मधला मार्ग काढण्याचे कौशल्य म्हणजे तडजोड…. मला काय वाटते? यापेक्षा योग्य काय हे समजले की तडजोड करायला सोपे जाते. समाजमान्य व्यवस्था सुरळीत व्हाव्यात म्हणून जेवढे आवश्यक आणि शक्य होते तितकी तडजोड नक्कीच करावी. व्यवस्थापनातील आदर्श यशाचा मार्ग आहे. हे व्यवस्थापन समाजमान्य व्यवस्था म्हणजेच कुटुंब, नातेवाईक, कामाचे ठिकाण, परिसरातील व्यक्तींशी समायोजन, […]
म्हणूनच आंतरक्रिया शब्द रूढ झाला असेल !हृदय भरून येते, ह्रदय सद्गदित होते, हृदयात धडकी भरते, “कृष्ण सुदामाची गोष्ट ऐकली की मित्रता पाहून हृदय भरून येते”. ” भरताचे, लक्ष्मणाचे बंधूप्रेम ऐकले की हृदय सद्गदित होते”. “कृष्णाचे विराट रूप पाहून पुर्ण सभेत काही जणांच्या हृदयात धडकी भरली.”…….पुरूष सुद्धा कोमल हृदयी असतो…तर […]
चालायला लागले की पायाखाली काटे असणार, येणारच…. तरीही संघर्ष करत दृष्टी वर उचलती ठेवली की क्षितिज खुणावत असते. पायातले काटे टोचत नाहीत तर गती वाढवतात…. क्षितिजाकडे जाण्याची. क्षितिजाचे खुणांवणे भारावून टाकणारे असते. प्रत्येकाचे क्षितिज असतेचं पण आपण दृष्टीचा कोन बदलायला बहुधा तयार होत नाहीत. आकार, रेषा, व्याप्ती हा दृश्यभाग […]
आयोजन, योजनेशिवाय, नकळत होते ती मैत्री !…..मैत्री होणे, असणे आणि टिकणे कधी घडते? मित्र-मैत्रिणींना काय वाटते माझ्याबद्दल? असा प्रश्न कधीच मनात येत नाही ती मैत्री! स्वतःला प्रामाणिकपणे काय वाटतं? काय अनुभव येतो..तितकीच आणि तेवढीच मैत्री असते! मैत्री कधीच बदलत नाही, ती आहे तशीच असते! जी बदलते, ती मैत्री नसतेच कधी! […]
आई-वडिलांची….सात पिढ्यांचा उद्धार करणारी एकुलती एक लाडाची लेक, त्यांच बावन्नकशी सोनं! हा ‘बी’…. घडवलेला दागिना आणि फक्त मुलगा म्हणून लहानपणापासूनच, दीड शहाणा लाडोबा असलेल्या दोघांचे दोनाचे चार हात केले की बहुतेक अर्ध्या हळकुंडात पिवळे होतात की काय?असा एक उगीचच झालेला समजं! एक दीड शहाणा आणि एक दुप्पट शहाणी असा साडेतीन […]
विश्वातील सूक्ष्म घटक अणूरेणूंचे रहस्य उलगडण्यासाठी माणसाला हजारो वर्षे लागली. या विश्वाचा निर्माता आणि त्याच्या कृतींमागचा हेतू समजायला हजारो जन्म देखील कमी पडतील. मनुष्याची अल्पबुद्धी, अनेक शंकांनी विस्तारलेली आहे. या शंका, बुद्धी हे संभ्रम दूर करण्याचे काम अनेक अवतारांमध्ये भगवंतांनी केलेले आहे. यासाठी भगवंताच्या अवतारांमधील कृतींचा हेतू लक्षात घ्यायला हवा. […]
श्यामची आई’ वाचली, समजून घेतली की किती सहज दैनंदिन काम, दिनचर्या, संसारात आलेल्या अडचणीतून, परिस्थितीतून श्यामला घडवत होती हे लक्षात येतं. ‘आईचा शाम ते श्यामची आई’ प्रवासच सांगतो की ही आंतरक्रिया किती परस्परपूरक होती. यासाठी आईच्या, यशोदेच्या नजरेतून श्याम पाहिला पाहिजे. थोर व्यक्तिमत्वसुद्धा सुरुवातीला अजाण बालक असते. त्यांचे हे बालपण […]
कशासाठी ? अट्टाहास….खूप विशेष विशेष बनण्याच्या अट्टाहासात आपण शेष राहिलो आहोत का? साधारण आणखी अतिसाधारण गोष्टी शोधत गेलं की असाधारण असंच काहीतरी नक्कीच सापडणार ! ते शोधता आलं पाहिजे.बालपणी काडेपेटीची चित्रे, शिंपले, नदीतले गोटे, जाळी पडल्यावर छान दिसते ते पिंपळपान, मोरपीसं, वृत्त पत्रातील गाड्यांची चित्र वगैरे वगैरे….ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे….पण एकही […]
माळावरची उडी दे….काय मागत होतो आपण? या बगळ्यांच्या थव्याकडे पाहून….कवडी की उडी… उंच उडणे, स्वातंत्र्य, कवेत निवांत निसर्ग की भौतिकतेला कवडी मोल ठरवून…आपले स्वआकाश तर मागत नव्हतो ना ! कावळ्यांची शाळा सकाळी भरतांना, संध्याकाळी सुटतांना, चिमणीला वारा घालून पाटी वाळवून द्यायची विनंती. घरातल्या कोपऱ्यात घरटं केल की मग तर तिची […]
“काळा पाषाण पण मंदिरासाठी घडवला आणि घाव सोसले की त्यात प्राण”. जुन्या मंदिरातील गाभाऱ्यात अद्भुत शक्ती असते. महाराष्ट्रात अश्या विविध शक्तींची मंदिरे खेड्यापाड्यात, छोट्या गावांमध्ये पुरातन काळापासून आहेत. यापैकी एक, महाराष्ट्राची लोकधारा जपणारे हे मंदिर, श्रद्धास्थान म्हणजे खंडोबाची जेजुरी आहे. लोकांच्या हाकेला धावणारा, पावणारा लोकांचा देव म्हणून लोकदेव असेही म्हणतात. […]