आजीच्या आठवणी १)आषाढी एकादशी देवा विठ्ठलानं केली रूकमिनं वागाट्याला गेली तिनं सवळ्याची वटी केली ( वागाटे नावाची एक रानावनातील फळभाजी जी आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागात खातात.) २) रूसली बाई रुकमिना विठ्ठला शेजारी बसना ! तिला गरदी सोसंना… भोळ्याभाळ्या भक्तांची तिला गरदी सोसंना! रूसली बाई रुकमिनी जाऊनी […]
गावाकडच्या गोष्टी….
आजीच्या हातची चव बाय माझी सुगरणं सुगरणं साताची घरीदारी रानीवनी कष्ट तिच्या हाताची कालवण खळबट हाटे पीटलं तुराटी कारळी खारानं भरली गं टोपली चरवीही ताकाची वरी चवड भाकरीची… माया, प्रेम, आपुलकी आणि हट्ट पूर्ण होण्याची हक्काची जागा! कौतुक आणि खास पारंपारिक पदार्थांची मेजवानी म्हणजे सर्वांची आवडती आजीच असते. आजीने बनवलेल्या […]
मराठवाड्यातील बोली भाषेतील म्हणी म्हणजे मराठी भाषेचा अस्सल झणझणीत तडकाच. चपखल, मार्मिक नेम धरून काय म्हणतात ते सगळं या म्हणी मध्ये लपवलेल आहे. समजणाऱ्याला अर्थ समजून सांगण्याची आवश्यकता पडत नाही. तसेच त्या भाषेतील शब्दांचे नेमके अर्थही माहिती असावे लागतात. बोली भाषेतील शब्द कोणत्या संदर्भाने घेतलेले आहेत हे देखिल शोधावे लागते. […]
शिक्षण विवेक, पुणे दिवाळी अंक आयोजित लेखन स्पर्धा प्रथम क्रमांक प्राप्त लेख… नदीच्या आठवणी दीपावली सुट्टी! वाणनदीशी गट्टी! माझ्यावर अगदी लेकीसारखं प्रेम करणारी माझी मायाळू आत्या, माझी हक्काची अक्का!अक्काच्या घरी दिवाळीला माझा भारी थाट असायचा. आवडीची फुलं,रंग असलेल्या कापडापासून शिवलेले फुग्यांचा बाह्यांचे झगे, परकर पोलकं आवडीचे कपडे, काचेच्या बांगड्या, रंगीत […]
“स्त्री आणि पुरुषांना कल्पकतेने आपल्या वापरातील आवश्यक असणारे कापडी प्रकार बनवण्याचे कौशल्य घरोघरी प्रत्येकाला येत होते. जुन्या झालेल्या कपड्याचा शेवटचा तुकडा देखील वाया जात नव्हता. कपड्यांचे धागे सुती , रेशमी किंवा लोकरीचे असत. या धाग्यांपासून, कपड्यांपासून काय बनवत असत! चांदवा, लांबण पिशव्या, झोळणा, गोधडी, वाकळ, घोगंती, घोगंता, घोंगडी, पडशी, मोरकी, […]
वाणनदी परिसरात आढळणाऱ्या खैर, बाभूळ, बोर, जांभूळ, आंबा, चिंच, कडुलिंब या झाडांच्या लाकडापासून घरात, शेतात, वापरल्या जाणाऱ्या वस्तू तयार करत असत. आताही काही वस्तू या झाडांंच्या लाकडापासून करतात परंतु यामध्ये साग, सीसम यासारख्या अनेक झाडांचे लाकूड वापरत आहेत. गावाकडे लाकडाच्या वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजे मुसळ, रवी, रविखंबा, मोगरी, […]
शोभेच्या वस्तूंसाठी आपण मातीच्या भांड्याचे प्रकार वापरतो. वारली चित्रकला रेखाटून कुंड्या, फुलदाणी यासारख्या काही भांड्यांचा वापर करतो. सध्यातर चवदार, काहीतरी गावाकडचं, towards nature, ecofriendly वगैरे मध्ये सहभाग म्हणून मातीच्या भांड्यात, मातीच्या चुलीवर काही ठरावीक पदार्थ करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.या पद्धतीने खास वनभोजन आयोजित केली जातात. भट्टीत भाजल्याप्रमाणे शेंगदाणे चवदार […]
गावाकडे प्रपंचाला, जगण्याला आणि शेतीपाण्याचा सारा सौरात करायला लागणाऱ्या वस्तू गावातीलच कुशल कामगार तयार करायचे. प्रत्येकाकडे काहीना काही हस्तकौशल्य असते. परंपरेने आलेले किंवा गरज म्हणून विकसित झालेले असते. सहसा कोणताही कृत्रिम कच्चा माल वापरला जात नाही. परिसरात नैसर्गिकरित्या उपलब्ध काय आहे? आणि याचा उपयोग कसा करता येईल? या […]
कोणत्याही प्रदेशातील सण, उत्सव हे तेथील संस्कृतीचे दृश्य रूप असतात. या सण उत्सवात होणारे बदल हे सांस्कृतिक बदलांची जाणीव करून देतात. भारतीय सणांमधूनच नव्हे तर भारतातील विविध राज्यातील प्रत्येक परंपरेतून देखिल *कृषी संस्कृती* सोबत दृढसंबंध जोडलेला जाणवतो. स्वातंत्र्य पूर्व भारतात जवळपास 98 टक्के जनता शेतीशी आणि शेतीच्या जोडधंद्याशी आधारित होती. […]
मागच्या वाड्यातल्या पिंपळाच्या पानांची सळसळ, पक्ष्यांची किलबिल, कोंबड्याचे आरवणे ऐकून गोधडीतून डोकं बाहेर काढून, डोळे किलकिले करुन वर पाहिलं डोळे भरून आभाळ दिसायचे. धुरकट केशरी, काळसर निळे, मातकट पिवळ्या रंगाच्या आभाळाखालून लगबगीने पूर्वेकडून पश्चिमेकडे शाळेसाठी निघालेले कावळे, बगळे, चिमण्या, पोपटांचे रंगीत थवे उडायचे. झोपाळलेल्या डोळ्यांना हे सगळं अंधुक अंधुक दिसायचे […]