Yearly Archives: 2020

25 posts

काय फरक पडतो?….

  कोणत्याही ठिकाणी, कुठेही  काम करत असताना प्रत्येकाला विविध अनुभव येतात. सगळे अनुभव वाईट नसतात ! आणि सगळीच माणसंही परिपूर्ण नसतात. प्रत्येकाचा येणारा अनुभव वेगळा असतो. आपण हळूहळू समृद्ध होत जातो. अनुकरण, निरीक्षण, प्रयत्न, करत शिकत जात असतो. प्रत्येकचं चूक आपण करायला पाहिजे असे नसते तर कधीकधी दुसऱ्यांच्या चुकांमधून देखील […]

सामुहिकता !….

प्रत्येकाकडे सगळ्या गोष्टी अथवा सर्व गुण कधीच नसतात. काही लोकांकडे  कल्पना क्षमता असते पण प्रत्यक्षात उतरवण्यासाठी नियोजन नसते तर कधी अधिकार नसतो. शक्ती असते पण तिला योग्य दिशा नसते. संघटनक्षमता असते पण निर्णयक्षमता नसते जे आपल्याकडे नाही ते इतरांकडे असू शकते. जे इतरांकडे नाही ते आपल्याकडे असू शकते. अशा एकमेकांच्या […]

भरलेला रितेपणा….

एवढी विस्तीर्ण, मोठी पृथ्वी सुद्धा जड नाही कारण ती एका नागाच्या फणीवर आरूढ आहे असा  समज आहे.  भौतिक गोष्टींचे, वजणाने कितीही जडत्व असले तरी ते उचलल्या जाणे शक्य आहे. त्याच्या भाराचा, फक्त वजन पेलणाऱ्या ताणकाट्यावर किंवा वजन वाहणाऱ्यावर क्षणिक ताण येऊ शकतो. असंच जीवनातही आहेपण मनाचे काय? भौतिकतेनेे, याच विचारांनी […]

शरिर घट….

सध्या पाणी घटामधे ! शरिरामध्ये प्राण त्याचप्रमाणे आहे. म्हणून कोरड्या मातीचा घट म्हणजेच हे कोरडे शरीर या  प्राणामुळे थंड आहे मग घट कसा कोरडा असेल ! जोपर्यंत एखादी गोष्ट आहे तोपर्यंतच त्याचा प्रभाव असणे, पंचप्राण अनुभूती आहेत म्हणून तर देहालय हे देवालय आहे.. हे नसेल तर शरीर सौंदर्य फक्त देखावा […]

एक क्षण….

    स्वतःला अलिप्तपणे व तटस्थपणे समजून घेणे ऊर्जा वाढवणारे असते. समजून घेत असताना अभिनिवेश, व्यक्तिनिष्ठता नसावी. निर्लेपपणे समजून घेण्याचा प्रयत्न असावा. जे जे निःशुल्क परंतु मौल्यवान आहेत याचा अनुभव जेवढा घेता येऊ शकतो तेवढे आपण समजून घेऊ शकतो. समुद्राची खोली मोजण्यासाठी जर से.मी.ची छोटी पट्टी वापरली तर चालेल काय? […]