“स्त्री आणि पुरुषांना कल्पकतेने आपल्या वापरातील आवश्यक असणारे कापडी प्रकार बनवण्याचे कौशल्य घरोघरी प्रत्येकाला येत होते. जुन्या झालेल्या कपड्याचा शेवटचा तुकडा देखील वाया जात नव्हता. कपड्यांचे धागे सुती , रेशमी किंवा लोकरीचे असत. या धाग्यांपासून, कपड्यांपासून काय बनवत असत! चांदवा, लांबण पिशव्या, झोळणा, गोधडी, वाकळ, घोगंती, घोगंता, घोंगडी, पडशी, मोरकी, […]
Yearly Archives: 2021
वाणनदी परिसरात आढळणाऱ्या खैर, बाभूळ, बोर, जांभूळ, आंबा, चिंच, कडुलिंब या झाडांच्या लाकडापासून घरात, शेतात, वापरल्या जाणाऱ्या वस्तू तयार करत असत. आताही काही वस्तू या झाडांंच्या लाकडापासून करतात परंतु यामध्ये साग, सीसम यासारख्या अनेक झाडांचे लाकूड वापरत आहेत. गावाकडे लाकडाच्या वापरल्या जाणाऱ्या वस्तू म्हणजे मुसळ, रवी, रविखंबा, मोगरी, […]
शोभेच्या वस्तूंसाठी आपण मातीच्या भांड्याचे प्रकार वापरतो. वारली चित्रकला रेखाटून कुंड्या, फुलदाणी यासारख्या काही भांड्यांचा वापर करतो. सध्यातर चवदार, काहीतरी गावाकडचं, towards nature, ecofriendly वगैरे मध्ये सहभाग म्हणून मातीच्या भांड्यात, मातीच्या चुलीवर काही ठरावीक पदार्थ करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे.या पद्धतीने खास वनभोजन आयोजित केली जातात. भट्टीत भाजल्याप्रमाणे शेंगदाणे चवदार […]
गावाकडे प्रपंचाला, जगण्याला आणि शेतीपाण्याचा सारा सौरात करायला लागणाऱ्या वस्तू गावातीलच कुशल कामगार तयार करायचे. प्रत्येकाकडे काहीना काही हस्तकौशल्य असते. परंपरेने आलेले किंवा गरज म्हणून विकसित झालेले असते. सहसा कोणताही कृत्रिम कच्चा माल वापरला जात नाही. परिसरात नैसर्गिकरित्या उपलब्ध काय आहे? आणि याचा उपयोग कसा करता येईल? या […]
कोणत्याही प्रदेशातील सण, उत्सव हे तेथील संस्कृतीचे दृश्य रूप असतात. या सण उत्सवात होणारे बदल हे सांस्कृतिक बदलांची जाणीव करून देतात. भारतीय सणांमधूनच नव्हे तर भारतातील विविध राज्यातील प्रत्येक परंपरेतून देखिल *कृषी संस्कृती* सोबत दृढसंबंध जोडलेला जाणवतो. स्वातंत्र्य पूर्व भारतात जवळपास 98 टक्के जनता शेतीशी आणि शेतीच्या जोडधंद्याशी आधारित होती. […]
जागतिक पुस्तक दिन असो की वाचन दिन किंवा साहित्याशी संबंधित कोणताही दिन पुस्तकांची, वाचन संस्कृतीच्या साधकबाधक विचारांची चर्चा, सुविचार, महत्त्व आणि मतं वगैरे याशिवाय पोरका वाटणारचं !! म्हणून जरा काय चाललय? वाचन संस्कृती पुर्वापार होती, आहे आणि रहाणार… यात तीळ मात्र शंका नाही. वाचन कधी वैयक्तिक तर कधी सामुहिक परंतु […]
ध्यान में ये ध्यान लागे ऐसे। नित पथ कौनसा देख पायें।।धृ।। भोर ही भोर जंहा छायें । गहरे रंग के नही ये सायें। उदय निश्चिंती प्रकृती प्रतिमा। रोशनीभरी उजियारी गरिमा। छाये भला अंधेरा किस तरह से।।१।। दिखलांऊ वो भोर किस राहों से । मुग्ध गगन के झिलमील सांये। फिर उभर […]
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सृष्टीची निर्मिती केली असेल असे संकेत आणि वातावरण आपण अनुभवतो. हा अनुभव एकदा मनाला जाणवला की, पुढील ऋतूंमधील सगळ्या निसर्ग व्यवस्था, बदल सृष्टी निर्मात्याने किती विचारपूर्वक घडवल्या आहेत हे देखिल लक्षात येते. या वसंतऋतू पासून सगळा निसर्गपट नजरेसमोर येवून मनामनात रमतो आणि त्याची अनुभूती घेण्यासाठी निसर्ग साद घालत […]
संतांच्या भक्तीतून प्रकटलेले साक्षात्कार अर्थ…. संतांचा भगवंतासोबत एकाकार झाल्यानंतरच्या अनुभूतीतून त्यांना काय जाणवते? कोणत्या भावनेपर्यंत ते पोहोचतात? त्यांच्या भक्तीचा सर्वोच्च बिंदू कोणता असतो? नेमके कोणत्या अवस्थेत असतात ही संतमंडळी? आणि याच अवस्थेत कायम कसे राहू शकतात? असे अनेक प्रश्न मला संत साहित्य वाचताना पडतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे देखील संतांचे […]
मागच्या वाड्यातल्या पिंपळाच्या पानांची सळसळ, पक्ष्यांची किलबिल, कोंबड्याचे आरवणे ऐकून गोधडीतून डोकं बाहेर काढून, डोळे किलकिले करुन वर पाहिलं डोळे भरून आभाळ दिसायचे. धुरकट केशरी, काळसर निळे, मातकट पिवळ्या रंगाच्या आभाळाखालून लगबगीने पूर्वेकडून पश्चिमेकडे शाळेसाठी निघालेले कावळे, बगळे, चिमण्या, पोपटांचे रंगीत थवे उडायचे. झोपाळलेल्या डोळ्यांना हे सगळं अंधुक अंधुक दिसायचे […]