दिवाळ सण, कशास सजले?
कुणीतरी म्हणे, फटाके खुपले ?
काय जपता, विचार बुरसटले?
कोणी बोलले, दुःख हे ओले।।
घरअंगण,मन, सारे पानावले
जमेल तसे,मग दाते जमले
घरोघरी उत्साहाने, दीप चेतले
भर पावसात,सण गोड झाले।।
पांडव, चूल, किल्ले बनवले
बोळक्यातूनि,दुध साळ सांडले
लाह्या बत्तासे, गोड वाटले
सारे मांडले, सारे आवरले।।
भल्या पहाटे, रांगोळी सडे
भाऊराया बघ,पुरण धीरडवडे
खोबरं वाटी,अन् करदोडे
नानाविध रिती, पुजले फडे ।।
भेट वस्तू, दिले घेतले
लेकी सुना, मनी आनंदले
घर मायेने ,पुन्हा गजबजले
एकत्र कुटुंब,अंगण हसले।।
उटणे उरले, सुगंध संपले
काजळी संगे,तेलही थीजले
फटाके उडले,तुकडे पसरले
फराळ डबे, संपत आले।।
दिवाळी पहाट, गाणे संपले
हास्य गप्पा, मौन लागले
डोळे पुसता, उरी भेटले
पाहुणे मंडळी, गावी निघाले।।
नाना प्रकार,जरी वेगळे
ज्याचे त्याचे, कृतीत दिसले
व्यर्थ न हे,संस्कार मातीतले
प्रत्येकाने कधी, ना त्याजिले।
राव असो वा, असो दीनदुबळे
क्षण क्षण, साजरे झाले
हाच ठेवा, जपत आले
सण सण, यासाठी योजिले।।
दिवाळी नसे, झगमग केले
दिवाळी हसे, थाटमाट दिसले,
दिवाळी रूसे, लखलख झाले
दिवाळी सांगे, मनामनात सजले।।
- गवताचं पातं - January 26, 2025
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
5 thoughts on “दिवाळसण”
Juni diwali dolayasamor ubhi rahili👌👌
Sunder lihile aahe diwali var
Dr. Sunita shete
👌👌👌dr.sadhna yadav
👌👌👌 रूपाली मुळे
स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Diwali 🪔🪔🪔
Beautiful…
khup chan👌👌👌👍👍👍