प्रेरणा….

14 posts

सोबत काय असावे ?….

आयुष्य कस आहे आणि कस जगावं हे विचारांंवर ठरतं. जीवन प्रवाही आहे परंतु हा प्रवाह कोणत्या दिशेने ? याला बऱ्याच गोष्टी सहभागी असतात नक्की जसे जडणघडण, भेटणारी माणसे, आलेले अनुभव असा आपण विचार करतो. परंतु यापेक्षाही मूल मानवी विकासातील टप्पे तसेच स्वतःला विविध आघाड्यांवर सिद्ध होण्याची हाव. हावच म्हणावे लागेल […]

काय फरक पडतो?….

  कोणत्याही ठिकाणी, कुठेही  काम करत असताना प्रत्येकाला विविध अनुभव येतात. सगळे अनुभव वाईट नसतात ! आणि सगळीच माणसंही परिपूर्ण नसतात. प्रत्येकाचा येणारा अनुभव वेगळा असतो. आपण हळूहळू समृद्ध होत जातो. अनुकरण, निरीक्षण, प्रयत्न, करत शिकत जात असतो. प्रत्येकचं चूक आपण करायला पाहिजे असे नसते तर कधीकधी दुसऱ्यांच्या चुकांमधून देखील […]

सामुहिकता !….

प्रत्येकाकडे सगळ्या गोष्टी अथवा सर्व गुण कधीच नसतात. काही लोकांकडे  कल्पना क्षमता असते पण प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नियोजन नसते तर कधी अधिकार नसतो. शक्ती असते पण तिला योग्य दिशा नसते. संघटनक्षमता असते पण निर्णयक्षमता नसते जे आपल्याकडे नाही ते इतरांकडे असू शकते. जे इतरांकडे नाही ते आपल्याकडे असू शकते. अशा एकमेकांच्या […]

एक क्षण….

    स्वतःला अलिप्तपणे व तटस्थपणे समजून घेणे ऊर्जा वाढवणारे असते. समजून घेत असताना अभिनिवेश, व्यक्तिनिष्ठता नसावी. निर्लेपपणे समजून घेण्याचा प्रयत्न असावा. जे जे निःशुल्क परंतु मौल्यवान आहेत याचा अनुभव जेवढा घेता येऊ शकतो तेवढे आपण समजून घेऊ शकतो. समुद्राची खोली मोजण्यासाठी जर से.मी.ची छोटी पट्टी वापरली तर चालेल काय? […]