Monthly Archives: January 2021

16 posts

जीवनाला जगावे लागते….

पावसाच्या थेंबाचे दान मातीला मातीचे दान वेलींना फुलोनि वर्षाव मातीत तरी फुलावे लागते…. पायरी चढणे नसे इथे… एकेक पायरी उतरावे लागते… जीवनाला जगावे लागते. असे कितीतरी नकळतपणे घडणारे निसर्गदान, जीवन दर्शन अन् त्याप्रती ऋणभाव, आभार, धन्यवाद असतो. कृतज्ञेपोटी विचार, कृतीतून, वागण्यातून नित्य व्यक्त होत असतो. आयुष्य कधीच एकट्याचे नसते. अचानक, […]

काय गरज आहे?….

  “दान दीन बनवते, काम नवनिर्माणाला प्रवृत्त करते”. हे वाक्य लक्ष वेधून घेते. याचा अर्थ असा नाही की दानाला महत्त्व नाही, दान करू नये, तर ते कुठे आणि कशा पद्धतींची वृत्ती बनवत आहे जसे आळशी,आयते बनवत आहे की कायम मदतीची अपेक्षा करत आहे? दान कोणती नवनिर्मिती करत आहे ? यावर […]

कथा गोष्टींची….

“वेद,पुराणगोष्टी, कथा कशासाठी! ब्रम्ह, तत्व, आत्म, गूढ सांगण्यासाठी. आकलन आवाक्यात आणण्याचे, जटील सुलभ करण्याचे कथा तंत्र जाणले ऋषीमुनींनी हाच सक्षम मंत्र. पुढे अखंड जपला थोरामोठ्यांनी भक्ती, वाणी आणि संस्कारांनी सध्या मात्र गोष्ट चिंतन,मननाची, थोडा बदल करण्याची……. गोष्टीत सामर्थ्य कशाचे! संस्कार रंजकपणे करण्याचे. बालपणीचा काळ सुखाचा आजीची भाजी,चिऊ-काऊ जेवायला, रात्री चांदोमामा,विक्रमवेताळ […]

मधुबनी….

सीतेच्या स्वयंवर आयोजनासाठी जनक राजाने मधुबनी कलेने पूर्ण मिथिलानगरी सजवली होती. बिहारमधील मिथीला जिल्ह्यातील आजूबाजूच्या परिसरातील जंगलामध्ये मध भरपूर उपलब्ध आहे. यावरून मधू म्हणजे गोड आणि बानी म्हणजे वचन, प्रतिज्ञा स्वरूपात सांगितलेली गोष्ट…. मधूबनी असे या गावाचे आणि चित्रकलेचे नाव आहे. अदिवासी स्त्रीयांनी निर्माण केलेली अभिजात कला अतिशय सुंदर आहे. […]

अर्थबंध….

कमी शब्दांत परिणामकारक, विस्तारित अर्थ लपलेली रचना निर्मितीचे, एकापेक्षा एक सरस जादूगार…. त्यांच्या शब्द मांडणीतून आपल्याला समजणारे अनेक अर्थ.. या प्रतिभा वाचनीय असतात. त्यांचा अर्थ शोधण्यात अवर्णनीय असा आनंद असतो. हे जादूगार भाषेच्या पलीकडे असतात. त्यांच्या रचनांना भाषेचे कोणतेही बंधन आडवे येत नाही. भाषेतील सामर्थ्य आणि हे साहित्य समर्थपणे अगदी […]

सागरीसाद….

विशालकाय लाटांवर लाटा…. सांजवेळी किनाऱ्याची भेट घ्यायला येतांना स्वतःचे मोठेपण लहान करत करत….शेवटी विरघळून जातात, शांत होतात. आपल्या अस्तित्वापूर्वी आणि अस्तित्वानंतरही… अश्या एकानंतर एक लाटा येण्याचे चक्र सुरु आहे आणि सुरू रहाणारचं आहे. उत्साही उसळते….एकमेकात मिसळणारे…. फेसाळते उधाण, वाळूच्या किल्ल्यांसारखे क्षणात सगळं शेवटी पाण्यात ! असे काहींसे, खट्याळ, खोडकर मस्ती, […]

अबोलवाट….

  रुक्मिणी रोज पहाटे बागेतले फुलं तोडत असे…आज मात्र फुले तोडताना हातावर दुसरा एक हात पडला….आणि आईवडीलांकडे आग्रही मागणी करून कायमचा हातात घेतला. चालून आलेलं चांगले स्थळ म्हणून लगेच होकार… आणि परीक्षा तोंडावर आलेली असताना विवाह सोहळ्याचा घाट शिक्षण,वाचन काय काय सगळ्यांवर हा हात फिरला!            […]

संवाद….

बालविकसनामध्ये विविध प्रकारच्या विकासाबद्दल आपण शाळेत शिक्षक या भुमिकेतून विचार करतो. परंतू या भुमिकेला आपली एक व्यक्ती म्हणून आपल्या व्यक्तिमत्त्वाची भुमिका नकळतपणे जोडल्या जातेच. म्हणून मुलांना समजून घेणाऱ्या कृती या तटस्थपणे, नियोजित करून अनुभव बनवता आल्या पाहिजेत. या कृतींचा आधार आणि मार्ग मानसिक विकासातुन जात असतो. यासाठी मानसिकतेला परिणाम करणारी […]

1.चूलबंद आवतनं….

सहपरिवारास भोजनाचे आमंत्रण…. इथे कोणताच सोहळा, प्रसंग एका कुटुंबाचा नसतो. फक्त कुटुंबच साजरं करत नाही तर गावाने गावाला दिलेला आणि सगळ्यांनी मिळून पूर्णत्वास नेलेला क्षण असतो. सामूहिकता, आपुलकी असते. सगळ्यांचा आनंद, कष्ट, सहभाग,असतो. सप्ताह, हनुमान शक्ती, लग्न, असो की दुखःद प्रसंग….. कोणताही कार्यक्रम सगळं स्वयंपूर्ण असतं. खूप मजा येते हे […]

मूळस्वरुप…..

  आपल्या संस्कृतीचा, धर्माचा, वेदांचा आदर्श मूळ ईश्वरवाद आहे. हा ईश्वर एकच आहे. ईश्वरवादाच्या त्रिशक्ती म्हणजे ब्रम्हा, विष्णू आणि महेश. या अतिउच्च पातळीवरील अलौकिक शक्ती आहेत. या शक्तींच्या अंगी अगणित गुणवत्ता आहेत. या त्यांच्या अंगी असलेल्या प्रसन्नतेचे, सर्वोच्च ज्ञानाचे, चमत्कारिक अवतारांचे, विविध अवतारातील केलेल्या कार्याचे, झालेल्या साक्षात्कारांचे या सारख्या अनेक […]