भावतरंग….

8 posts

लक्झरी लाईफ..

कुछ न होके भी सब बन बैठ। सब बन के भी कुछ न हो बैठ। मागे लक्झरी लाईफ विषयी एक छान पोस्ट आली.. वाचली आणि मनात विचार सुरु झाले… आपण भारतात रहाणारे मग या इंग्रजी शब्दानुसार मुळात आपल्या जीवनशैलीचे अर्थ का काढत बसतो?… प्रत्येक देशातील भाषेत तिथली संस्कृती, लोकजीवन,समाजमन विरघळलेले […]

या जगण्यावर शतदा असही प्रेम करावं…

या जगण्यावर शतदा असही प्रेम करावं…अवघड कठीण असं माणसात काहीच नसतं ! शेवटी आपण माणसचं कोणी खरचं चुकणारं असतं….कोणी मुद्दाम चुकवणारं असतं…उगी नकळत मनाला मात्र चुकचुकल्यासारखं वाटंत रहातं.. कधी कोणी समजावल्यासारखं करतं… कुणी समजून घेतल्यासारखे करतं.. सगळं समजून उमजून कोणी शांत रहातं…कधी माणसं सहभागी करायला कुणाकडे जागा नसते ….कधी जागा […]

जीवनाला जगावे लागते….

पावसाच्या थेंबाचे दान मातीला मातीचे दान वेलींना फुलोनि वर्षाव मातीत तरी फुलावे लागते…. पायरी चढणे नसे इथे… एकेक पायरी उतरावे लागते… जीवनाला जगावे लागते. असे कितीतरी नकळतपणे घडणारे निसर्गदान, जीवन दर्शन अन् त्याप्रती ऋणभाव, आभार, धन्यवाद असतो. कृतज्ञेपोटी विचार, कृतीतून, वागण्यातून नित्य व्यक्त होत असतो. आयुष्य कधीच एकट्याचे नसते. अचानक, […]

ये हृदयीचे ते हृदयी….

  म्हणूनच आंतरक्रिया शब्द रूढ झाला असेल !हृदय भरून येते, ह्रदय सद्गदित होते, हृदयात धडकी भरते, “कृष्ण सुदामाची गोष्ट ऐकली की मित्रता पाहून हृदय भरून येते”. ” भरताचे, लक्ष्मणाचे बंधूप्रेम ऐकले की हृदय सद्गदित होते”. “कृष्णाचे विराट रूप पाहून पुर्ण सभेत काही जणांच्या हृदयात धडकी भरली.”…….पुरूष सुद्धा कोमल हृदयी असतो…तर […]

मैत्री आहे तशीच असते…

आयोजन, योजनेशिवाय, नकळत होते ती मैत्री !…..मैत्री होणे, असणे आणि टिकणे कधी घडते? मित्र-मैत्रिणींना काय वाटते माझ्याबद्दल? असा प्रश्न कधीच मनात येत नाही ती मैत्री! स्वतःला प्रामाणिकपणे काय वाटतं? काय अनुभव येतो..तितकीच आणि तेवढीच मैत्री असते! मैत्री कधीच बदलत नाही, ती आहे तशीच असते! जी बदलते, ती मैत्री नसतेच कधी! […]

संग्रह कशाचा?….

कशासाठी ? अट्टाहास….खूप विशेष विशेष बनण्याच्या अट्टाहासात आपण शेष राहिलो आहोत का? साधारण आणखी अतिसाधारण गोष्टी शोधत गेलं की असाधारण असंच काहीतरी नक्कीच सापडणार ! ते शोधता आलं पाहिजे.बालपणी काडेपेटीची चित्रे, शिंपले, नदीतले गोटे, जाळी पडल्यावर छान दिसते ते पिंपळपान, मोरपीसं, वृत्त पत्रातील गाड्यांची चित्र वगैरे वगैरे….ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे….पण एकही […]

अभिव्यक्ती….

  अभिव्यक्तीचे माध्यमं कितीतरी…..प्रत्येक माध्यम प्रभावीच ! प्रत्येकाला रूचणारं आणि त्याच्यामध्ये रुजलेला फक्त प्रकार बदल… का व्यक्त व्हावे असे वाटतं असेल विविध प्रकारे ?…. स्वतः चे विचार सांगण्यासाठी, अनुभव शब्दबद्ध , कृतीयुक्त करण्यासाठी की  परिचय व्हावा म्हणून ! की केेेवळ अभिव्यक्तीसाठी ! निसर्ग हट्ट करतो का?  की माझ्या निसर्गोत्सवात सर्वांना […]

प्रवाहीपणा हवाच !….

    भाव बदलला की सगळेच बदलते….   माणसे बदलत नसतात ! काही काळानंतर ती प्रत्यक्षात कशी आहेत समजायला लागते.  आपली दृष्टी कोणत्या धारणांनी पहाते, जाणते यावर तात्काळ आणि तात्पुरता काढलेला निर्णय असतो.  कधी कधी  दिसते तसेच नसते….परंतु आपलेही चुकीचे असू शकते हेच मुळात आपण स्विकारत नाहीत. जेवढी माहिती  तेवढाच व्यक्ती […]