स्मृतीभस्म/ चलो फिरसे तांडव हो…. हाथ जोडके, श्रद्धासे आंखें बंद कर लेती हूंँ। तेरा रूप, तेरा भाव मन में लाती हूँ। वो हर चीज; जो अमूल्य है, तेरे चरणों में रखना चाहती हुंँ। संसार के सारे रत्नों से तेरे वस्त्र, आसन को चमकाना चाहती हुं।। फिर; धीरे… धीरे… उनकी […]
Yearly Archives: 2022
आज मनुष्यगौरव दिनाच्या निमित्ताने परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या *दशावतार* ( प्रकाशक- सद्विचार दर्शन) या पुस्तकाचा परिचय लेख स्वरूपात सादर करत आहे. उत्तम तत्वज्ञानी, भारतीय परंपरागत साहित्य, पुराणं, संस्कृती याविषयी योग्य कार्यकारण भावाद्वारे सूक्ष्म निरीक्षण करून अगदी सहजतेने, सोप्या पद्धतीने नवीन पिढीला रुचेल, पटेल, समजेल आणि ते स्विकारेल अशा पद्धतीने […]
मराठवाड्यातील बोली भाषेतील म्हणी म्हणजे मराठी भाषेचा अस्सल झणझणीत तडकाच. चपखल, मार्मिक नेम धरून काय म्हणतात ते सगळं या म्हणी मध्ये लपवलेल आहे. समजणाऱ्याला अर्थ समजून सांगण्याची आवश्यकता पडत नाही. तसेच त्या भाषेतील शब्दांचे नेमके अर्थही माहिती असावे लागतात. बोली भाषेतील शब्द कोणत्या संदर्भाने घेतलेले आहेत हे देखिल शोधावे लागते. […]
अताशा असे हे मला काय होते? कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते. बरा बोलता बोलता स्तब्ध होतो. कशी शांतता शून्य शब्दांत येते. कधी दाटू येता पसारा घनांचा, कसा सावळा रंग होतो मनाचा.. असे हालते आत हळुवार काही जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा…. असा ऐकू येतो क्षणांचा इशारा क्षणी व्यर्थ होतो दिशांचा पसारा […]
शिक्षण विवेक, पुणे दिवाळी अंक आयोजित लेखन स्पर्धा प्रथम क्रमांक प्राप्त लेख… नदीच्या आठवणी दीपावली सुट्टी! वाणनदीशी गट्टी! माझ्यावर अगदी लेकीसारखं प्रेम करणारी माझी मायाळू आत्या, माझी हक्काची अक्का!अक्काच्या घरी दिवाळीला माझा भारी थाट असायचा. आवडीची फुलं,रंग असलेल्या कापडापासून शिवलेले फुग्यांचा बाह्यांचे झगे, परकर पोलकं आवडीचे कपडे, काचेच्या बांगड्या, रंगीत […]
झुळूक या काव्यसंग्रहाचे …. इरा प्रकाशन, लातूर तर्फे…. 95व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात उदगीर येथे…. संमेलनाध्यक्ष सन्माननीय श्री भारत सासणे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
बाय माझी…. बोलीभाषा मराठवाडी.. बाय माझी सुगरणं सुगरणं साताची घरीदारी रानीवनी कष्ट तिच्या हाताची।।धृ।। गारपाण्यानं गं वली, सारवते भुईसर चोपडं गं अंगण, सारा परवार घोंगडी नेटकीचं, बाजेवर गोधडी यळ झुंझरूकाची कामं पोतराभुईची।। राबतं गं जातं, एकलं तिच्या साथीला रामंसीता नाते, सारे गं तिच्या ओवीला पिवळीचं पीट बाई, आलं […]
प्रत्येकाला इच्छा स्वप्न, ध्येय असतात. याचा दृढनिश्चय झाला की मग त्यासाठी जिद्द, चिकाटीचे प्रयत्न यांचे कोणत्याही परिस्थितीत सातत्य टिकवले जाते. कितीही अडचणी, संकटे आणि कठीण परिस्थिती आली तरी ही प्रेरणेची ठिणगी विझत नाही, नष्ट होत नाही. हे एखाद्या ठिणगी प्रमाणे जपले की ही दुर्दम्य इच्छाशक्ती कायम ज्वलंत राहते. झळ […]
धृवताऱ्यापरी…. माझ्या अक्षरांना, तुझ्या शब्दांना आपल्या गीतांना जगाची का दाद हवी माझ्या रुसण्याला, तुझ्या हसण्याला आपल्या कथांना जगाची का साथ हवी माझ्या फुलण्याने, तुझ्या असण्याने आपल्या बहरण्याने जगाने का राजी व्हावे माझी “मी” अन् माझे “मी” पण आपल्या विरघळण्याने जग का गढूळ व्हावे माझ्या अर्थांना तुझ्या भावनांना आपल्या […]
शाळा सुटली की घरी येताना मैत्रिणींचा बेत ठरत असतो. आज काय खेळायचे! भातुकली, लपंडाव, लगोरी, कंचे, गोल गोल राणी, झिम्मा फुगडी, आंधळी कोशिंबीर, लोखंडपाणी, डोंगराला आग लागली, तळ्यात-मळ्यात, संत्रलिंबू, विषामृत, रंग रंग कोणता रंग, आट्यापाट्या, सुरपारंबी, विटी-दांडू, काचकुऱ्या पकडा-पकडी…. या सारख्या अनेक खेळांची नावे पटापट सांगितली जायची. शेवटी घर येईपर्यंत […]