झुळूक…

10 posts

माहित आहे का !

मुठभर स्वातंत्र्य, चिमुटभर सत्ता, ओंजळीतील निसटते अधिकार… आश्रित,शोषित,पिडीत,जन्मापूर्वीच मृत्यूसारखे अनेक ढीगभर प्रश्न! माहिती आहेत का ! खरं सांगा माहिती आहे का! या सोबतच दररोज एक पाऊल पुढे टाकताना… पुरूषाच्या तुलनेत एका स्त्रीचा प्रवास? शांत, एकांत आणि कधी निवांत क्षण? ते घर, ती जात आणि ती एक बाईमाणूस याच्या पुढेही स्त्री […]

दिवाळसण

  दिवाळ सण, कशास सजले? कुणीतरी म्हणे, फटाके खुपले ? काय जपता, विचार बुरसटले? कोणी बोलले, दुःख हे ओले।। घरअंगण,मन, सारे पानावले जमेल तसे,मग दाते जमले घरोघरी उत्साहाने, दीप चेतले भर पावसात,सण गोड झाले।।   पांडव, चूल, किल्ले बनवले बोळक्यातूनि,दुध साळ सांडले लाह्या बत्तासे, गोड वाटले सारे मांडले, सारे आवरले।। […]

प्रकाशित क्षण…

      झुळूक या काव्यसंग्रहाचे …. इरा प्रकाशन, लातूर तर्फे….  95व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात उदगीर येथे…. संमेलनाध्यक्ष  सन्माननीय श्री भारत सासणे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.    

बाय माझी…

    बाय माझी…. बोलीभाषा मराठवाडी.. बाय माझी सुगरणं सुगरणं साताची घरीदारी रानीवनी कष्ट तिच्या हाताची।।धृ।। गारपाण्यानं गं वली, सारवते भुईसर चोपडं गं अंगण, सारा परवार घोंगडी नेटकीचं, बाजेवर गोधडी यळ झुंझरूकाची कामं पोतराभुईची।। राबतं गं जातं, एकलं तिच्या साथीला रामंसीता नाते, सारे गं तिच्या ओवीला पिवळीचं पीट बाई, आलं […]

ती ठिणगी….

  प्रत्येकाला इच्छा स्वप्न, ध्येय असतात. याचा दृढनिश्चय झाला की मग त्यासाठी जिद्द, चिकाटीचे  प्रयत्न यांचे कोणत्याही परिस्थितीत सातत्य टिकवले जाते. कितीही अडचणी, संकटे आणि कठीण परिस्थिती आली तरी ही प्रेरणेची ठिणगी विझत नाही, नष्ट होत नाही. हे एखाद्या ठिणगी  प्रमाणे जपले की ही दुर्दम्य इच्छाशक्ती कायम ज्वलंत राहते. झळ […]

धृवताऱ्यापरी…

    धृवताऱ्यापरी…. माझ्या अक्षरांना, तुझ्या शब्दांना आपल्या गीतांना जगाची का दाद हवी माझ्या रुसण्याला, तुझ्या हसण्याला आपल्या कथांना जगाची का साथ हवी माझ्या फुलण्याने, तुझ्या असण्याने आपल्या बहरण्याने जगाने का राजी व्हावे माझी “मी” अन् माझे “मी” पण आपल्या विरघळण्याने जग का गढूळ व्हावे माझ्या अर्थांना तुझ्या भावनांना आपल्या […]

ध्यान से प्रकृती की ओर…

ध्यान में ये ध्यान लागे ऐसे। नित पथ कौनसा देख पायें।।धृ।। भोर ही भोर जंहा छायें । गहरे रंग के नही ये सायें। उदय निश्चिंती प्रकृती प्रतिमा। रोशनीभरी उजियारी गरिमा। छाये भला अंधेरा किस तरह से।।१।। दिखलांऊ वो भोर किस राहों से । मुग्ध गगन के झिलमील सांये। फिर उभर […]

रोशन राह….

  जीवन की राह नयी, बात वहीं, फिर राह ये चलकर देखेंगे। सच, सच नही तो, ना सही, थोडा झूट सुनकर समझेंगे। इमान, मान की लौ कहीं, चिराग मे जलकर सोचेंगे। सपनो मे कहीं, दुनिया है वहीं, ख्वाबोंको संभलकर रखेंगे पर नही, उडान की जिद् यहीं, तारोंकों समेटकर लायेंगे। हार […]

संघर्षसरिता….

  सरिता, निश्चल शीतल रेत उष्मा, स्तब्ध अविचल। सरिता शैल, संघर्ष हर मील सरिता मौन, पनघट सिसके जान ले कौन ? सरिता जीवन, नीत नये वन अनुभव से जाने मन मन । तिमिरत्यागी, फिर नभ मे सुखदभोर, पंछी गुंजते मान ले कौन ? हरियाली किनारे आये कहांसे गिले किनारे, पैर […]

ओजसबिंदू….

  सांजवेळी नित्य निळ्या निळाईचे… क्षणात लोपणे  केशरकाल्याचे… शब्दफुलांचे गंध दरवळती साठवणींचे… क्षणभराचे अस्तित्व अर्थांचे… शब्दांचा शोध घेती भावमनीचे… अर्थ खेळ सारे चालती गुढरेषांचे… प्रकाशने नीत घडती कवितांचे… लोप पावणे भासे का चांदण्यांचे… विखूरणे अंती गोफ चंद्रिकांचे…                  प्रकाशकण जणू अक्षर काजव्यांचे…    […]