भरलेला रितेपणा….


एवढी विस्तीर्ण, मोठी पृथ्वी सुद्धा जड नाही कारण ती एका नागाच्या फणीवर आरूढ आहे असा  समज आहे.  भौतिक गोष्टींचे, वजणाने कितीही जडत्व असले तरी ते उचलल्या जाणे शक्य आहे. त्याच्या भाराचा, फक्त वजन पेलणाऱ्या ताणकाट्यावर किंवा वजन वाहणाऱ्यावर क्षणिक ताण येऊ शकतो. असंच जीवनातही आहे
पण मनाचे काय? भौतिकतेनेे, याच विचारांनी जर मन, बुद्धी भरलेले असेल  तर मग मात्र  मनाची  अवस्था वाईट असते. जेव्हा ते एखाद्या विचारानेच भरून जाते. ती भारी, विचारांनी जड झालेली अवस्थाच त्याचं भौतिक बदलते….जीवनाला दिशा आणि दशा देते. मनामध्ये धरून ठेवलेले विचार कोणते आहेत यावरच हे जडत्व असते…
शरिराचे अस्तित्व संपवून जीवंतपणीच मनाला हलकेपणा प्राप्त करून देणारी भगवंताची भक्ती अगदी अंतःकरणाने केली, अनुभूती आली की कोणताच विचार हे जडत्व आणू शकत नाही. भरलेला रितेपणा येतो. म्हणजे मन भारलेले असते, भरलेेेले असते परंतु सर्वार्थानेेे  रितेही केलेले असते.  मुक्त होणे आवश्यक असते. आत्मज्ञान, अनुभूती, भक्तीने ओतप्रोत, निरीच्छ, स्वानंदी असतात ते मनात हेच विचार धरून ठेवतात म्हणून या विचारांनी भरलेले असतात आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने रितेही झालेली असतात. त्यांना पृथ्वी, भौतिक जग सुद्धा त्रासदायक वाटत नाही आणि मनात कोणताही संभ्रम असत नाही. कितीही विचार आले तरी कोणतेच जडत्व जाणवत नाही.. ना मनाचे, ना भौतिक सुखाचे… मन, बुद्धी, शरीर, याला ओलांडून जो आनंद मिळवतो तो स्वानंदी….

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

6 thoughts on “भरलेला रितेपणा….”