शरिर घट….


सध्या पाणी घटामधे ! शरिरामध्ये प्राण त्याचप्रमाणे आहे. म्हणून कोरड्या मातीचा घट म्हणजेच हे कोरडे शरीर या  प्राणामुळे थंड आहे मग घट कसा कोरडा असेल ! जोपर्यंत एखादी गोष्ट आहे तोपर्यंतच त्याचा प्रभाव असणे, पंचप्राण अनुभूती आहेत म्हणून तर देहालय हे देवालय आहे.. हे नसेल तर शरीर सौंदर्य फक्त देखावा आहे. पाण्याच्या गुणधर्माप्रमाणे नितळपणा, निखळपणा,  निरलसपणा नसेल तर  किंवा असून यामध्ये घट होत असेल तर ! म्हणजे ज्याप्रमाणे घटातील पाणी  कमी होते  तशीच घट  होत असेल तर ! आणि जर शीतल थंडपणे , शांतपणे, हळूहळू नकळत हे पंचप्राण विचाराने दुषित केले तर वाईट कर्म घडणार मग घट होत असल्यामुळे, ती घट, नुकसान भयानक असेल ? कल्पना न केलेली बरी. जल जीवंतपणा, प्रवाहीपणा फक्त घटामधे शरीरामधेच, शरीरविषयक विचार असेल तर शरीराचाच घडा क्षणिक सुखाने शांत होईल. घट घटवून तयार केलेले कर्म, चित्त कसे शांत होईल ? जल पाण्याप्रमाणे प्रवाहीपणा, नितळपणा, वाईट ते काठाला लावून पुढे वाहत जाण्याचा गुण स्विकारला पाहिजे. याऐवजी शरीररूपी घटामधे जल कमी होत जात असताना इथे जल म्हणजे जळणे, द्वेष या अर्थाने जर गुणांची घट, म्हणजे कमतरता होत जात असेल होत असेल तर शीतल शरीर व मन होईल. मग शरीरविषयक विचार कमी झाल्यामुळे तो घट विचार अनुभवाने घटवून तयार झालेला देह आणि चित्त कसा असेल? वा ! कसा असेल ? नक्कीच शुद्ध ,सात्विकच असेल. पंचतत्वापैकी एक पाण्यासारखी स्वच्छ , निर्मळ पवित्र काही विचार असतील तर घडारूपी देहाला शितल करतीलच आणि त्याच्यात पुन्हा घट होत नाही. हळूहळू देहशुद्धीकडून चित्तशुद्धीकडे जाणारा प्रवास असतो मग यामधे घट , कमी कशी होईल ?अध्यात्मिक प्रवास योग्य दिशेने होत आहे. याची सुरूवात असेल तर कमतरता होणार नाही , घट होणार नाही हा सत्व गुण वाढत जाईल.तो वाढतच गेला पाहिजे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

8 thoughts on “शरिर घट….”