झुळूक…

26 posts

अंधारातील उजेड

  झुळूक आली तरी झळा लागती आता, किती विरोधी वाहतो वारा हा आता। शीड टाकुनी निघाले अथांग सागरी, फिरुनी येईल किनारा, विश्वास न आता। ताऱ्यांनाही झाली सवय अंधाराची, कुठे उजळतो काजव्यांनी जगाचा अंधार आता? जखमा भरल्या किती हसण्याने कधी, डोळ्यांत दाटतो आठवांचा पाझर आता। रणांगणी हरले नाही मी कधी, किती […]

अंतर्मुख

  अंतर्मुख  स्वतःच्याच शोधात मी आहे, मन गाभाऱ्यात अजूनही आहे। ज्यांना नाही स्वतःचा ठाव, तेच उपदेशात रमत आहे। आरशाशी बोलता कळतं, सारा प्रवास संवादात आहे। फसवे मुखवटे उतरले की, खरा चेहरा ओळखत आहे। एकांत होतो दिशा माझी, उत्तर नि:शब्द प्रवाहात आहे। क्षणोक्षणी धुके सरते आता प्रकाश दडलेला श्वासात आहे। स्वतःच्या […]

प्रवास अनादीचा

  आत्मा न मरे, न कधी जन्म घे, तो प्रवासी असे, अनादीचा रे। जन्मोजन्मीचा खेळ उभा कारे, कर्मफळांचे हे तर गोंधळ  सारे। कोण उगम, कोण चालवितो हे, प्रश्न असले जरी, उत्तर तेच रे। नभाच्या पल्याड,सर्व दिशेने एक परमशक्ती संवाद करिते । रूप न तिचं, न तिला नाव रे, पवित्र प्रकाशी […]

प्रार्थना

  मनाच्या खोल तळाशी, आर्त भक्ती दाटते, श्वासांच्या लयींमध्ये मग चाहूल तुझीच लागते। अश्रूंच्या थेंबांना, चरणांची ओढ मिळते, ओठांवरी प्रार्थना, नि:शब्दपणे घुमते। डोळ्यांच्या वाटेवर, दर्शनचित्र उभेसे, तुझा भास जरी झाला, तुझ्यात सारे विसरते। अंतरात ज्योत जळे, अखंड तुझ्या विश्वामध्ये, तुझ्या छायेसाठी जीव, हरवतो शोधामध्ये। ओठ मिटलेले तरी, हाक तुझ्यापाशी जाते, […]

शांती

दुःख जरासे दाटता, ओठांवर हसू दे, जगण्याचा गोडवा मग, प्रत्येक क्षणी दिसू दे। अंतरंगी दीप पेटता, प्रकाश जीवनी भरू दे, जगही मंदिर होवो,करुणा जरा डोळ्यांत येऊ दे। कटु शब्द ऐकता, मनात दयाच दाटू दे, रागाचा दाह जाळुनी, शांती सुवास फुलू दे। नजर अस्वच्छ होता, निर्मळ, क्षितिज खुलू दे, प्रत्येक धूसर […]

माणूस

वादळ झेलुनी उभा राहतो जसा पर्वत, घाव झेलूनी अधिक कणखर होतो माणूस। अपयशाच्या राखेतून ठिणगी उजळते, झुंज पुन्हा-पुन्हा देत प्रखर होतो माणूस। कष्टांच्या भट्टीत तावून घडते सोने , दुःख स्वीकारता अधिक उजळतो माणूस। अश्रूंच्या सागरातून मोतीच जन्मतो, दुःख गिळुनीही हसत शहाणा होतो माणूस। अपमानाच्या काट्यातून धीर उमलतो, शब्द जखमेतूनही सजग […]

स्वतःशी संवाद

एकटेपणात कधी मौन राखताना, स्वतःशीच जीव थोडा जुळताना। आरशास डोळे भिडतील तेंव्हा, आपुलीच प्रतिमा स्पष्ट होते जेंव्हा। जगण्याचा थकवा ओघळेल सारा, एकांतात जीव  उमलेन जरा। क्षणांची गणितं सोडवताना,                                              […]

अनंत विराम

आकाश निरव, तारे उजळ, मनाचे भार होती विरळ। रुपेरी अबंरी न्हाली रात्र, गार झुळुकीत उमलली गात्र। गहन अनंताचा गारवा थर, शांत शुद्ध  कल्याण स्वर। पानांतून वारा हलके गातो, नभलहरी मनाशी गुंफतो। गगनी लपले चंदेरी दान,                                […]

शाश्वताचा उदय

वादळं कितीही उठली, अंतरी दीप न विझे। जग निराशा सांगे, आशा अंतरी जागे॥१॥ तन-मन-धन क्षणिक सारे लोभास या अंत न ये। मनमंदिरी जो जागे,त्याला भय काही न दे॥२॥ बाहेर अंधार गडद,अंतरी सूर्योदय ये। शून्याच्या कुशीत, शाश्वताचा उदय दे ॥३॥  

थेंब जसा सागरात

शून्याच्या गर्भातून,अनंताचा जन्म झाला, थेंब जसा सागरात,स्वविसरून विरघळला। नक्षत्रांचा खेळ हा,गणितात मोजला एका श्वासाच्या , रहस्यात अजूनही दडला। देव कुठे शोधावा, मंदिरी वा ग्रंथात? अश्रू पुसता जेव्हा, तेव्हाच तो भेटला। विद्या असो विज्ञानाची, वा साधना अध्यात्माची प्रकाश अंतरीचा, दोन्ही मार्गांनी झळकला। अनुभव विश्वाचे,वाळवंटातल्या पाऊलखुणा,              […]