प्रेरणा….

14 posts

निमित्त साहित्याचे…

  कोणत्याही व्यवस्था कशासाठी असतात. केवळ सोय, उपभोगासाठी नाही. कोणत्याही कार्यक्रमात व्यवस्थांसाठी समोर येणारे चेहरे, अन् पडद्यामागचेही चेहरे अगोदर आणि नंतरही नियोजनबद्धरितीने राबत असतात. हे केवळ औपचारिकता म्हणून केलेले नसते. दूरदृष्टीने नेमकी उद्दिष्ट ठेवून काहीतरी नवीन सुरू करण्याचा, सुरू ठेवण्याचा व सुरू राहील याचा पुर्ण प्रयत्न असतो. अनिवार्य आहे म्हणून […]

माझ्या साहित्य लेखनाच्या प्रेरणा….

  खोलेश्वर महाविद्यालय, अंबाजोगाई, अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेतील शिक्षक साहित्यिकांचे साहित्य संमेलन. स्वानुभव कथन विचार संघर्ष वेदना- संवेदनेचे असंख्य अनुभव मला आले, जगले ती सहवेदना मला लिहायला प्रेरणा देते. जे आहे जसं आहे अगदी तसंच त्याचं भाषेत सत्यकथेत लिहावे ही प्रेरणा देखिल या वेदनेतून मिळते. अवहेलना, पोटासाठी […]

प्रतिमा आणि प्रतिभा….

जागतिक पुस्तक दिन असो की वाचन दिन किंवा साहित्याशी संबंधित कोणताही दिन पुस्तकांची, वाचन संस्कृतीच्या साधकबाधक विचारांची चर्चा, सुविचार, महत्त्व आणि मतं वगैरे याशिवाय पोरका वाटणारचं !! म्हणून जरा काय चाललय? वाचन संस्कृती पुर्वापार होती, आहे आणि रहाणार… यात तीळ मात्र शंका नाही. वाचन कधी वैयक्तिक तर कधी सामुहिक परंतु […]

ज्याची त्याची जत्रा….

आपल्यावर किती ओझी आहेत ! असे प्रत्येकाला वाटते.  कोणाला कशाचेही ओझे वाटू शकते. पती, पत्नी, पुत्र, असल्याचेही तर फॅक्टरीचा मालक किंवा नोकर असल्याचेही, काही जणांना तर दुसऱ्याला किती ओझे आहे याचेही ओझे वाटते! अशी कितीतरी ओझी केवळ मनात, विचारात मानलेली आणि समजलेली असतात. या समजण्यामुळे मात्र मनाचा जडपणा वाढतो. ही […]

क्षमता….

व्यक्तींच्या अंगीभूत असलेल्या क्षमतेएवढी कामे होतात. या क्षमतेचे, योग्यतेचे प्रमाण प्रत्येकासाठी सारखे असू शकत नाही.समजा धावताना एकाच्या पायात काळजी घेणारे बूट असतील आणि दुसऱ्याला अनवाणी धावावे लागत असेल तर ! क्षमता आणि मूल्यमापन हे सारख्या परिस्थितीत, समान योग्यतेच्या व्यक्तींचे असते. नियंत्रित परिस्थितीत केलेले मूल्यमापन काही ठरावीक क्षमतांचे आणि तात्पुरते असते. […]

काय गरज आहे?….

  “दान दीन बनवते, काम नवनिर्माणाला प्रवृत्त करते”. हे वाक्य लक्ष वेधून घेते. याचा अर्थ असा नाही की दानाला महत्त्व नाही, दान करू नये, तर ते कुठे आणि कशा पद्धतींची वृत्ती बनवत आहे जसे आळशी,आयते बनवत आहे की कायम मदतीची अपेक्षा करत आहे? दान कोणती नवनिर्मिती करत आहे ? यावर […]

मातृतिर्थ….

 जन्म मुहूर्ताऐवजी स्वराज्य मुहूर्तावर जन्माला आलेले कन्यारत्न म्हणजे स्वराज्यजननी राजमाता जिजाऊ. युगायुगांचा अंधार दूर करणारी ही कन्या. अशा योगावर जन्माला आलेली शक्ती सर्वगुणसंपन्न असते. स्वकर्तृत्वाने मोठी होते व इतिहास घडविते. जन्माचा काळ पारतंत्र्याचा परंतू दोन पिढ्यांपर्यंत मनामनात हिंदवी स्वराज्याची मशाल पेटती ठेवून विजय पताका फडकावली. याचा आनंद समाधान आणि हे […]

बसंत बहार….

नववर्षाच्या खूप खूप आधी मनःपूर्वक शुभेच्छा ! …. दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होणारी आपली संस्कृती , सर्वांना आपलसं करून घेणारी परंपरा….अभिनंदनीय आहे परंतू तेच आपलं समजण्याचा , मानण्याचा नकळत गैरसमज होऊ शकतो. ….                                      […]

मधला मार्ग….

मधला मार्ग काढण्याचे कौशल्य म्हणजे तडजोड…. मला काय वाटते? यापेक्षा योग्य काय हे समजले की तडजोड करायला सोपे जाते. समाजमान्य व्यवस्था सुरळीत व्हाव्यात म्हणून जेवढे आवश्यक आणि शक्य होते तितकी तडजोड नक्कीच करावी. व्यवस्थापनातील आदर्श यशाचा मार्ग आहे. हे व्यवस्थापन समाजमान्य व्यवस्था म्हणजेच कुटुंब, नातेवाईक, कामाचे ठिकाण, परिसरातील व्यक्तींशी समायोजन, […]

इंद्रधनुष्य…

   चालायला लागले की पायाखाली काटे असणार, येणारच…. तरीही संघर्ष करत दृष्टी वर उचलती ठेवली की क्षितिज खुणावत असते.  पायातले काटे टोचत नाहीत तर गती वाढवतात…. क्षितिजाकडे जाण्याची. क्षितिजाचे खुणांवणे भारावून टाकणारे असते. प्रत्येकाचे क्षितिज असतेचं पण आपण दृष्टीचा कोन बदलायला बहुधा तयार होत नाहीत. आकार, रेषा, व्याप्ती हा  दृश्यभाग […]