धृवताऱ्यापरी….
माझ्या अक्षरांना, तुझ्या शब्दांना
आपल्या गीतांना जगाची का दाद हवी
माझ्या रुसण्याला, तुझ्या हसण्याला
आपल्या कथांना जगाची का साथ हवी
माझ्या फुलण्याने, तुझ्या असण्याने
आपल्या बहरण्याने जगाने का राजी व्हावे
माझी “मी” अन् माझे “मी” पण
आपल्या विरघळण्याने जग का गढूळ व्हावे
माझ्या अर्थांना तुझ्या भावनांना
आपल्या विश्वाला जगाची मान्यता का हवी
माझे बोलणे अविरत तुझे ते चालणे व्हावे
आपले मिलन क्षितीजामागे जगाने पहावे
माझा “तू” अन् तुझी “मी”
आपल्या असण्याने धृवतार्यापरि असावे
आपल्या असण्याने धृवतार्यापरि उरावे….
अंबाजोगाई साहित्य संमेलनात कविता सादर…
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
3 thoughts on “धृवताऱ्यापरी…”
धृवतारयापरीच आहे लेखन
कविता खूप छान
व्वा!!