आपल्या संस्कृतीचा, धर्माचा, वेदांचा आदर्श मूळ ईश्वरवाद आहे. हा ईश्वर एकच आहे.
ईश्वरवादाच्या त्रिशक्ती म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश. या अतिउच्च पातळीवरील अलौकिक शक्ती आहेत. या शक्तींच्या अंगी अगणित गुणवत्ता आहेत. या त्यांच्या अंगी असलेल्या प्रसन्नतेचे, सर्वोच्च ज्ञानाचे, चमत्कारिक अवतारांचे, विविध अवतारातील केलेल्या कार्याचे, झालेल्या साक्षात्कारांचे या सारख्या अनेक दिव्यतेचे आपण भक्तीभावाने गुणगान करतो. कशासाठी ? तर आपल्या गरजा, इच्छा, पुढे आणखी इच्छा पुर्ण होण्यासाठी. तर कधी कशासाठी !…. पण यासाठी या शक्ती नाहीत… सर्व जाणीवांनी भरलेल्या या शक्ती अणू पासून अवकाशापर्यंत सर्व काही त्याचेच अस्तित्व, त्याचीच उपलब्धी… या शक्तींचे अस्तित्व दिसून, जाणवून देण्यासाठी कारणही तेवढ्याच योग्यतेचे असावे लागते. आतापर्यंतचे भगवंताचे अवतार पाहिले तर हे नक्कीच लक्षात येते… की जेव्हा जेव्हा ईश्वरवाद धोक्यात येतो, नास्तिकता वाढते या शक्ती विविध रुपात अवतारस्वरूप येतातच. उदा. हिरण्यकश्यपूने आस्तिकता धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला… परिणामी भक्त प्रल्हाद हा आस्तिक म्हणून निर्माण होणे हे ईश्वरीय अंशतः प्रकटीकरणाची कृती….त्याच्या प्रयत्नांना तरीही हिरण्यकश्यपू बधला नाही, मग मात्र पूर्णतः अवतार घेऊन त्याची नास्तिकता आणि त्याचा नाश करण्यासाठी या शक्तींना प्रकट व्हावेच लागले. म्हणजे कधी कधी आहेत त्या व्यक्तींमध्ये सुद्धा या शक्ती आपले अस्तित्व दाखवत असतात उदा. संत ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, यासारख्या व्यक्ती अलौकिक असे कार्य पार पाडत असतात. ही अलौकिक शक्ती या दैवी व्यक्तींमार्फत काम करत असते. आपण ईश्वरवाद या अर्थाने समजून घेत नाही… केवळ आकर्षण कथांचे आणि गाऱ्हाणे व्यथांचे! कसा येईल तो ? विश्वाला आणि विश्वाच्या बाहेरील अविश्वनीय ठिकाणी सुद्धा या शक्तींची व्याप्ती व उपस्थिती आहे. म्हणून तर काही गोष्टी आपल्या आकलनशक्तीच्या पलीकडील, नियंत्रणच्या बाहेरील असतात. परंतू त्या संचलित होत असतातच. त्याचे संचालन होणे आपल्या लक्षात यायला आपल्यात कमतरता असते. या तीन शक्तींचे प्रतिक म्हणजे ओम चित्त एकाग्र करणारे दर्श प्रतिक, शुभचिन्ह, या विश्वाच्या शक्तीकेंद्रातून येणारा ध्वनी, आपल्याला या शक्तींशी जोडणारा जप, आत्मज्ञानाची सुरुवात करणारा शांतमार्ग ….अर्थमार्ग ….. या तीन शक्ती कशासाठी ? एक शक्ती आवश्यकतेनुसारच निर्माण करते, एक निर्माण केलेली व्यवस्था चालवते आणि एक आवश्यकतेनुसारच यातील अनावश्यक भाग भस्मही करते. हे लक्षात आलेेे की अर्थ उलगडायला लागतो … अर्थ असा की दोनच गोष्टी सत्य असतील ईश्वरता आणि नश्वरता ! म्हणजे हे विश्वाचे निर्माण ते निर्माल्य होणे …निसर्गाच्या नियमांनुसार होत असते. या शक्तींनी निर्माण करून परत त्यांच्यातच सामावलेले असते. या शक्तीनां ना रूप, ना गंध, कुठलाही बाह्यलेप नसतो…जे काही बाह्य लेप लावतो ते आपणच…मुळात या शक्ती म्हणजे अंशतः ते पुर्णतः होणारे प्रकटीकरण असते. जेव्हा जेव्हा या विश्वात, अविश्वात ईश्वरवाद, आस्तिकता लयाला जायला लागते, संपुष्टात येण्यासाठी नास्तिकतेचे असुरी प्रयत्न वाढायला लागतात. त्या त्यावेळी त्याला उत्तर देण्यासाठी आणि आस्तिकता, ईश्वरवाद पुन्हा एकदा प्रस्थापित करण्यासाठी या शक्ती अंशतः ते पूर्णतः जेव्हा आणि जेवढी आवश्यकता तेवढी ही शक्ती स्वतः चे अस्तित्व दाखवतं असते. आपण अशा शक्तींना सहकार्य केले पाहिजे हेच आपले कर्म असते….यापेक्षा अधिक म्हणजे कधी कधी अवतार न घेताही या शक्तींनी स्वतः चे अस्तित्व दाखवल्याचे अनेकदा सिद्ध झालेले आहे. देवमाणूस घडतो तो अश्या शक्तींनी त्या व्यक्ती मध्ये केलेल्या अशंतः प्रकटीकरणामुळेच. मग अशा शक्ती कधी कार्यरत होतात ? तर जन्मापासून या आस्तिक शक्तींना सहकार्य करत करत व्यक्तींचे वर्तन घडले की, या तीन शक्तींंना ती व्यक्ती योग्य वाटल्यानंतर, त्या पातळीवरची जाणवल्यानंतर निश्चितच अंशरूपाने त्या व्यक्तीमध्ये ही दैवी शक्ती प्रवेश करून प्रकटीकरण करत असते. यामुळे दर्श स्वरूपात आपल्याला त्या व्यक्तींकडून , त्या समूहाकडून भव्य दिव्य कार्य घडलेली दिसतात .आपण मुळातच असा विचार करत नाही आपल्याला असे वाटते की देव म्हणजे नमस्कार, चमत्कार, यथासांग पूजापाठ केले की झाले आणि पावले. याचा अर्थ असा नाही की या सोपस्कारांना महत्त्व नाही ! आहे, नक्कीच महत्त्व आहे! या प्रक्रिया म्हणजे दृश्यभाग आणि स्वतःचे भक्तिभावाने करून घेतलेले समाधान होय. परंतु यामागचा ईश्वरवाद, ईश्वर समजून घ्यायचा प्रयत्न सुरू झाला की या सर्व कृती आणखी अर्थपूर्ण होत असतात परिपूर्णतेकडे जायला लागत असतात. परंतू जर फक्त अनुकरण आणि नियमन करत त्यातच अडकून पडले की कालांतराने शंका निर्माण होऊ लागतात किंवा जगात चाललेल्या बुद्धीभेदांमुळे या शक्तींविषयींचा आत्मविश्वास व विश्वास कमी होऊ शकतो. स्वतः च्याच मनात जर शंका असतील तर कोणत्या अर्थाने आपण हे सगळं करत आहोत याचेही भान रहाणार नाही. हे भान यायलाच हवे. यासाठी कोणत्याही अध्यात्मिक किंवा धार्मिक विधी, कथा यापाठीमागे आचार विचारांचे यथोचित कारण असते. हे समजून घेणे महत्वाचे ठरते.कधी कधी केवळ तेच तेच आहे म्हणून अर्थांपर्यंत पोहोचण्याऐवजी विचारशून्य कृतींकडे वाटचाल होण्याचा धोका जास्त निर्माण होतो. परिणामी संस्कृतीच्या, धार्मिक संकल्पना स्वतःच्याच स्पष्ट नसतील तर इतरांना काय सांगणार? उदा. एखाद्या अवतारामध्ये भगवंताने एखाद्याचा उद्धार केला असेल तर यातील चमत्कार बाजूला सारून…भगवंतानी केलेले दिशादर्शन, मार्गदर्शन, संकटातील मदत, वगैरे सारख्या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत. उदा. प्रभू श्रीरामांनी केलेला अहिल्येचा उद्धाराची गोष्ट, ती खरेच शीला बनली असेल का ? नक्कीच नाही! तर तिचे अस्तित्व निर्जीव दगडासारखे झाले होते म्हणून तिला योग्य दिशा दाखवत तिचे जीवन पुर्ववत केले गेले. चमत्कारांच्या मागील अर्थ साक्षात्कार झाला की खरेपणा कळतो सगळं विश्वसनीय वाटू लागते.दीर्घ काळाच्या ओघात कदाचित काही गोष्टी रचलेल्या असू शकतात. हे नैसर्गिक आहे कालांतराने बदल होऊ शकतो .म्हणून सर्वच खोटे नसते, खरे काय असू शकते ? याचा आपण कधीच विचार करत नाही ! त्या दृष्टीने विचार करत गेले की उत्तर सापडते आणि अंधश्रद्धेच्या ऐवजी आणखी श्रद्धा वाढत जाते तसेच प्रत्येक गोष्ट करताना योग्य तो भाव निर्माण होऊन प्रत्येक कृती केली जाते. या नजरेने आम्ही आमच्या भगवंताकडे पहातच नाही. आपल्या कडे अनेक विषय आपण हाताळतो.. अभ्यासतो ….हे धार्मिक, अध्यात्मिक, संस्कृती , प्राचीन परंपरेने आलेल्या गोष्टी, कथा, कृती याचा अभ्यासविषय म्हणून वेगळ्या पद्धतीने वाचन का करत नाहीत ?… का समजून घेत नाहीत ? केवळ देवघरासमोर बसून वाचनासाठी हे साहित्य नाही तर हे वाचत असताना का , कशासाठी, कोणी, कधी असे प्रश्न निर्माण झाले की योग्य ते उत्तर सापडतेच…कारण या आपल्या सर्व अतिप्राचीन साहित्य रचनाच सर्व शंकांना दूर करू शकतात..त्याच्या नंतर झालेल्या आवृत्तीत व्यक्तीनिष्ठता आलेली असू शकते. ही व्यक्तिनिष्ठता बाजूला सारत मूळ स्वरूप समजून घेण्यासाठी आवश्यकता आहे ती तो दृष्टिकोन बदलून अभ्यास करण्याची… विश्वास ठेवून वाचन केले की अविश्वसनीय, अविश्वकोशीय गोष्टी मागची नेमकी भुमिका लक्षात यायला लागते.
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
11 thoughts on “मूळस्वरुप…..”
नवीन पिढीला अतिशय मार्गदर्शक, तसेच चालू पिढीला वेगळा विचार करायला लावणारी पोस्ट
सुंदर
खरे आहे, आपली धार्मिक पुस्तके अभ्यास विषय म्हणून वाचली पाहिजेत…केवळ पुण्यदायी कथा म्हणून नको.💐👌👍
संभ्रम ,शंका असणाऱ्या गोष्टींचे विश्वसनीय स्पष्टीकरण, धन्यवाद ! अध्यात्म स्पष्टीकरण पद्धत अतिशय भावनारी आणि उच्च दर्जा ची…अंधश्रद्धेला थारा नसलेली श्रद्धास्थान.. श्रद्धावान…💐💐 स्वतः सोबत आमच्या ही शंकादूर करणारी..या वयात आयुष्याच्या पुढची..अनाकलनीय समज आहे खूप खूप कौतुक आहे.. आम्ही ही यापद्धतीने कधी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही… अनेक आशीर्वाद पुढील कामासाठी
एखाद्या उच्च अध्यात्मिक व्यक्ती कडून ऐकल्यासारखी विषय मांडणीएकदम सोपे करून नक्कीच आवडेलवाचायला नवीनविचार धार्मिक वाचन अभ्यास म्हणून, जसं आहे तसेच समजतो म्हणून कधी शंका…हे सोपेपण आवडले,भावले
खरचं आहे अवश्यकता आहे ती प्रत्येकाने दुष्टीकोन बदलण्याची आणि वेगळा विचार करण्याची हा लेख खुपच मनाला भावला नव्या पिढीला नाही तर चालू पिढीला पण मार्गदर्शक आहे मला तर वाटतं हा लेख सर्वांनी वाचावा
ह्दय स्पर्शी लेख..
कमी वयात खूप मोठी जाण.सगळयाना समजेल अस विश्लेषण.👌👌👌
👆vandana karhad
सुंदर विश्लेषण
डोळस श्रद्धेला खतपाणी घालणारे विचार
कमी वयात खूप मोठी जाण.सगळययना समजेल अस विश्लेषण👌👌👌