पाऊलवाट….

5 posts

अबोलवाट….

  रुक्मिणी रोज पहाटे बागेतले फुलं तोडत असे…आज मात्र फुले तोडताना हातावर दुसरा एक हात पडला….आणि आईवडीलांकडे आग्रही मागणी करून कायमचा हातात घेतला. चालून आलेलं चांगले स्थळ म्हणून लगेच होकार… आणि परीक्षा तोंडावर आलेली असताना विवाह सोहळ्याचा घाट शिक्षण,वाचन काय काय सगळ्यांवर हा हात फिरला!            […]

देवीचे कवचकुंडल….

   दिवसाचे सोपस्कार करून झाले.घरातील सर्वजण,भेटायला येणारे नातेवाईकांचे रडणे, सांत्वन ऐकून, बोलून, थकून झोपले होते….ती मात्र आज समाधानाने,भयमुक्त होऊन बाळाकडे पाहून शांत झोपली होती. तिचा संसार नव्याने सुरु होणार होता. एका तपानंतर शांत चेहरा उत्साही दिसत होता. सगळा भूतकाळ विसरणार होती. ठरवून केलेलं अगदी सगळंकाही. तिच्याजवळ दुसरा पर्यायच नव्हता!कामाला गेल्यावर […]

लाख मोलाची गोष्ट

आई-वडिलांची….सात पिढ्यांचा उद्धार करणारी एकुलती एक लाडाची लेक, त्यांच बावन्नकशी सोनं! हा ‘बी’…. घडवलेला दागिना आणि फक्त मुलगा म्हणून लहानपणापासूनच, दीड शहाणा लाडोबा असलेल्या दोघांचे दोनाचे चार हात केले की बहुतेक अर्ध्या हळकुंडात पिवळे होतात की काय?असा एक उगीचच झालेला समजं! एक दीड शहाणा आणि एक दुप्पट शहाणी असा साडेतीन […]

पाऊलवाट

पाऊलवाट….

अनुसया आक्काचे एक एक पाऊल संसारात पुढे, तर मनाला  विरक्ती आल्यामुळे तिचा घरधनी माणिक याचे दिंडीतून एक एक पाऊल कायमचे पंढरपूरच्या दिशेने पडत होते.“विठ्ठल विठ्ठल”, म्हणत म्हणत तो कधी विठ्ठलमय झाला तिला समजलेच नाही. अचानक एक दिवस सगळा संसार अर्ध्यावर सोडून कायमचा पंढरपूरला निघून गेला. कधीतरी मुलांची आठवण आली की […]

पावसाची झड

पावसाची झड

एकसारखी पावसाची झड सुरू होती…. अन् शेणानं सारवलेल्या अंगणात सात महिन्याच्या बाळाला छातीशी घट्ट कवटाळून, खाली मान घालून बसलेली उर्मिला. ती वाहणाऱ्या पाण्याचा विचार करत होती. जमिनीवरच्या, डोळ्यातल्या की अंगाला चिटकून बसलेल्या जीर्ण लुगड्याला भिजवणाऱ्या माहिती नाही ! तिच्या मनात नेमके काय असते ? अजून तिला हालचाल न करता दिवस […]