मागच्या वाड्यातल्या पिंपळाच्या पानांची सळसळ, पक्ष्यांची किलबिल, कोंबड्याचे आरवणे ऐकून गोधडीतून डोकं बाहेर काढून, डोळे किलकिले करुन वर पाहिलं डोळे भरून आभाळ दिसायचे. धुरकट केशरी, काळसर निळे, मातकट पिवळ्या रंगाच्या आभाळाखालून लगबगीने पूर्वेकडून पश्चिमेकडे शाळेसाठी निघालेले कावळे, बगळे, चिमण्या, पोपटांचे रंगीत थवे उडायचे. झोपाळलेल्या डोळ्यांना हे सगळं अंधुक अंधुक दिसायचे […]
Monthly Archives: February 2021
आपल्यावर किती ओझी आहेत ! असे प्रत्येकाला वाटते. कोणाला कशाचेही ओझे वाटू शकते. पती, पत्नी, पुत्र, असल्याचेही तर फॅक्टरीचा मालक किंवा नोकर असल्याचेही, काही जणांना तर दुसऱ्याला किती ओझे आहे याचेही ओझे वाटते! अशी कितीतरी ओझी केवळ मनात, विचारात मानलेली आणि समजलेली असतात. या समजण्यामुळे मात्र मनाचा जडपणा वाढतो. ही […]
जिथे कोणताही प्रश्न उरत नाही,रहात नाही… अशी अतिउच्च परीक्षा पास झाल्यावर, पार केल्यावर काय होत असेल? ज्याला प्रश्नच रहात नाही तो केवळ उत्तरे द्यायला सज्ज असतो का? अशी स्थिती कधी प्राप्त होत असते का? का ? कायम मनात प्रश्न…. या प्रश्नांची उत्तरे कधी मिळतात तर कधी नाही, कधी शोधावी लागतात […]
शाळेत प्रवेश घेण्यापूर्वीचा हा वेळ मुले क्रियाशील होण्यासाठी, नवनवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी खूप उपयोगी असतो. पण बहुधा हा वेळ पालक शालेय विषयाच्या तयारीत घालवतात उदा. चौदाखडी वाचन, लेखनाचा सराव खरेतर शिकवण्यासाठी घाई झालेली असते. परंतू हाताच्या बोटांचे स्नायू सक्षम झाल्याशिवाय हे करणे योग्य नसते. ऐकणे, कान तयार झाल्याशिवाय बोलणे आणि […]
निसर्गतः आपोआप बालकांकडून घडणारे खेळ, खेळल्या जाणाऱ्या क्रिया, कृती त्यांना बंधन घालतो. साचेबद्ध, नियंत्रित दिशा देतो त्यामुळे मुले गोंधळून जातात किंवा नेमके स्वतःला काय पाहिजे हेच समजत नाही पण जे समोर आहे ते नको असते….तेच तेच पर्याय कंटाळवाणे वाटतात. यापैकी काही उदाहरणे म्हणजे मुलगा असला की […]
काल संचिताची भेट झाली, झोपाळा खेळतांना नाक आणि तोंडाला भरपूर लागले होते. आईकडे खेळायला जाण्याचा हट्ट करून लगेच खेळायला गेली…. शस्त्रक्रिया झाल्यामुळे महिनाभर दवाखान्यात असलेला रोहन हातावरच्या प्लास्टरवर देखील गाडी चालवायचा…गंमत म्हणजे अर्जुनला स्वतःचे दिनक्रमाचे वेळापत्रक तयार कर असे सांगितले तेव्हा सगळ्यात जास्त वेळ खेळासाठी लिहिला आणि सांगितला….. त्यामध्ये बदल […]
व्यक्तींच्या अंगीभूत असलेल्या क्षमतेएवढी कामे होतात. या क्षमतेचे, योग्यतेचे प्रमाण प्रत्येकासाठी सारखे असू शकत नाही.समजा धावताना एकाच्या पायात काळजी घेणारे बूट असतील आणि दुसऱ्याला अनवाणी धावावे लागत असेल तर ! क्षमता आणि मूल्यमापन हे सारख्या परिस्थितीत, समान योग्यतेच्या व्यक्तींचे असते. नियंत्रित परिस्थितीत केलेले मूल्यमापन काही ठरावीक क्षमतांचे आणि तात्पुरते असते. […]