Monthly Archives: August 2021

5 posts

7.एक धागा….

“स्त्री आणि पुरुषांना कल्पकतेने आपल्या वापरातील आवश्यक असणारे कापडी प्रकार बनवण्याचे  कौशल्य घरोघरी प्रत्येकाला येत होते. जुन्या झालेल्या कपड्याचा शेवटचा तुकडा देखील वाया जात नव्हता. कपड्यांचे धागे सुती , रेशमी किंवा लोकरीचे असत. या धाग्यांपासून, कपड्यांपासून काय बनवत असत! चांदवा, लांबण पिशव्या, झोळणा, गोधडी, वाकळ, घोगंती, घोगंता, घोंगडी, पडशी, मोरकी, […]

6.दर्पणपेटी….

    वाणनदी परिसरात आढळणाऱ्या खैर, बाभूळ, बोर, जांभूळ, आंबा, चिंच, कडुलिंब या झाडांच्या लाकडापासून घरात, शेतात, वापरल्या जाणाऱ्या वस्तू तयार करत असत. आताही काही वस्तू या झाडांंच्या लाकडापासून करतात परंतु यामध्ये साग, सीसम यासारख्या अनेक झाडांचे लाकूड वापरत आहेत. गावाकडे लाकडाच्या वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजे मुसळ, रवी, रविखंबा, मोगरी, […]

5.फिरत्या चाकावरी येई मातीस आकार….

शोभेच्या वस्तूंसाठी आपण मातीच्या भांड्याचे प्रकार वापरतो. वारली चित्रकला रेखाटून कुंड्या, फुलदाणी यासारख्या काही भांड्यांचा वापर करतो. सध्यातर चवदार, काहीतरी गावाकडचं, towards nature, ecofriendly वगैरे मध्ये सहभाग म्हणून मातीच्या भांड्यात, मातीच्या चुलीवर काही ठरावीक पदार्थ करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.या पद्धतीने खास वनभोजन आयोजित केली जातात. भट्टीत भाजल्याप्रमाणे शेंगदाणे चवदार […]

4.साठवण….

    गावाकडे प्रपंचाला, जगण्याला आणि शेतीपाण्याचा सारा सौरात करायला लागणाऱ्या वस्तू गावातीलच कुशल कामगार तयार करायचे. प्रत्येकाकडे काहीना काही हस्तकौशल्य असते. परंपरेने आलेले किंवा गरज म्हणून विकसित झालेले असते. सहसा कोणताही कृत्रिम कच्चा माल वापरला जात नाही. परिसरात नैसर्गिकरित्या उपलब्ध काय आहे? आणि याचा उपयोग कसा करता येईल? या […]

3 गावकुस शिवार….

कोणत्याही प्रदेशातील सण, उत्सव हे तेथील संस्कृतीचे दृश्य रूप असतात. या सण उत्सवात होणारे बदल हे सांस्कृतिक बदलांची जाणीव करून देतात. भारतीय सणांमधूनच नव्हे तर भारतातील विविध राज्यातील प्रत्येक परंपरेतून देखिल *कृषी संस्कृती* सोबत दृढसंबंध जोडलेला जाणवतो. स्वातंत्र्य पूर्व भारतात जवळपास 98 टक्के जनता शेतीशी आणि शेतीच्या जोडधंद्याशी आधारित होती. […]