरला जायचेे नाही. तिला शिक्षणाच्या पंढरपूरला राहायचे होते. होईल सवय हळुहळू…. माझी रुक्मिणी जिथे जाईल तिथे उजेड करणारी आहे. साक्षात लक्ष्मी आहे. दगडाला बोलायला लावणारी रूक्मिणी जीव लावणारी आणि जीव लावून घेणारी. खरेतर लग्न जमले आणि चाणाक्ष रुक्मिणीने ओळखले होते. आता शिक्षणवाटा बंद…. इथपर्यंत ठीक ! पण सासरी जाऊन आल्यानंतर तिने ओळखले होते… यापुढे अबोलवाट चालायची आहे….एकदम गंभीरपणे, दिवसभराचा दिनक्रम, …फक्त काम…कायम राबता माणसांचा…एक क्षुल्लक चुक सुद्धा माफी योग्य नाही, सांगितले त्याचप्रमाणे… त्याचपद्धतीने प्रत्येक गोष्ट झालीच पाहिजे.नाहीतर नको ते शब्द ऐकण्याची तयारी त्यापेक्षा…शांतपणे काम काय वाईट…सोबतीला एकांत… थकून झोपताना सांत्वन करणारा शब्दही नाही… बोलणे, वाचणे, नवीन शिकणे वगैरे यासारख्या गोष्टींचा विचार करायला वेळ आणि परवानगी नाही….त्यामुळेच तर सर्वांच्या सेवेला सादर….अबोली कुठेही फुलणारी… शांतपणे…चेहऱ्यावर कधीही स्वतःच्या वेदनेेेची, इच्छेची रेष उमटू न देणारी… हाती घेतलेल्या हाताला खंबीरपणे स्वप्नपूर्तीसाठी साथ देणारी…..सहकार्य करणारी…. अकाली जबाबदारीच्या ओझ्याने स्वतःचेच अस्तित्व विसरलेली.बाहूली अबोली, दुसऱ्याच्या आनंदात समाधान मानणारी….काम करत असताना सारखा विचार करायची…..मार्ग शोधायची शिक्षण सुरू करण्यासाठी काय करता येईल?सावित्रीच्या लेकीच शेवटी…सावित्रीने मार्ग मोकळा केला पण त्या मार्गावरून जाण्यासाठी सुद्धा किती जणींना संघर्ष करावा लागतो. लग्न जमवताना पुुढील शिक्षणबंद म्हणून कबुली घेतल्यामुळे इतर गोष्टींपासून सुरुवात करायचे ठरवले….शिवणकाम, हस्तकला यासारख्या अनेक गोष्टी संसाराच्या उपयोगी म्हणून हळूहळू परवानगी मिळू लागली…. सगळे नियम अटी पाळूनच… कष्टातही ती खूश राहू लागली कारण तिच्या निश्चयाची, प्रवासाची सुरुवात झाली होती आणि पुढे तिला हा प्रवास उच्च शिक्षणापर्यंत घेऊन जायचा होता….जे मिळेल जसे मिळेल पण शिकायचे होते….अनेक गोष्टी सहन करून, युक्त्यांचा उपयोग करून, वयाच्या पुढचा संघर्ष आणि विचार करुन, सर्वांची मर्जी राखून, जिद्दीने हा प्रवास पुर्ण केला…
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
13 thoughts on “अबोलवाट….”
अजूनही खेड्यात तच नाही तर शहरात देखील खरं आहे… चांगले स्थळ म्हणून शिक्षण बंद करतात… किंवा सासरी गेल्यानंतर पुर्ण करेल असा विचार
असा जिद्दीने प्रवास पुर्ण करणाऱ्या अडचणी सांगू शकत नाहीत छान मांडणीस्त्रीम्हणून बरेचदा काही प्रश्न उघडपणे बोलता येत नाहीत समजून घ्यावे लागतात
लहान वयात विवाह आणि अकाली मातृत्व संघर्ष असतोस समजून येते
Vr nice Varsha👌👌👌 Baykana khup thikani aapl mann marav lagt ..he kharch aahe
Khup chan..heart teaching👌🏻👌🏻
Khup sundar varsha👍👌
अबोलवाट हळूवारपणे लेखणीतूनबोलकी केलीत. खूपच मर्मभेदी व बोधपर लेख👍
Chan aahe article
आपल्या अवतीभवती आणि कदाचित आपल्या घरात सुद्धा अशा रुक्मिणी आहेत आणि भेटतात पण त्यांची भेट होते त्यांच्याशी बोलन होत.. आणि खरंच कधीकधी असे वाटते की त्यांचे पंख न छाटता त्यांच्या पंखात बळ आणून त्यांना भरारी घेऊ द्यायला पाहिजे होती त्यांचे शिक्षण त्यांना पूर्ण करू द्यायला पाहिजे ,असे प्रत्येक स्त्रीने जर मनात आणले तर अशा कितीतरी रुक्मिणी त्यांच्या स्वप्नांची भरारी घेत पुढे जातील आणि त्यांना भरारीसाठी आकाश ठेंगणे पडेल
Khup chan vicharvarsha
Superb,where there is a will, there is a way.
Real life
अबोलवाट खूप बोलकी केलीत
स्त्री जन्मा ही तुझी कहाणी😔😔.
भावस्पर्शी लेखन👌👌👌