Monthly Archives: December 2020

17 posts

लोकदेव….

“काळा पाषाण पण मंदिरासाठी घडवला आणि घाव सोसले की त्यात प्राण”. जुन्या मंदिरातील गाभाऱ्यात अद्भुत शक्ती असते. महाराष्ट्रात अश्या विविध शक्तींची मंदिरे खेड्यापाड्यात, छोट्या गावांमध्ये पुरातन काळापासून आहेत. यापैकी एक, महाराष्ट्राची लोकधारा जपणारे हे मंदिर, श्रद्धास्थान म्हणजे  खंडोबाची जेजुरी आहे. लोकांच्या हाकेला धावणारा, पावणारा लोकांचा देव म्हणून लोकदेव असेही म्हणतात.  […]

निसर्गाची नजरबंदी

निसर्गाची नजरबंदी….

एकीकडे उंच  डोंगर दुसरीकडे खोल दरी, नजरेसमोर  नागमोडी रस्ता…..सगळं नजरेआड होताना थंडगार थंड थंड झुळूक अंगाला लागली की मनाली आली  समजायचे. निसर्गाने खोल दरीपासून थेट क्षितिजापर्यंत बांधलेली इमारत हळूहळू ढगांपर्यंत पोहोचलेली दिसते. नजर जसजशी वर जाते तसेच तिथेच नजरबंदी करण्याची किमया, जादू म्हणजे मनाली. ह्या इमारतीचा पाया म्हणजे व्यास नदीचे […]

पाऊलवाट

पाऊलवाट….

अनुसया आक्काचे एक एक पाऊल संसारात पुढे, तर मनाला  विरक्ती आल्यामुळे तिचा घरधनी माणिक याचे दिंडीतून एक एक पाऊल कायमचे पंढरपूरच्या दिशेने पडत होते.“विठ्ठल विठ्ठल”, म्हणत म्हणत तो कधी विठ्ठलमय झाला तिला समजलेच नाही. अचानक एक दिवस सगळा संसार अर्ध्यावर सोडून कायमचा पंढरपूरला निघून गेला. कधीतरी मुलांची आठवण आली की […]

पावसाची झड

पावसाची झड

एकसारखी पावसाची झड सुरू होती…. अन् शेणानं सारवलेल्या अंगणात सात महिन्याच्या बाळाला छातीशी घट्ट कवटाळून, खाली मान घालून बसलेली उर्मिला. ती वाहणाऱ्या पाण्याचा विचार करत होती. जमिनीवरच्या, डोळ्यातल्या की अंगाला चिटकून बसलेल्या जीर्ण लुगड्याला भिजवणाऱ्या माहिती नाही ! तिच्या मनात नेमके काय असते ? अजून तिला हालचाल न करता दिवस […]

अभिव्यक्ती….

  अभिव्यक्तीचे माध्यमं कितीतरी…..प्रत्येक माध्यम प्रभावीच ! प्रत्येकाला रूचणारं आणि त्याच्यामध्ये रुजलेला फक्त प्रकार बदल… का व्यक्त व्हावे असे वाटतं असेल विविध प्रकारे ?…. स्वतः चे विचार सांगण्यासाठी, अनुभव शब्दबद्ध , कृतीयुक्त करण्यासाठी की  परिचय व्हावा म्हणून ! की केेेवळ अभिव्यक्तीसाठी ! निसर्ग हट्ट करतो का?  की माझ्या निसर्गोत्सवात सर्वांना […]

कशासाठी ?….

भगवंताचा अंश नसलेला एक अणूसुद्धा नाही. त्याच्या अस्तित्वाचा वादच निरर्थक आहे. परंतू समज असा की  , मृत्यूनंतर देव भेटतो…. म्हणून मृत्यू स्विकारतं का कोणी? कोणी तसे करूही नये. जन्मभर पूजा, प्रार्थना, भक्ती कशासाठी ? त्याच देवाला प्राप्त करण्यासाठी… जो नंतर भेटणारच आहे!भगवंत इथेच आहे. सर्व सोपस्कार आपल्यात बदल व्हावेत म्हणूनच. […]

एकरूप….

निसर्गातून निर्माण झालेले, निसर्गतः  एकरुप असलेले आणि पुनश्च निसर्गातच सामावणारे… सर्वकाही म्हणजेच ज्ञान. हे ज्ञान  विविध मार्गाने समजावून घेण्याचा आपला फक्त प्रयत्न असू शकतो. हे मार्ग कोणते ? यापैकी कोणत्याही मार्गाने अभ्यासले तरी शेवटी हे ज्ञान एकरूप आहे हे लक्षात येते.  एकमेकांना  परस्परविरोधी वाटणारे विज्ञान आणि अध्यात्म यामध्ये देखील एकरूपता […]