निसर्गमाया….

4 posts

थेट निसर्गातून प्रक्षेपण….

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सृष्टीची निर्मिती केली असेल असे संकेत आणि वातावरण आपण अनुभवतो. हा अनुभव एकदा मनाला जाणवला की, पुढील ऋतूंमधील सगळ्या निसर्ग व्यवस्था, बदल सृष्टी निर्मात्याने किती विचारपूर्वक घडवल्या आहेत हे देखिल लक्षात येते. या वसंतऋतू पासून सगळा निसर्गपट नजरेसमोर येवून मनामनात रमतो आणि त्याची अनुभूती घेण्यासाठी निसर्ग साद घालत […]

सागरीसाद….

विशालकाय लाटांवर लाटा…. सांजवेळी किनाऱ्याची भेट घ्यायला येतांना स्वतःचे मोठेपण लहान करत करत….शेवटी विरघळून जातात, शांत होतात. आपल्या अस्तित्वापूर्वी आणि अस्तित्वानंतरही… अश्या एकानंतर एक लाटा येण्याचे चक्र सुरु आहे आणि सुरू रहाणारचं आहे. उत्साही उसळते….एकमेकात मिसळणारे…. फेसाळते उधाण, वाळूच्या किल्ल्यांसारखे क्षणात सगळं शेवटी पाण्यात ! असे काहींसे, खट्याळ, खोडकर मस्ती, […]

बगळ्या बगळ्या कवडी दे!….

माळावरची उडी दे….काय मागत होतो आपण? या बगळ्यांच्या थव्याकडे पाहून….कवडी की उडी… उंच उडणे, स्वातंत्र्य, कवेत निवांत निसर्ग की भौतिकतेला कवडी मोल ठरवून…आपले स्वआकाश तर मागत नव्हतो ना ! कावळ्यांची शाळा सकाळी भरतांना, संध्याकाळी सुटतांना, चिमणीला वारा घालून पाटी वाळवून द्यायची विनंती. घरातल्या कोपऱ्यात घरटं केल की मग तर तिची […]

निसर्गाची नजरबंदी

निसर्गाची नजरबंदी….

एकीकडे उंच  डोंगर दुसरीकडे खोल दरी, नजरेसमोर  नागमोडी रस्ता…..सगळं नजरेआड होताना थंडगार थंड थंड झुळूक अंगाला लागली की मनाली आली  समजायचे. निसर्गाने खोल दरीपासून थेट क्षितिजापर्यंत बांधलेली इमारत हळूहळू ढगांपर्यंत पोहोचलेली दिसते. नजर जसजशी वर जाते तसेच तिथेच नजरबंदी करण्याची किमया, जादू म्हणजे मनाली. ह्या इमारतीचा पाया म्हणजे व्यास नदीचे […]