बालविकसनामध्ये विविध प्रकारच्या विकासाबद्दल आपण शाळेत शिक्षक या भुमिकेतून विचार करतो. परंतू या भुमिकेला आपली एक व्यक्ती म्हणून आपल्या व्यक्तिमत्त्वाची भुमिका नकळतपणे जोडल्या जातेच. म्हणून मुलांना समजून घेणाऱ्या कृती या तटस्थपणे, नियोजित करून अनुभव बनवता आल्या पाहिजेत. या कृतींचा आधार आणि मार्ग मानसिक विकासातुन जात असतो. यासाठी मानसिकतेला परिणाम करणारी […]
सहपरिवारास भोजनाचे आमंत्रण…. इथे कोणताच सोहळा, प्रसंग एका कुटुंबाचा नसतो. फक्त कुटुंबच साजरं करत नाही तर गावाने गावाला दिलेला आणि सगळ्यांनी मिळून पूर्णत्वास नेलेला क्षण असतो. सामूहिकता, आपुलकी असते. सगळ्यांचा आनंद, कष्ट, सहभाग,असतो. सप्ताह, हनुमान शक्ती, लग्न, असो की दुखःद प्रसंग….. कोणताही कार्यक्रम सगळं स्वयंपूर्ण असतं. खूप मजा येते हे […]
आपल्या संस्कृतीचा, धर्माचा, वेदांचा आदर्श मूळ ईश्वरवाद आहे. हा ईश्वर एकच आहे. ईश्वरवादाच्या त्रिशक्ती म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश. या अतिउच्च पातळीवरील अलौकिक शक्ती आहेत. या शक्तींच्या अंगी अगणित गुणवत्ता आहेत. या त्यांच्या अंगी असलेल्या प्रसन्नतेचे, सर्वोच्च ज्ञानाचे, चमत्कारिक अवतारांचे, विविध अवतारातील केलेल्या कार्याचे, झालेल्या साक्षात्कारांचे या सारख्या अनेक […]
अंधाराची साडी तिला चांदण्याची खडी…. ” नेसले ग बाई मी चंद्रकळा ठिपक्यांची, “तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या कृष्णाची”. “आठवणीतील चंद्रकळे वर… हळदी कुंकू डाग पडे…. संक्रांतीचे वाण घ्यावया पदर होतसे सहज पुढे”…. “आणिक ही चंद्रकळा भारी माझ्या आवडीची ! पदराला चंद्रचंद्र नक्षत्रांच्या कशिद्यायची”. […]
जन्म मुहूर्ताऐवजी स्वराज्य मुहूर्तावर जन्माला आलेले कन्यारत्न म्हणजे स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ. युगायुगांचा अंधार दूर करणारी ही कन्या. अशा योगावर जन्माला आलेली शक्ती सर्वगुणसंपन्न असते. स्वकर्तृत्वाने मोठी होते व इतिहास घडविते. जन्माचा काळ पारतंत्र्याचा परंतू दोन पिढ्यांपर्यंत मनामनात हिंदवी स्वराज्याची मशाल पेटती ठेवून विजय पताका फडकावली. याचा आनंद समाधान आणि हे […]
दिवसाचे सोपस्कार करून झाले.घरातील सर्वजण,भेटायला येणारे नातेवाईकांचे रडणे, सांत्वन ऐकून, बोलून, थकून झोपले होते….ती मात्र आज समाधानाने,भयमुक्त होऊन बाळाकडे पाहून शांत झोपली होती. तिचा संसार नव्याने सुरु होणार होता. एका तपानंतर शांत चेहरा उत्साही दिसत होता. सगळा भूतकाळ विसरणार होती. ठरवून केलेलं अगदी सगळंकाही. तिच्याजवळ दुसरा पर्यायच नव्हता!कामाला गेल्यावर […]
जीवन की राह नयी, बात वहीं, फिर राह ये चलकर देखेंगे। सच, सच नही तो, ना सही, थोडा झूट सुनकर समझेंगे। इमान, मान की लौ कहीं, चिराग मे जलकर सोचेंगे। सपनो मे कहीं, दुनिया है वहीं, ख्वाबोंको संभलकर रखेंगे पर नही, उडान की जिद् यहीं, तारोंकों समेटकर लायेंगे। हार […]
सरिता, निश्चल शीतल रेत उष्मा, स्तब्ध अविचल। सरिता शैल, संघर्ष हर मील सरिता मौन, पनघट सिसके जान ले कौन ? सरिता जीवन, नीत नये वन अनुभव से जाने मन मन । तिमिरत्यागी, फिर नभ मे सुखदभोर, पंछी गुंजते मान ले कौन ? हरियाली किनारे आये कहांसे गिले किनारे, पैर […]
सांजवेळी नित्य निळ्या निळाईचे… क्षणात लोपणे केशरकाल्याचे… शब्दफुलांचे गंध दरवळती साठवणींचे… क्षणभराचे अस्तित्व अर्थांचे… शब्दांचा शोध घेती भावमनीचे… अर्थ खेळ सारे चालती गुढरेषांचे… प्रकाशने नीत घडती कवितांचे… लोप पावणे भासे का चांदण्यांचे… विखूरणे अंती गोफ चंद्रिकांचे… प्रकाशकण जणू अक्षर काजव्यांचे… […]
नववर्षाच्या खूप खूप आधी मनःपूर्वक शुभेच्छा ! …. दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होणारी आपली संस्कृती , सर्वांना आपलसं करून घेणारी परंपरा….अभिनंदनीय आहे परंतू तेच आपलं समजण्याचा , मानण्याचा नकळत गैरसमज होऊ शकतो. …. […]