झुळूक या काव्यसंग्रहाचे …. इरा प्रकाशन, लातूर तर्फे…. 95व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात उदगीर येथे…. संमेलनाध्यक्ष सन्माननीय श्री भारत सासणे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
बाय माझी…. बोलीभाषा मराठवाडी.. बाय माझी सुगरणं सुगरणं साताची घरीदारी रानीवनी कष्ट तिच्या हाताची।।धृ।। गारपाण्यानं गं वली, सारवते भुईसर चोपडं गं अंगण, सारा परवार घोंगडी नेटकीचं, बाजेवर गोधडी यळ झुंझरूकाची कामं पोतराभुईची।। राबतं गं जातं, एकलं तिच्या साथीला रामंसीता नाते, सारे गं तिच्या ओवीला पिवळीचं पीट बाई, आलं […]
प्रत्येकाला इच्छा स्वप्न, ध्येय असतात. याचा दृढनिश्चय झाला की मग त्यासाठी जिद्द, चिकाटीचे प्रयत्न यांचे कोणत्याही परिस्थितीत सातत्य टिकवले जाते. कितीही अडचणी, संकटे आणि कठीण परिस्थिती आली तरी ही प्रेरणेची ठिणगी विझत नाही, नष्ट होत नाही. हे एखाद्या ठिणगी प्रमाणे जपले की ही दुर्दम्य इच्छाशक्ती कायम ज्वलंत राहते. झळ […]
धृवताऱ्यापरी…. माझ्या अक्षरांना, तुझ्या शब्दांना आपल्या गीतांना जगाची का दाद हवी माझ्या रुसण्याला, तुझ्या हसण्याला आपल्या कथांना जगाची का साथ हवी माझ्या फुलण्याने, तुझ्या असण्याने आपल्या बहरण्याने जगाने का राजी व्हावे माझी “मी” अन् माझे “मी” पण आपल्या विरघळण्याने जग का गढूळ व्हावे माझ्या अर्थांना तुझ्या भावनांना आपल्या […]
शाळा सुटली की घरी येताना मैत्रिणींचा बेत ठरत असतो. आज काय खेळायचे! भातुकली, लपंडाव, लगोरी, कंचे, गोल गोल राणी, झिम्मा फुगडी, आंधळी कोशिंबीर, लोखंडपाणी, डोंगराला आग लागली, तळ्यात-मळ्यात, संत्रलिंबू, विषामृत, रंग रंग कोणता रंग, आट्यापाट्या, सुरपारंबी, विटी-दांडू, काचकुऱ्या पकडा-पकडी…. या सारख्या अनेक खेळांची नावे पटापट सांगितली जायची. शेवटी घर येईपर्यंत […]
कोणत्याही व्यवस्था कशासाठी असतात. केवळ सोय, उपभोगासाठी नाही. कोणत्याही कार्यक्रमात व्यवस्थांसाठी समोर येणारे चेहरे, अन् पडद्यामागचेही चेहरे अगोदर आणि नंतरही नियोजनबद्धरितीने राबत असतात. हे केवळ औपचारिकता म्हणून केलेले नसते. दूरदृष्टीने नेमकी उद्दिष्ट ठेवून काहीतरी नवीन सुरू करण्याचा, सुरू ठेवण्याचा व सुरू राहील याचा पुर्ण प्रयत्न असतो. अनिवार्य आहे म्हणून […]
खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई, अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेतील शिक्षक साहित्यिकांचे साहित्य संमेलन. स्वानुभव कथन विचार संघर्ष वेदना- संवेदनेचे असंख्य अनुभव मला आले, जगले ती सहवेदना मला लिहायला प्रेरणा देते. जे आहे जसं आहे अगदी तसंच त्याचं भाषेत सत्यकथेत लिहावे ही प्रेरणा देखिल या वेदनेतून मिळते. अवहेलना, पोटासाठी […]
“स्त्री आणि पुरुषांना कल्पकतेने आपल्या वापरातील आवश्यक असणारे कापडी प्रकार बनवण्याचे कौशल्य घरोघरी प्रत्येकाला येत होते. जुन्या झालेल्या कपड्याचा शेवटचा तुकडा देखील वाया जात नव्हता. कपड्यांचे धागे सुती , रेशमी किंवा लोकरीचे असत. या धाग्यांपासून, कपड्यांपासून काय बनवत असत! चांदवा, लांबण पिशव्या, झोळणा, गोधडी, वाकळ, घोगंती, घोगंता, घोंगडी, पडशी, मोरकी, […]
वाणनदी परिसरात आढळणाऱ्या खैर, बाभूळ, बोर, जांभूळ, आंबा, चिंच, कडुलिंब या झाडांच्या लाकडापासून घरात, शेतात, वापरल्या जाणाऱ्या वस्तू तयार करत असत. आताही काही वस्तू या झाडांंच्या लाकडापासून करतात परंतु यामध्ये साग, सीसम यासारख्या अनेक झाडांचे लाकूड वापरत आहेत. गावाकडे लाकडाच्या वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजे मुसळ, रवी, रविखंबा, मोगरी, […]
शोभेच्या वस्तूंसाठी आपण मातीच्या भांड्याचे प्रकार वापरतो. वारली चित्रकला रेखाटून कुंड्या, फुलदाणी यासारख्या काही भांड्यांचा वापर करतो. सध्यातर चवदार, काहीतरी गावाकडचं, towards nature, ecofriendly वगैरे मध्ये सहभाग म्हणून मातीच्या भांड्यात, मातीच्या चुलीवर काही ठरावीक पदार्थ करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.या पद्धतीने खास वनभोजन आयोजित केली जातात. भट्टीत भाजल्याप्रमाणे शेंगदाणे चवदार […]