गवताचं पातं

गवताचं पातं..

 

बरे झाले जरा खाली जमिनीवर बसले मी…
नजरेत प्रसन्न सगळी गवताची पाती होती …

चार बाजूंनी डोंगर अन् लागून खाई…
तरी निश्चींत, एकांत अन् अभेद्य शांताई…

इथे घुमतात फक्त आता आवाज मनीचे…
तुम्ही ऐकली ती केवळ कर्मसाद होती…

इथे क्षणात विरतात  सारेच बुडबुडे…
जे तिथे वरवर भ्रमात तरंगत होती…

बरे वाटले आताशा जरा खाली बसले मी…
चढण्यास आयुष्या कोणती पायरी उरली नाही…

हळूहळू चढेल अन् वेढेल पाणी…
शेवटी विरघळेल इथे हर एक कहाणी….

जीवन नितळ, निर्मळ जरी प्रवाही …
खोलवर साचेल हर जखम विराणी…

पाषाणगर्भात धरणीच्या असतील का लोण्यापरी गाणी!…
त्यातून उगवतील, उमटवतील वाटांवर निशाणी…

दिले होते तिथे मी कर्तव्यसार उरलेलेही…
केली ती फक्त माझी काही चाकरी नव्हती!..

शिंपल्यात जपले अश्रू, न ओघळता कधी..
साठवून आठव बनतील तेच अनमोल मोती…

गतीने चालले अवघड वाटा…कधी अगतिक झाले मी?

अनेक वाटा शोधताना, दिसताना …

बरे झाले आता जरा थांबले मी..

बरे झाले जरा थांबले मी…

 

 

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

2 thoughts on “गवताचं पातं”