रोशन राह….

 

जीवन की राह नयी, बात वहीं,
फिर राह ये चलकर देखेंगे।
सच, सच नही तो, ना सही,
थोडा झूट सुनकर समझेंगे।
इमान, मान की लौ कहीं,
चिराग मे जलकर सोचेंगे।
सपनो मे कहीं, दुनिया है वहीं,
ख्वाबोंको संभलकर रखेंगे
पर नही, उडान की जिद् यहीं,
तारोंकों समेटकर लायेंगे।
हार मे जीत,जीत मे भी हार,
हार के लिए लडकर सिखेंगे।
अपने, दुनिया के रंग हसीन,
रंगोंकों बिखेरकर जायेंगे।
आखरी राह वही, बात नई,
राह ये चलकर देखेंगे,
आये यहीं जाना वहीं,
नूर मे चमकर जायेंगे।

अर्थः प्रत्येकाच्या जीवनाचा मार्ग वेगवेगळा, नवनवीन…. प्रत्येकाला माझी वाट, रस्ता वेगळा, मी आणि मला येणारा अनुभव वेगळा असं वाटत असतं. असे असले तरी सर्वांचे सत्य शेवटी एकच असते. कसेही, कोणत्याही मार्गाने गेले तरी प्रत्येकाचा थांबा, शेवटची वाट एकच असते. हे माहिती झाले तरी आणि माहिती होत जात असले तरी पुन्हा पुन्हा ही वाट चालून पहावीच लागते. समोर येणाऱ्या वाटा आणि आपण दोघांनाही थांबवून भागत नाही. वाटेत येणारे, जीवनात येणारे अनुभव, प्राप्त झालेले ज्ञान आपल्याला अंतिम सत्याकडे घेऊन जाणारे असतात. म्हणून सगळं माहिती आहे तरीही चालून पाहूयात. काहीजणांना ते सत्य, सत्य नाही असेच वाटत असते. नाहीतर नाही! ज्याची त्याची वाट आणि होणारी पहाट ! ठीक आहे. खूशाल रमू द्यात ! खोट्या गोष्टींमध्ये. तो सगळा विनाकारणचा अट्टहास, त्रास, खेळ शांतपणे पाहूया. त्यांना समजून घेऊयात. समजून घेण्यासाठी, ओळखण्यासाठी त्यांच्या खोटयावरही अधांतरी विश्वास . स्वतःलाही समजावून घेऊ ! माहिती असूनही हे असच आहे असचं असत ! कधी कधी आपली स्वप्न, कामे, इच्छा-आकांक्षा, जगणं वगैरे सगळे एकीकडे आणि जग दुसरीकडे होत असते . म्हणून ते सगळं सोडून देत का कोणी? खरे तर सगळे नियोजित ! आहे तिथेच असते. तरीही या उमेदीला, स्वप्नांना किमान सांभाळून तरी ठेवू. सांभाळले म्हणजे त्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. पण हे स्वप्न असाधारण असेल तर ! कारण आपण एकीकडे आणि जग दुसरीकडे एकाच वेळी घडते ते म्हणजे आपली शेवटची वाट, रस्ता, मार्ग याचा शोध आणि बोध व्हायला लागला की. याला सांभाळले की, तो मार्ग कसा लख्ख करता येईल याचा विचार म्हणजे जपणे. हा मार्ग लख्ख कर्मानेच होतो. कधी कधी आत्मसन्मान, स्वाभिमान, स्वतःला जड करणाऱ्या…. वगैरे स्वतःविषयीच्या गोष्टी सुद्धा त्याग करून, सोडून , द्याव्या लागतात. हलके व्हावे लागते खऱ्या अर्थाने…एकदम निर्लेप. विनाकारण अनावश्यक त्रास करून घेण्यात काय अर्थ? त्या स्वतःसाठीच असतात. दुसऱ्यांनी मान्य कराव्यात यासाठी कोणताही अट्टाहास करू नये. तर त्या स्वतः जपाव्या लागतात. कधी गैरसमज होतो. आपल्या मौनाचा अर्थ आपल्यालाच त्रासदायक होतो. या सर्व गोष्टींच्या बाबतीत स्पष्टीकरण नाही देऊ शकत प्रत्येकजण. म्हणून कितीही संकटे आली तरी आपण आपल्याशी प्रामाणिक असावे. हेतू चांगला असावा. भलेही दोषारोप होतील कदाचित सिद्धही होतील परंतु शेवटी सत्य आपल्यालाच माहिती असतं. आत्मसन्मानाला, स्वाभिमानाला ठेच लागली म्हणून यातून भस्म होऊ नये. यापेक्षा त्याची ज्योत आपल्या मनात कुठेतरी ठेवावी. दुसऱ्यांनी दोष दिला, चुकीचे समजले तरी जसे, ज्योती मुळे दिव्यालाही उष्णता जाणवते तसेच असते. पण तरीही ज्योत आणि दिवा एकमेकांची सोबती त्याचप्रमाणे शरीराला, मनाला त्रास झाला तरी सहन होत असतो. उष्णतेत स्वतःला स्वतःहून तप्त होऊन आणखी जवळून तेजाळते….. कोणतीही तक्रार न करता .पहिल्या कडव्यातल्या सारखे ते खोट आहे पण तरीही आपल्याला समजावून घ्यायच आहे म्हणून सगळं ऐकून घ्यावे लागते. पण सत्य सुटत नसते. कारण ज्योत, दिव्याप्रमाणे जळत राहणं आपल्याला निखारतं, उजळून टाकतं, आपल्यासोबत इतरांनाही नकळत प्रज्वलित करत असतं. ही एक गोष्ट झाली अशा जीवन जगताना अनेक गोष्टी, अनुभव, अनुभूती संकट, प्रसंग, मार्ग… कधी कधी न ठरवता अचानक वाटेत येतात. पंख छाटण्याची अवस्था होते तरीही उंच उडण्याची आशा इच्छा मनात असते. कारण ती पंखात नसते तर मनात असते. जवळ काहीही नसताना उंच भरारी घेण्यासाठी आकाश पाहण्यासाठी वर जाता येत नसले तरी खंत वाटत नाही कारण जडत्व कमी झाल्यामुळे हलके झालेले असतो. विचलित न होता प्रत्येक कृती आत्मविश्वासाने…तितक्याच ताकदीने घडत असते म्हणून उलट अशक्य तेही प्रयत्न करत असतो…म्हणूनच आकाशातील तारे एकत्रित करून जमिनीवर आणण्याची तयारी. हे तारे, हे ग्रह यांचा खेळ आणि आयुष्याचा मेळ घातला जातोच की कधीकधी. यापेक्षा यांना हिमतीने जमिनीवर आणून हवा तसा एकत्र मेळ घालता आला तर ! असा विचार आणि प्रयत्न . माहिती असतं हे शक्य नाही…. आयुष्यात कधी हार, माघार स्वीकारणे म्हणजे जिंकणे असतं तर कधी जिंकले तरी तो पराजय असतो. हे जिंकणे आणि हारणे कशासाठी ? आणि का ? या प्रश्नावर ठरते. हे ठरलं की हारण्यासाठीसुद्धा स्वतःशीच लढावे लागते. जिथे हरलेच पाहिजे ! म्हणून ही स्वतःच स्वतःची लढाई सुद्धा हसत हसत लढून पाहुयात. स्वतःला ओळखून, जाणून स्वतःच्या जगण्याचे रंग आणि जगाचे रंग एकूण सगळे रंग, सगळे प्रकार जगून पाहूयात. आनंद देऊ आणि घेऊयात. कारण कधी कधी वाट पहाण्यातच वेळ निघून जाते…वाट दिसते पण त्यातून मार्ग निघेलच, असे नसते…फक्त प्रयत्न आपल्या हाती… हे सगळं करत असताना आयुष्याची संध्याकाळ वाट पाहत असते. पहिल्या आणि दुसऱ्या कडव्यातल्या प्रमाणे अंतिम सत्याकडे, स्वतः ज्योती प्रमाणे, शेवटच्या वाटेकडे तेवत, उष्णता सहन करत करत. खरेतर ही शेवटची वाट प्रत्येकाची एकच… पण आयुष्यभराची, जीवनाची बात, गोष्ट फक्त वेगवेगळी…. इथेच येणार होतो आणि तिथेच जाणार आहोत ! हे समजले की फक्त मधला सगळा खेळ समजायला लागतो. इतर सर्व गोष्टी दिसेनाश्या होतात… याचा अर्थ फक्त तीच वाट नजरेत असते… तेजस्वी… ज्याची त्याची प्रकाशमय… तिथे अंधाराला थारा नसतो. शांततेजस्वी ज्योत… यासाठी सगळा प्रयास… प्रवास… आयुष्याची प्रभात… तेजस्वी ज्योत म्हणजेच ईश्वरी तेज… नूर… या तेजस्वितेचा अनुभव हृदयामध्ये..मनामध्ये… घेऊन जाणे.

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

10 thoughts on “रोशन राह….”