वादळं कितीही उठली, अंतरी दीप न विझे। जग निराशा सांगे, आशा अंतरी जागे॥१॥ तन-मन-धन क्षणिक सारे लोभास या अंत न ये। मनमंदिरी जो जागे,त्याला भय काही न दे॥२॥ बाहेर अंधार गडद,अंतरी सूर्योदय ये। शून्याच्या कुशीत, शाश्वताचा उदय दे ॥३॥
Daily Archives: August 19, 2025
शून्याच्या गर्भातून,अनंताचा जन्म झाला, थेंब जसा सागरात,स्वविसरून विरघळला। नक्षत्रांचा खेळ हा,गणितात मोजला एका श्वासाच्या , रहस्यात अजूनही दडला। देव कुठे शोधावा, मंदिरी वा ग्रंथात? अश्रू पुसता जेव्हा, तेव्हाच तो भेटला। विद्या असो विज्ञानाची, वा साधना अध्यात्माची प्रकाश अंतरीचा, दोन्ही मार्गांनी झळकला। अनुभव विश्वाचे,वाळवंटातल्या पाऊलखुणा, […]
आकाशाच्या अथांग पटलावर, ढगांचे मुक्त चित्र उलगडते, तशी मनाची ओढ कधी आनंदाच्या तरंगांत नाचते. झाडांच्या पानांत कुजबुजते वारे, विचारांना देतात नवे सहारे। सूर्य जसा किरणे वाटतो, तसा आशेचा दिवा मनात पेटतो। निसर्ग सांगतो धीर धरायला, ऋतूंची चाल शिकवते स्वीकारायला। कोसळणारा पाऊस देतो स्मरण, की अश्रूतूनही जन्मते नवीन जीवन। पक्ष्यांच्या उडणाऱ्या […]
कर्माचा दीप अंतरी, अखंड तेवत राहावा, अंधार आला तरी, प्रकाश तोच व्हावा ॥1॥ कष्टाचा प्रत्येक थेंब, सागर रूप धरावा, नियतीच्या हातीही, उत्तर योग्य द्यावा ॥2॥ गांजल्याचे भले करणे, हीच खरी साधना, स्वार्थाच्या मोहजाळी, क्षण कधी न अडकावा ॥3॥ वाट स्वतःच घडवावी, ठेच लागली तरीही, पुढेच चालत जावे, आनंद न गमवावा […]