भाग १ श्री गणेशाची गोष्ट
Motivational भारतीय शिक्षा- चिरपुरातन- नित्य नूतन, आधी स्वतःभोवती फिरुया
घरात कार्यक्रम म्हटलं की सगळ्यांची लगबग सुरू असते. घरातल्या मुख्य हौशी माणसाला तर किती किती महत्वाची कामं असतात. कपड्यांची thim ठरवायची. Photoshoot साठी जागा निवडायची वगैरे वगैरे यादी वाढतचं जाते. काय काय मॅनेज करावं लागतं. कार्यक्रम आपला आणि आपल्याला किती जणांना मॅनेज करावे लागते. बापरे!! बरं कार्यक्रम झाल्यानंतर सुद्धा आठ दिवस सुधरं बसत नाही वरून दोनचार वर्ष सगळी बिलं पुरवत बसा. घरात भिंतीला तेलाचे डाग पडतील इतक्या वेळ चर्चासत्रे सुरू रहातात ती वेगळी. बरं एवढं सगळं करूनही काहीतरी राहून जातंच न् !
कधीकधी चर्चासत्रे कमी पडलीतर मग नातेवाईकांचे त्यांच्या वेटेजनुसार फोन देखिल येतात. रुसवे, फुगवे, स्पष्टीकरण द्यावी लागतात ती वेगळीचं. कधी कधी त्यांच्या कार्यक्रमात आपला बदलासुद्धा घेतला जातो!!
My god!! it’s on and on….
पण मजा असते हो!
अशावेळी मला मात्र गणपती सारखं chilled smile देऊन सहभागी होता येत आणि आनंदही मिळवता येतो. Celebration आणि event चा हो! कारण माझी यादी आणि त्याप्रमाणेच कामे ready to eat सारखे preplan सगळं ok असतं. कपातले वादळं मी morning motivation ने मिटवते.
बाकी नाहीतरी वावटळं,वादळं, आग वगैरे यांची आपल्याला कल्पना असतेच की हो!
अश्या वेळी मला
पुराणातील एक गोष्ट आठवते.
श्री गणेश आणि कार्तिकेय यांची गोष्ट. आता या गोष्टीचा इथ संबंध काय?
आहे! आहे! शोधाशोध केली की काहीतरी संबंध लागतोच. पृथ्वी गोल आहे.
आता गोष्ट काही सांगत बसत नाही. सर्वांना माहिती आहेच. पण चुकून माकून कोणी राहिले असतील. वाचायचे, ऐकायचे तर! संदर्भ तरी स्पष्ट करावाचं लागेल!
तर cartoon, youtube video ची speed fast करून पाहण्याच्या जमान्यात आणि मिनीटाला एक channel बदलणाऱ्या मुलांना फारच रटाळ पद्धतीने सांगायचं म्हटलं तर बोअर होतील. क्षमस्व!!
थोडे fast forward करून सांगण्याचा प्रयत्न करते.
शंकर पार्वती सुजाण पालक आहेत. शंकर पार्वतीने आपसात ठरवलं आज आपल्या मुलांना काहीतरी शिकवायचं. पण अभ्यास म्हटलं की मुलं कंटाळा करणार, नकोच म्हणणार. तसेच दोघेही उपक्रमशील पालक असल्यामुळे मुलांना आवडेल अशाच पद्धतीने सांगणार होते. मग त्यांनी गंमत म्हणून दोघा भावंडांमध्ये शर्यत लावली. स्पर्धा ठेवली. कोण पृथ्वी प्रदक्षिणा करून आधी परत येतं? आधी परतणार तो जिंकणार! आणि श्रेष्ठ ठरणार! हे ऐकल्याक्षणी कार्तिकेय तात्काळ आपल्या वाहनावर म्हणजे मोरावर आरूढ होऊन निघाले पृथ्वी प्रदक्षिणेसाठी. गणपती मात्र कोणत्याच घाईत नव्हते. त्यांनी अगदी सावकाश आपल्या आई-वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घातली. त्यांना वंदन करू लागले.
आता पार्वती आईला( आईचं मन आडवं येतचं की) आपला लाडका बाळ मागे राहिलेला कसा आवडेल! म्हणाली,” अरे बाळा! म्हटलं होतं थोडे मोदकं कमी खा! आळस येईल. बघ तुझा भाऊ कितीतरी पुढे गेला असेल आणि तू? इथेच!! गणपती वंदन करून म्हणाले,” तुम्ही दोघेच माझं जग आहात आणि तुमच्या भोवती प्रदक्षिणा घातली म्हणजे पृथ्वीला प्रदक्षिणा घातल्याप्रमाणे आहे. आणि सांगितलं की माझी पृथ्वी प्रदक्षिणा झाली.
आई-वडिलांनी गणपतीचे कौतुक केले हे वेगळे नको सांगायला.
कोण जिंकलं? कोणी शब्दांचे काय अर्थ काढले? खरा अर्थ न शोधता ही गोष्ट कितीदा सांगितली! कितीदा वाचली! शंकर-पार्वतीला आपल्या लेकरांना काय शिकवायचं होतं?
असं काय काय माझ्या डोक्यात आलं हो!
शंकर पार्वती आपल्या मुलांना management चा धडा देत होते का??
आता आपले आवडीचे गणपती बाप्पा प्रकट झाले तर काय सांगतील! की आता आईवडिलांच्या भोवती फिरतांना स्वतः भोवती फिरत फिरत फेरी पुर्ण करा.
ते कसं काय बुवा? पहिल्यांदा so called एक दैनंदिन event उदाहरण दिले होते त्याचा आता इथं संबंध लागतो.
पृथ्वी सुद्धा स्वतः भोवती फिरुनच सुर्य प्रदक्षिणा पुर्ण करते. अख्या विश्वाचे सोडा! छोट्या अणूची सरंचना देखिल काय सांगते…
जग फिरण्यापेक्षा स्वतःभोवती फिरूया, जगाला मॅनेज करण्यापेक्षा आधी स्वतःला मॅनेज करुया. स्वतःला पहा, ओळखा, क्षमता, मर्यादा, नेमके काय? आहोत आपण!! जगाचे व्यवस्थापन आपोआपच होईल. आधी कुटुंबातील व्यक्ती, कुटुंबाला मॅनेज करो बॉस! फिर सारी दुनिया का manger बनो! मॅनेजमेंट अपने आप हो जायेगा!
असं प्रत्येकाने केलं तर कुठल्याच नियोजनात कोणाला मॅनेज करण्याची गरज पडणार नाही.
आपल्या पूर्वजांनी फार विचारपूर्वक सगळं लिहून ठेवलं आहे. अर्थ शोधले की अवघड सोपे होते हो!
उगीच नाही गणपतीला बुद्धीदाता देव म्हणून आपण ओळखत!! किती छान बुद्धी दिली आहे आपल्याला. भक्तीचा भाव ओतला की तो बुद्धीचा ठाव देतो.
शोधुया! चीरपुरातन सापडेल नित्यनुतन!
आधी स्वतः भोवती फिरूया …पण नेमकं कस्स! मोठ्ठ् प्रश्नचिन्ह ? समजले नाही! 61 व्यां वर्षी पण स्वत: भोवती फिरता येत नाहीये कुटुंब मॅनेजमेंट चालूच आहे ….
इति एक प्रिय जेष्ठ मैत्रिण…
मी- पुढच्या रविवारी नक्की वाचूया स्वतः भोवती कस्स
फिरायचं आणि फक्त तांत्रिक व्यवस्थापनासाठी नाही… अजून बरचं काही…. असतं स्वतः भोवती फिरणं
Next motivation मध्ये एक जुनी जुनी गोष्ट नवीन नवीन अर्थासहीत हजर करते.
क्रमशः
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
16 thoughts on “आधी स्वतः भोवती फिरूया”
,,😂👌मजा येईल वाचायला आवडेल.
समोर बोलत आहात असे वाटले
स्पष्टीकरण मस्त
अगदी खरंय ,आधी केले मग सांगितले….. याप्रमाणे
सुरेखा कुलकर्णी
व्वा एकदम मस्त 100%खरय✔️
खुप छान
निलिमा क्षिरसागर
खूप सुंदर लिहिलं आहे👌👌👌🌹नक्की लिहा प्रवीण davnechaच्या थेंबातील आभाळ याची आठवण झाली
थेंबातील वर्षाघन …..
म्हणूया रविवारच्या मालिकेला
Very true!👌👍💐
खूप छान
अगदी सोप्या पद्धतीने managementकसं करायचं हे सांगितलंत.खूप छान!
खूप सुंदर विचार मांडलेत बाई तुमच्या पुढील लेखनासाठी खूप खूप शुभेच्छा वांजरखेडकर
खूपच मार्गदर्शक आणि सुंदर👍👍👌👌
प्रत्येक कृती अर्थ समजून करावी.. आनंदही घेता येतो आणि मनोकायिक लाभ देखिल…
खूप खूप छान वाटले .
तुमच्या पुढील लेखन कार्यास शुभेच्छा !!!
खुप हलक्या फुलक्या शब्दात मांडणी.वाचताना आनंद मिळतो👌👌👌
खूप छान लेखन केले आहे.