प्रार्थना ते ध्यान

भारतीय शिक्षा, चीरपुरातन- नित्यनूतन- प्रार्थना ते ध्यान

कथा क्र.3 आदियोगी, पार्वती आणि सप्तऋषीं

भगवान श्रीशंकर आदियोगी सप्तऋषींच्या समोर बसून त्यांना आत्मज्ञान प्राप्तीच्या विविध पद्धती शिकवत होते. पार्वतीने हे आत्मज्ञान त्यांची अर्धांगिनी बनून अगोदर प्राप्त केलेले होते. त्यांच्या बाजूला बसून हे सगळं ती फक्त पहात होती. मानवी शरीर, मन, आत्मा हे कसं काम करतात याचं तंत्र ते समजून सांगत होते. हे सगळं पहात असताना तिने त्यांना प्रश्न केला की फक्त एवढ्याच पद्धती आहेत का? अजून पद्धती असल्या पाहिजेत! अजून का नाहीत? याच पद्धती का आहेत? ते पूर्ण केंद्रित होते. त्यांनी फक्त पार्वतीकडे पाहिलं; डाव्या हाताने बाजूला हो! असा निर्देश केला आणि म्हणाले,” नाही! फक्त एवढेच प्रकार आहेत! असं स्पष्ट सांगितलं. पार्वतीला तो स्वतःचा अपमान वाटला. दुर्लक्ष केल्यासारखं वाटलं. या सप्तऋषींच्या समोर आपल्याला नाकारलं म्हणून ती परत म्हणाली,” आणखीन जास्त प्रकार आहेत. कदाचित ते तुम्हाला माहिती नाहीत. आदियोगी म्हणाले,” नाही! फक्त 112 आहेत तू इथून जाऊ शकतेस!
माता पार्वती म्हणाल्या,” ठीक आहे. मी आणखी पद्धती शोधते.

त्या तिथून निघून गेल्या व हिमालयाच्या पर्वतरांगामध्ये गेल्या आणि अतिशय कठिण अशी तपस्या करू लागल्या. अनेक वर्षांच्या तपस्येनंतर त्या वापस आल्या. शिव आणखीनही आत्मज्ञान, योग,ध्यान…. विविध प्रकार शिकवण्यात गुंग होते. पार्वती आल्यानंतर त्यांच्यासोबत न बसता एक पायरी खाली बसू लागल्या. शंकरांनी केवळ एक दृष्टीक्षेप टाकला आणि काय समजायचंय ते समजून गेले…

वास्तविक शिवाची पत्नी या नात्याने, एवढ्या वर्षानंतर भेट झाल्यामुळे त्यांच्या बाजूला जाऊन बसू शकल्या असत्या! परंतु त्या थोडसं बाजूला आणि एक पायरी खाली बसल्या हे दाखवण्यासाठी की, मी आणखीन मार्ग शोधण्यात असफल झालेली आहे. तुमच्यापेक्षा माझी ज्ञानाची एक पायरी खाली आहे. स्त्री पुरुष असा भेदभाव अर्थ अजिबात नाही तर आपल्यापेक्षा ज्ञानाने उच्च असलेल्या व्यक्ती, गुरुस्थानी असलेली व्यक्ती ही आपल्यापेक्षा वरच्या पदावर बसलेली असते. आपण ते ज्ञान तपासून घेऊ शकतो. परंतु ते ज्ञान तपासल्यानंतर आपल्याला जे ज्ञान प्राप्त होतं त्यानुसार आपले स्थान ठरलेले असते. आपण योग्य आहोत की अयोग्य, चूक आहोत की बरोबर हे माहिती झाल्यानंतर मात्र आपण आपल्या पद्धतीने वागावयास हवे. याचा उपयोग आपल्याला विविध प्रत्यक्ष व्यवस्था स्वीकारण्यामध्ये होतो. उच्च पदावर बसलेली व्यक्ती चूक बरोबर किंवा त्याबद्दल बोलण्यापूर्वी किमान विचार करू!! खरेतर शंकर पार्वती पती-पत्नी असल्यामुळे त्या दोघांमधली ही व्यक्तिगत भाषा होती. पार्वतीला असं वाटते की शंकराला तर कळावं की मी अयशस्वी झालेली आहे. परंतु सप्तऋषींना मात्र कळू नये की मी अयशस्वी झालेली आहे. ही वास्तविक त्या दोघांमधली भाषा असली तरी या मधून अनेक नवनवीन बाबी आपल्याला लक्षात येतात त्या अश्या की, म्हणजे पार्वती अशा व्यक्तींचे देखिल प्रतिनिधित्व करतात, जे शंका उपस्थित करत असतात. संदेह उपस्थित करतात. त्यांच्यासाठी देखील हा संदेश की संदेह उपस्थित झाले तरी आपण स्व प्रयत्नांनी सत्यतेपर्यंत पोहोचलं पाहिजे. पोहोचल्यानंतर येणाऱ्या सत्यतेतून निर्माण होणार आपलं वर्तन देखील स्वीकारलं पाहिजे. त्या एक पायरी खाली बसतात त्यातून हेच निर्देशित करतात. तसेच त्या अशा व्यक्तींचे देखील प्रतिनिधित्व करतात की शिकवणारा आणि शिकणारे त्यांच्या कामात केंद्रित आहेत परंतु अनावश्यक व्यक्तींची उपस्थिती जशी केवळ प्रश्न निर्माण करणारी, शंका घेणारी असते तशा पद्धतीचाही हा निर्देश आहे. प्रत्यक्ष यामागचा सकारात्मक विचार असा आहे की जेव्हा प्रत्यक्ष प्रार्थनेपासून पासून ध्यानापर्यंतच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या करत असताना असा संदेह, अविश्वास अनेक व्यक्तींमध्ये निर्माण होणारा असतो त्याचेही त्याप्रतिनिधीत्व करतात आणि त्याचं शंका निरसनही पूर्ण ज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीला करता आलं पाहिजे हा संदेशही त्या शंकरांना देतात. कारण विश्वासाने देणे आणि विश्वासाने स्वीकारणं हा खरा विज्ञानवादी विचार होय. आयुष्यात एक योग असा जुळून आला पाहिजे जो आपल्या शारीरिक आणि मानसिक नाटकांच्या वर असला पाहिजे. आपण प्रत्येक गोष्ट हुशारीने करण्याचा प्रयत्न केला तर ती गोष्ट योग्य होते परंतु जास्त हुशारीने करण्याचा प्रयत्न केला तर आपण अस्थिर होतो. कारण अशा चंचल बुद्धीच्या ठिकाणी स्थिरता राहत नाही. खरंतर पार्वती शंकरांच्या जवळ गेली ते जबरदस्त प्रेम, भक्ती, त्यागासहित. तिच्यात त्या भावना असणं इतकं प्रभावी होतं की ती त्यांचा अर्धा हिस्सा बनून गेली. फक्त भावनेच्या आधारित केंद्रित राहणं सोपं जातं. जिथे प्रभावी भावना तयार होतात  तिथेच आपले मन, विचार करणं, काम करणं आणि ऊर्जा सुद्धा रहात असते. अशा पद्धतीने त्या त्यांच्याशी जोडल्या गेल्यामुळे त्यांचे स्वतःचे व्यक्तीत्व वीरघळले होते आणि मग स्वतःचं व्यक्तित्व विरघळलं की हळूहळू दैनंदिन जीवनातूनही ज्ञान,आत्मज्ञानाकडे जाण्याचा रस्ता सोपा होत जातो.

आपल्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपणचं प्रयत्न केला पाहिजे. समोर जे आहे ते तसंच स्वीकाराच्या अगोदर काही गोष्टींची प्रयत्नपूर्वक खात्री करून घेतली पाहिजे. अनुभव घेताना, शिकताना ,कामाच्या पद्धती आहेत त्याच वापराव्यात यातूनही काही नाविन्यपूर्ण पद्धत निर्माण होऊ शकते. काही मार्ग निघतात का? हे ती तपासत होती. नाविन्यतेचा शोध घेत होती. यामधून यश अपयश, मान अपमान याच्यापुढेही जिज्ञासा महत्वाची होती. स्वतःमध्ये ज्ञान निर्मिती करण्याची करण्याचा ध्यास होता. स्वतः अभ्यास, प्रयत्न ध्यास घेऊन यातून खूप काही मिळवलं. कधी यासंदर्भात असहकार्य, अपमान क्वचित विरोध ही होऊनही आपल्या आवश्यकतेनुसार स्वतःमध्ये काही शक्ती निर्माण होतात. प्रत्येक व्यक्तीत अशा काही शक्ती असतात. आपण सहज म्हणतो मी खूप सहन केले आहे! खरे तर ती आपली सहनशक्ती असते. आपण प्रतिकारशक्ती ही फक्त शारीरिक आजार किंवा आरोग्य या दृष्टीने वापरतो परंतु आपले ताण-तणाव व्यवस्थापन करण्यासाठी, स्वतःशी; स्वतः मधील दोष, चुका, वाईट विचार याचा प्रतिकार करण्यासाठी या अर्थाने देखील ही प्रतिकारशक्ती वापरता येते. मानसिक भावभावनांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी अशी स्वतःच्या सवयींच्या विरोधातील पण स्वतःसाठी पूरक कार्य करणारी ही शक्ती प्रतिकारशक्ती स्व प्रयत्नाने, दैनंदिन जीवनातील विचलित करणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी वापरावी लागते. ती सुद्धा आपल्यामध्ये निर्माण करता येणारी शक्ती आहे. या अशा विशेष शक्तींचा स्वतःच्या प्रयत्नाने स्वतःला शोध घ्यावा लागतो. इथे दुसऱ्याचा आधार जमत नाही. कारण प्रत्येकाच्या समस्या वेगळ्या, गरजा, परिस्थिती वेगळी असू शकते. आपल्याला अनेक प्रश्न पडतात यासाठी मात्र दररोज नव्याने रिक्त मनाने पुढे जावे लागते. पूर्वग्रहदुषित विचार न करता समोर जसे आहे तसेच खरे असेल का! याची खात्रीही करावी लागते. याचबरोबर आपणही जसे आहोत तसे चुकीचे असू शकतो हे देखिल तपासन घ्यावे लागते. म्हणजे आपण आपल्याला योग्य ठिकाणी ठेवू शकतो. अगदी कामाच्या पद्धती सुद्धा पूर्वी आहेत त्याच वापराव्यात का? त्यात नावीन्य येण्याची संधी निर्माण होऊ शकते! नवीन वेगळी वाटचाल आपण करू शकतो. कारण यश, अपयश, मान, अपमान या गोष्टी  आपल्या स्वीकारण्याच्या विचारांवर अवलंबून असतात. मुळात असं काही नसतं. अपयशातूनही आपण अनुभवतो, शिकतो. सुरुवातीला आपल्याला पडलेले प्रश्न, शंका, मनातील विचार, आजूबाजूंच्या व्यक्ती, कृतींमधील कार्यकारण भाव, ठराविक पद्धतीने होणारी निसर्गाची वाटचाल, निसर्गाची ठेवण… आपण स्वप्रयत्नाने माहिती करून घ्यावी लागते. अनंत रूपाने ईश्वर आपल्या भेटीसाठी येतो जसे सत्कर्माच्या द्वारे येतो तसा तो पापांच्याद्वारेही येतो. या पायऱ्या अशा इतक्या स्पष्ट असाव्यात; आपण जसे आहोत तसेच स्वतःला स्विकारत गेलं पाहिजे… तसं आपल्या मनाचा आरसा दाखवतो पण हा मनाचा आरसा स्वच्छ असला तर ते आणखी स्वतः भोवती फिरायला सोपं सोपं करतो.. हा मनाचा आरसा प्रार्थनेने हळूहळू ही स्वच्छ होत जातो….
क्रमशः….

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

8 thoughts on “प्रार्थना ते ध्यान”