स्वार्थाच्या नजरेत जे सत्याला ओलांडून चालतात,
त्यांच्या पावलांखालीच शेवटी असत्य चिरडतात।
सामर्थ्यवान जे अंधारात अन्याय विणू पाहतात,
न्यायाच्या तेजात तेवढेच धागे कुचकामी ठरतात।
कामासाठी जवळ येणारे जरी ओळख लपवतात,
विश्वासाच्या आरशात सहजच ओळखले जातात।
असमाधानी लंगडीस्पर्धा अडथळ्यांच्या सावलीत,
टाळून जातो जो, तोच उंचावतो स्वप्नांच्या कवचात।
- शब्दांची शक्ती - September 28, 2025
- अंधारातील उजेड - September 21, 2025
- अंतर्मुख - September 12, 2025
2 thoughts on “स्वप्नांचे कवच”
खरच!
सखोल चिंतन