माळावरची उडी दे….
काय मागत होतो आपण? या बगळ्यांच्या थव्याकडे पाहून….कवडी की उडी… उंच उडणे, स्वातंत्र्य, कवेत निवांत निसर्ग की भौतिकतेला कवडी मोल ठरवून…आपले स्वआकाश तर मागत नव्हतो ना ! कावळ्यांची शाळा सकाळी भरतांना, संध्याकाळी सुटतांना, चिमणीला वारा घालून पाटी वाळवून द्यायची विनंती. घरातल्या कोपऱ्यात घरटं केल की मग तर तिची वाढ आणि विकास अंड्यातील अवस्थेपासून उडून जाईपर्यंत तयार झालेलं नातं आणि ओढ. हा अभ्यासाचाच विषय व्हायचा इतकं मनात घरटं बनवायचा..की स्वतः चा अभ्यास करताना पुस्तकात, वहीतसुद्धा चिमणीचं घरटे दिसायचे आणि मग गृहपाठ उशिरा केला म्हणून हातावरच्या छडीने डोळ्यात पाणी आले तरी तो चिमणीचा खोपा डोळ्यातून गोष्टीतल्यासारखा वाहून जात नव्हता, इतका पक्का मनात घर करायचा…खंबीर निर्णयक्षमता, स्वतः च्या आवडीच्या नात्यांसाठी, छंदासाठी त्रास सहन करावा म्हणजे सहनशीलता इथेच शिकता येते. कौशल्यांचा विकास बहुदा असाच होत असेल. पेरू खातांना पोपटाने थोडा खाऊन पाहिला आहे लक्षात आले की आता जास्तच गोड लागणार, हे आपणच ठरवत होतो. कितीही आबंट, तुरट चव असेल तरी आहे ते गोड मानून घ्यावे, समाधान मानावे हे जीवन शिक्षण. परीक्षेला जातांना तारेवर निळकंठ दिसला की त्याला गोल गोल फेरी मारेपर्यंत जर तो उडाला नाही की पास होणेे पक्केेचंं. मित्रमैत्रिणी फेरी मारताना तो शांत बसतो. नेमका आपल्या फेरीच्या वेळी उडाला की धसकाचं ! याउलट घडलं की मग मात्र सगळ्यांचा निकाल लावून आपण शाळेत सगळ्यात आधी धावतच हजर होणार…. कवडी, वारं, गोड पेरू, परीक्षेत पास सुद्धा पक्ष्यांमुळेच. खोप्यासोबतच नातं किती विश्वासाचे…. चिमणी उडून गेली तरी हे होणारच होतं..जीवन असेेचं असते. शेवटी आपण एकटे असतो. स्वकर्तुत्वाने उडायचे नसते. स्वपंखांचा विस्तार करून आपलं आकाश शोधण्यासाठी उडावेचं लागते.. काही काळासाठी इतरांची सोबत…. आपण फक्त सहप्रवासी एकमेकांचे…. हे बालवयात नसेल समजत… पण त्या आठवणी मात्र नंतर जीवनार्थ, आत्मविश्वास देण्याला नक्की हातभार लावत असतात. मोरपिसाचे केवढे आकर्षण ! जपून ठेवावे, कधी गालावर फिरवत तर कधी हाताने त्याचा रेशीमपणा अनुभवास यायचा. कधी माळरानावर झुडूपांच्या मध्ये ते पीस अडकलेले सापडले की खजिना सापडल्याचा आनंद. मग दिवसभर ते माळरान अजून खजिना शोधायला पिंजून पिंजून काढायचे. झुडूपांमध्ये नेहमीच मोर अडकत नसतो. मग सापडतात अनोळखी पक्ष्यांचे पंख. मग काय ? शोध मोहीमच ! हे पीस कोणाचे ? बालबुद्धी प्रमाणे विचार आणि थेट निर्णय घेऊन मोकळे स्वयंघोषित शास्त्रज्ञ. कबुतर, पारवा, घार, मैना, वगैरे वगैरे..पक्षी निरीक्षणाची पुस्तक वाचून, चित्रात पक्षी पाहून….हे शास्त्रज्ञ होत नसतात तर पक्षी पाहून निरीक्षण करून माहिती मनात, वहीत लिहायची असते आणि पुस्तकातील माहितीशी तुलना करायची असते. कधी पक्ष्यांचे थवे आकाशात आणि माळरानावरून जातांना दिसले की त्यांच्या सोबत वर पहात धावायचे. आपणही स्वछंदी पणे उडू शकतो याचा भास आणि या भासातून होतो तयार मुलांचा मनोबल विकास. जितक्या जास्त रंगांचे पीस ज्याला सापडेल, तितका दाखवण्यासाठी तो भाव खाणारंच ! अशी संधी पुन्हा होणे नाही ! मग भांडणाचा तह, अटी… ते पीस पहाण्यासाठी कशाचीही कबुली द्यायची सगळ्यांची तयारी असायची बर ! पुन्हा वरतून चालताना त्याची मान वर आणि बाकी खाली मान घालून त्याच्या मागे मागे आपल्याला का सापडले नाही? असा विचार करता करता मनाशी निश्चयाची गाठच बांधायची आता मी निरखून, बारकाईने शोधणार, पहाणार ! इथेच तर निरीक्षण क्षमता शिकायची असते. पश्चाताप करण्यापेक्षा पुन्हा पुन्हा प्रयत्न करायला शिकतात मुलं. सगळे जगच त्यांच्यासाठी नवीन त्यामुळे प्रत्येक खेळ, गोष्ट, अनुभव, महत्त्वाचे आहेत. मुलांनी स्वतःहून अशी धडपड करणं आवश्यकच असतं. ती त्यांची नैसर्गिक प्रेरणा असते. मुले डोळ्यांनी निरीक्षण करतील , पायानी फिरतील, हातांनी जेवढ्या गोष्टी करतील तितक्याच त्यांच्या मेंदूतल्या पेशी एकमेकांना जोडल्या जातील..त्याच जाळं तयार होत जातं आणि मुलांची समज वाढते. अर्थ कळतात. बुद्धी वाढण्यास मदत होते. आकलन वाढतं. मनाची ग्रहणशील अवस्था असते. हे सगळे प्रत्यक्ष अनुभवायलाच लागते… मुलांचे खेळणे अर्थपूर्ण असते असे अर्थपूर्ण अनुभव आपल्याला देता यायला हवेत. नैसर्गिकरित्या शक्य नसेल तर ठरवून किमान काही अनुभव नक्कीच द्यावेत. या पक्ष्याकंडे पहातांना सोबत आकाशही पहातो.. .मग काय शोधतं असतो आपण ? “आपलं अर्थपूर्ण अवकाश” तर शोधतं नसतो ? हा खेळ, निवांतपणा, हे निसर्गाशी वेगवेगळ्या मार्गाने एकरूप होणं .जीवनाच्या परिपूर्णतेकडे घेऊन जाण्याचा मार्गच असतो. तो आपणचं शोधावा लागतो. आपली मुलं काय काय गमावत आहेत? हा निसर्गाचा मार्ग हे आकाश दाखवण्यासाठी. आपण अवकाश घेता कामा नये….
Latest posts by Varsha Karhad - Munde
(see all)
20 thoughts on “बगळ्या बगळ्या कवडी दे!….”
छानच
बगळ्या बगळ्या कवडी दे —-सुंदर या सगळ्या गोष्टीमुळे आपली निरीक्षण शक्ती ,व्यक्त व्हायची क्षमता वाढायची .त्यामुळे तेव्हा उन्हाळ्यात व्यक्तीमत्व विकास शिबिराची गरजच पडायची नाही,
बगळ्या बगळ्या कवडी दे —-सुंदर या सगळ्या गोष्टीमुळे आपली निरीक्षण शक्ती ,व्यक्त व्हायची क्षमता वाढायची .त्यामुळे तेव्हा उन्हाळ्यात व्यक्तीमत्व विकास शिबिराची गरजच पडायची नाही,
रम्य… जिथे साऱ्या विश्वाचं विस्मरण होतं.. मी-तू पणाचं भान रहात नाही.
मस्त बालपणीच्या माझ्या आठवणी जाग्या झाल्या.
खुपच छान हा लेख वाचताना मला माझे बालपणाची आठवण झाली
Chan
Awesome!!!!
सध्याच्या बोथट झालेल्या समाज मनात इतक्या संवेदनशीलतेने लेखात लिहिल्याप्रमाणे निसर्गातील गोष्टीं शी तद्रूप होण्याची ओढ मुलांमध्ये निर्माण होणे खूपच गरजेचे आहे
खूप सुंदर लेख लेख वाचून आमचंही लहानपण डोळ्यासमोरून सरकून गेलं
खूपच छान लिहीले आहे मॅडम
Mast balapanichya athavani punha anubhavlyasarkha vatla
व्वा ! खुपच छान लेखन बालपण पुन्हा जगल्रयाखे वाटत आहे.
खूप छान!असेच लिहिते रहा…वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी माझ्या लहानपणीच्या आठवणी या लेखाने जागवल्या 👍👌👌
खूप खूप सुंदर 👌👌
खूप छान👌👌
खूप छान,लेख वाचून गावाकडचे शाळेचे दिवस आठवले.
वा खूपच सुंदर .…मुलांची निरीक्षण क्षमता वाढविण्यास अतिशय उपयुक्त लेख
रम्य ते बालपण! बालपणीच्या भावविश्वात अलगद डोकावता आले
लहानपण आठवले