प्रत्येकाला इच्छा स्वप्न, ध्येय असतात. याचा दृढनिश्चय झाला की मग त्यासाठी जिद्द, चिकाटीचे प्रयत्न यांचे कोणत्याही परिस्थितीत सातत्य टिकवले जाते. कितीही अडचणी, संकटे आणि कठीण परिस्थिती आली तरी ही प्रेरणेची ठिणगी विझत नाही, नष्ट होत नाही. हे एखाद्या ठिणगी प्रमाणे जपले की ही दुर्दम्य इच्छाशक्ती कायम ज्वलंत राहते. झळ सोसून सुद्धा ठामनिश्चयाने, जबाबदारी, कर्तव्याची जाणीव करून देते. ही ठिणगी आपल्याला ध्येय•मार्गावर कार्यरत ठेवते
ती ठिणगी…
मुसळधार पावसाची, कडाडणार्या विजांची मलाही हौस होती…
वादळवाऱ्यात घरटं बांधण्याची मनातही जिद्द होती… उसळणाऱ्या लाटांची, कधी ओहोटीची आगळीच मौज होती…
बेफान भरतीतही सागरात शिरण्याची रक्तातच उसळली होती… आकाशी भिडणाऱ्या गर्विष्ठ मेरू अग्रांशी नजर भिडवायची होती…
उजाड माळपाठीवर, ओसाड रानातून स्वतःची वाट कोरायची होती…
सूर्याच्या तेजाची, भडकत्या ज्वालांची धग
उराशी पोसली होती….
काळोख्या रात्री, असहाय्य थंडीत उमेदींनी
फुंकर घातली होती…
मायेच्या पंखानी, सावली धरल्या हातांनी झळ सोसली होती….
सोसलेल्या चटक्याअंती उरलेल्या राखेतही
ती ठिणगी जपली होती…©
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
3 thoughts on “ती ठिणगी….”
सादरीकरण, कविता छान!
छान!
Beautiful very nice..