अंधाराची साडी तिला चांदण्याची खडी….
” नेसले ग बाई मी चंद्रकळा ठिपक्यांची,
“तिरपी नजर माझ्यावर या सावळ्या कृष्णाची”.
“आठवणीतील चंद्रकळे वर…
हळदी कुंकू डाग पडे….
संक्रांतीचे वाण घ्यावया
पदर होतसे सहज पुढे”….
“आणिक ही चंद्रकळा भारी माझ्या आवडीची !
पदराला चंद्रचंद्र नक्षत्रांच्या कशिद्यायची”. (रचना संदर्भ: इंदिरा संत,शांताबाई शेळके,गवळणी.)
मराठी भाषेत साहित्य निर्माण होऊ लागले होते तेव्हांपासून विविध वस्त्र प्रकारांचे संदर्भ आढळतात. कोणकोणते पात्र कोणकोणती वस्त्र परिधान करतात, या प्रकारचे ऐतिहासिक उल्लेख वस्त्रांचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचे असतात. एकनाथांच्या गवळणीतून आणि यादवकाळातील बोरीकर यांच्या एका ग्रंथात चंद्रकळेचा उल्लेख सापडतो. चंद्रकळा साडी बद्दल कितीतरी प्रकारच्या ओव्यांचे व गाण्यांची लोकगीतांचे संदर्भ जुन्या साहित्यात आढळतात.
संक्रांत ऐन सुगीतला आणि थंडीतला सण. तिळातिळाने दिवस मोठा आणि रात्र छोटी होत जात असते. ही संक्रमणाची… शेवटची.. मोठी रात्र आठवणीत ठेवण्यासाठी निसर्गोत्सवाच्या रात्रीच्या छटेला… स्थित्यंतराला… रेशमी साडी वर रेखाटण्यासाठी कारागिरांनी कोणता विचार केला असेल ! थंडीच्या दिवसात काळा रंग उष्णता शोषून घेतो म्हणून या रंगाचा वापर. रात्रीच्या गारव्यातील आकाश, त्यात लपाछपीचा खेळ करणारी चंद्राची कोर आणि चांदण्या! कधी त्याही गारठलेल्या आणि गोठल्यामुळे धूसर होतात… ढगातून, आकाशातून सावकाश धावताना दिसतात. या लपाछपीचा खेळात एकमेकांच्या मागे धावताना मात्र आपल्याला नजरेस पडतात त्या धूसर आणि गडद होणाऱ्या चंदेरी छटा…. आणि ढगांच्या आकाराचीच काठाला तयार झालेली चंदेरी किनार गुढ रंगात,काळोखातही…. चमकती किनार…. काळा, राखाडी आणि चंदेरी चमचमता खेळ! हा खेळ साडीवर वस्त्रांवर चितारण्याचे कौशल्य भारीच! निसर्गाच्या रात्रीचा मूळ रंग, मूळ रूप काही जणांना अशुभ वाटते पण या दिवसात मात्र रंग हा दिमाखात मिरवतो. हे सगळ सौंदर्य कपड्यांवर दाखवायचे तर भाषा कोणती ? ही भाषा रंगांची, रंगाच्या गूढ अर्थांची, चंद्र चांदण्यांच्या फुलीची भाषा. ही खडीची भाषा फार पूर्वीची.. ही खडी, चंद्र, चांदण्यांच्या वेगवेगळ्या फुलांच्या छाप्यांतून काढली जायची. या नाजूक, सौंदर्यपूर्ण कल्पनांची भेट नवसुवासिनींं सोबत सर्वांनाच प्रिय आहे. काळाच्या ओघात चंद्रकळेला कळा येऊ नये एवढेच !
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
11 thoughts on “चंद्रकळा….”
शब्दसौंदर्य अप्रतिम ! वस्त्र बनवणारे, नेसणारे, आणि पहाणारे भावविश्व समोर येते….
बंध रेशमाचे छानच
सगळे रंग निसर्गाचे 👌
Khup chan varsha, really great work
जुन्या गोष्टी जपल्या पाहिजेत
Kuph chan varsha …kiti chan lihites
छान शब्द संकलन!
चन्द्र कळा आज पण महिलना तेवढीच प्रीय आहे ‘काळी पैठणी प्रतेकीला हवी हवी शी आणी सकाळ संक्रातीला तिला विशेष मान अशीही चंद्रकळा
छान!
चंद्रकळा फारंच छान 👌🏻👌🏻😊
चंद्र कला खूप छान लिखाण
चंद्र कला खूप भावली!!