मधुबनी….


सीतेच्या स्वयंवर आयोजनासाठी जनक राजाने मधुबनी कलेने पूर्ण मिथिलानगरी सजवली होती. बिहारमधील मिथीला जिल्ह्यातील आजूबाजूच्या परिसरातील जंगलामध्ये मध भरपूर उपलब्ध आहे. यावरून मधू म्हणजे गोड आणि बानी म्हणजे वचन, प्रतिज्ञा स्वरूपात सांगितलेली गोष्ट…. मधूबनी असे या गावाचे आणि चित्रकलेचे नाव आहे. अदिवासी स्त्रीयांनी निर्माण केलेली अभिजात कला अतिशय सुंदर आहे. ही कला वंशपरंपरेने टिकून आहे. रामायण, महाभारत अन्य पुराणकथा यांतील प्रसंग, देव-देवता, शुभसूचक चिन्हे, घराच्या आत वळलेली लक्ष्मीची पावले, झोपड्यांच्या भिंतीवरुन हळूहळू कापडावर व नंतर कागदावर उतरली. सध्या घरात सजावटीसाठी चित्र, वस्तूवंर कपड्यांच्या विविध प्रकारावर रेखाटली जाते आणि आवडीने वापरली जाते. कागदावरही तिची भव्यता कायम राहिली आहे. भडकपणा दिसून येत नाही. पानाफुलांची वेलबुट्टी,आकृती परंपरेतून आलेली विविध आकृतिबंधाची उपस्थिती जाणवते. टोकदार नाक,रुंद कपाळ, लंबाकार आकृती डोळे, धडापासून वेगळे वाटणारे लांब हात पाय हे आणि हे सर्व दोनमितींमध्ये काढणे असे वैशिष्ट्ये जाणवते. जन्माच्या चक्रघटना चित्रित करते. यामध्ये कमळ, फुले, प्राणी, बांबू, मासे इत्यादी कलाकृती आढळते. ह्यात प्रतिमांना जन्मप्रसार याचे प्रतिनिधीत्व रूप म्हणून दाखवलं गेलेले आहे.सूर्य, चंद्र यांचे वेगवेगळ्या वेळेचे आणि आकारांचे चित्रण केले जाते. यामुळे कुटुंबांमध्ये समृद्धी येते असा समज आहे. ही चित्रकला केवळ सजावटीसाठी नाही तर या चित्रांमधून अधिकतर हिंदू देवतांच्या कथा मौखिक आणि लेखी स्वरूपात जतन करण्याऐवजी चित्रलिपीतून सांगून स्थानिक संस्कृती, परंपरेला रेखाटन कलेच्या माध्यमातून अभिव्यक्त केलेले आहे.या चित्रांसाठी वापरण्यात येणारे रंग हे स्थानिक वनस्पतींपासून तयार केलेले असतात. नैसर्गिक चमक टवटवीतपणा दिसतो. मग कोणत्या वनस्पतींचा उपयोग करतात ? कुसुंबा या फुलांपासून शेंद्री, कुसुंबी रंग तर केळीच्या पानांचा रस व पातळ चुना यांच्या मिश्रणातून सोनेरी रंग, हळदीचा गडद पिवळा, कोळशाच्या धुराच्या काजळीचा काळा, पळसाच्या फुलांपासून पिवळा वेलींच्या पानांपासून हिरवा… असे नैसर्गिक रंग चित्रांमध्ये चैतन्य आणतात.सहसा पारंपरिक चित्रात काळा आणि भुरकट लाल रंग जास्त वापरला जातो. चित्र रंगवताना बाभळीच्या झाडाच्या डिंकामध्ये शेळीचे दूध मिसळून हे रंगमिश्रण म्हणून वापरतात. कधी कधी तांदळाच्या पिठाचीखळं ही वापरली जाते. बांबूची काडी टोकाला घासून सूक्ष्म तपशील रेखाटला जातो व बाह्य रेषांचे रंगभरण करण्यासाठी वापरतात. काडीच्या टोकाला छोटीशी चिंधी बांधून ती रंगांचे मोठे हात,भाग रंगवण्यासाठी वापरतात. दूर अंतरावरून चित्रे पाहिली असता चमकदार रंगांची संगती याच्या सुक्ष्म कौशल्याचे कौतुक केल्याशिवाय रहात नाही.या चित्रांमधून अधिकतर हिंदू देवतांची चित्र आणि कथा चित्रित केलेल्या असतात यामुळे तसेच विविध प्रसंग, माहिती परंपरेने पुढच्या पिढीला देता येणारे ज्ञान चित्ररुपाने देण्याची लिपी जणू हे पिढ्यानपिढ्या हस्तांतरित करत जाणे आहे. हेच आपल्या ह्या रेशमी बंधनांना जपत असते. त्याचे संवर्धन करत असते. म्हणून हे माहिती करून घेतले पाहिजे. पारंपारिक स्वरूपात ठेवून जपले गेले पाहिजे. अस्सलपणा असतो तो मात्र तिथेच असतो त्यातच लपलेला असतो. अश्या कलांचे दिसणे …असणे… यामध्ये एक वेगळेपण असते. त्या कलेचा थाट आणि बाज मूळरूपात दिसतो.चित्रकला केवळ सजावटीसाठी नाही हे ही लक्षात येते. देवतांची चित्रे झाडांच्या खोडांवरही काढतात यामुळे देव असलेले झाड कसे तोडावे ? असा विचार करून जंगलतोड रोखण्यासाठी सुद्धा ही कला महत्त्वपूर्ण भूमिका निभवत आलेली आहे. ही कला दोन प्रकारे रेखाटली जाते, भित्तीचित्र आणि या सगळ्यांना चित्रित करण्यासाठी फरशीवर जमिनीवर एक सरळ रेषा ओढून, पूजा समारंभामध्ये पूजा, व्रत आणि संस्कार या विधींसाठी काढली जाते. भिंतीवर काढली जाणारी चित्रकला खोलीच्या आतल्या भिंतीवर आणि बाहेरील भिंतीवर विवाह प्रसंगी, याशिवाय काही शुभ प्रसंगांना जन्म, विवाह, अनुष्ठान साहित्य, होळी, दिवाळी कालीपूजा, दुर्गापूजा यासाठी कधी कधी रांगोळीमधून देखील सजवली जाते यामध्ये कल्पकता दिसून येते. बोटांची नखे, फांद्या, ब्रश, निबपेन, काडीपेटीच्या काड्या, बांबूच्या काड्या यांच्या साह्याने भौगोलिक आकर्षकता दाखवली जाते. पारंपारिक झोपडीच्या भिंतीपासून ते आता कपडे, हस्तनिर्मित वस्तू, कागदावरील चित्रापर्यंत विस्तारली आहे.एक लोककला जीवनातील किती गोष्टींवर प्रकाश टाकत असते. या अशा कितीतरी लोककला आपल्या भारतामध्ये आहेत. याचा अभ्यास, माहिती घेणे म्हणजे संस्कृतीचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचणे असते. कारण एकात एक असे माहितीचे गुंफलेले अनेक धागे असतात ज्यामुळे प्रत्येक वेळी हा धागा काहीतरी सांगत असतो. हे धाग्यातून पोहोचणे खूप समृद्ध करून जाते. हे असे अनेकप्रकारचे छोट्या छोट्या गोष्टीतील समृद्धानुभव मिळवण्याचा आणि व्यक्ततेचा आणि जपण्याचा प्रयत्न सुद्धा आनंद निर्माण करत असतो.

चंद्रकळा….

  अंधाराची साडी तिला चांदण्याची खडी….  ” नेसले ग बाई मी चंद्रकळा ठिपक्यांची, “तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या कृष्णाची”. “आठवणीतील चंद्रकळे वर… […]

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

8 thoughts on “मधुबनी….”