झुळूक…

26 posts

निसर्ग आणि मन

आकाशाच्या अथांग पटलावर, ढगांचे मुक्त चित्र उलगडते, तशी मनाची ओढ कधी आनंदाच्या तरंगांत नाचते. झाडांच्या पानांत कुजबुजते वारे, विचारांना देतात नवे सहारे। सूर्य जसा किरणे वाटतो, तसा आशेचा दिवा मनात पेटतो। निसर्ग सांगतो धीर धरायला, ऋतूंची चाल शिकवते स्वीकारायला। कोसळणारा पाऊस देतो स्मरण, की अश्रूतूनही जन्मते नवीन जीवन। पक्ष्यांच्या उडणाऱ्या […]

दीप

कर्माचा दीप अंतरी, अखंड तेवत राहावा, अंधार आला तरी, प्रकाश तोच व्हावा ॥1॥ कष्टाचा प्रत्येक थेंब, सागर रूप धरावा, नियतीच्या हातीही, उत्तर योग्य द्यावा ॥2॥ गांजल्याचे भले करणे, हीच खरी साधना, स्वार्थाच्या मोहजाळी, क्षण कधी न अडकावा ॥3॥ वाट स्वतःच घडवावी, ठेच लागली तरीही, पुढेच चालत जावे, आनंद न गमवावा […]

नदीची हाक

नदीला कधीच  पुराव्याचे कागद  लागत नाहीत… आई सारखे तिच्या पोटातच  पुराला साठवून  ठेवते… धरणं, बांध, अडथळे करूनही ती शांतपणे सहन करत राहते. तिच्या प्रवाहातल्या लाटांना माणसांचा लोभ समजतो… जो तिचे अस्तित्व संपवायला निघतो किनाऱ्यावरच्या अतिक्रमणाला मर्यादेपर्यंतच ती गप्प बसते… पण एक दिवस, ते अतिक्रमण तिच्या  डोहात आत येऊ पाहते… तिचा […]

स्वप्नांचे कवच

स्वार्थाच्या नजरेत जे सत्याला ओलांडून चालतात, त्यांच्या पावलांखालीच शेवटी असत्य चिरडतात। सामर्थ्यवान जे अंधारात अन्याय विणू पाहतात, न्यायाच्या तेजात तेवढेच धागे कुचकामी ठरतात। कामासाठी जवळ येणारे जरी ओळख लपवतात, विश्वासाच्या आरशात सहजच ओळखले जातात। असमाधानी लंगडीस्पर्धा अडथळ्यांच्या सावलीत, टाळून जातो जो, तोच उंचावतो स्वप्नांच्या कवचात।

भरभरून जगणे

कशाची तक्रार नाही, कुणाचा गहिवर नाही जगण्याचा सोहळा इथे काहीच कलेवर नाही जे आहे तेच खजिना, नवा मोह काही नाही सुख शोधता जगावे, तिथेच सुख दाही नाही क्षण-क्षण फुलून यावे , वाऱ्याशी बोलत जावे आकाशात भटकताना, कुठेच पाऊल नाही आल्या जरी मरणाच्या वाटा, घाबरू कशाला आपण श्वासातून हलके जावे, भितीचे […]

गवताचं पातं

गवताचं पातं..   बरे झाले जरा खाली जमिनीवर बसले मी… नजरेत प्रसन्न सगळी गवताची पाती होती … चार बाजूंनी डोंगर अन् लागून खाई… तरी निश्चींत, एकांत अन् अभेद्य शांताई… इथे घुमतात फक्त आता आवाज मनीचे… तुम्ही ऐकली ती केवळ कर्मसाद होती… इथे क्षणात विरतात  सारेच बुडबुडे… जे तिथे वरवर भ्रमात […]

माहित आहे का !

तिला ओळखता का! आता जरा कुठं मिळतंय स्वातंत्र्य चिमुटभर, सत्ता मुठभर, अन् अधिकार घडाभर … तरीहीआश्रित,शोषित,पिडीत, जन्मापूर्वीच मरण मनात मात्र प्रश्न ढीगभर! माहिती आहेत का ! खरं सांगा न् माहिती आहे का! आणि माहिती असेलच तर जाणीव आहे का! दररोज एक पाऊल सोबत चालताना…. स्वतःला सिद्ध करताना एक पाऊल पुढे […]

दिवाळसण

  दिवाळ सण, कशास सजले? कुणीतरी म्हणे, फटाके खुपले ? काय जपता, विचार बुरसटले? कोणी बोलले, दुःख हे ओले।। घरअंगण,मन, सारे पानावले जमेल तसे,मग दाते जमले घरोघरी उत्साहाने, दीप चेतले भर पावसात,सण गोड झाले।।   पांडव, चूल, किल्ले बनवले बोळक्यातूनि,दुध साळ सांडले लाह्या बत्तासे, गोड वाटले सारे मांडले, सारे आवरले।। […]

प्रकाशित क्षण…

      झुळूक या काव्यसंग्रहाचे …. इरा प्रकाशन, लातूर तर्फे….  95व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात उदगीर येथे…. संमेलनाध्यक्ष  सन्माननीय श्री भारत सासणे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.    

बाय माझी…

    बाय माझी…. बोलीभाषा मराठवाडी.. बाय माझी सुगरणं सुगरणं साताची घरीदारी रानीवनी कष्ट तिच्या हाताची।।धृ।। गारपाण्यानं गं वली, सारवते भुईसर चोपडं गं अंगण, सारा परवार घोंगडी नेटकीचं, बाजेवर गोधडी यळ झुंझरूकाची कामं पोतराभुईची।। राबतं गं जातं, एकलं तिच्या साथीला रामंसीता नाते, सारे गं तिच्या ओवीला पिवळीचं पीट बाई, आलं […]