एकटेपणात कधी मौन राखताना,
स्वतःशीच जीव थोडा जुळताना।
आरशास डोळे भिडतील तेंव्हा,
आपुलीच प्रतिमा स्पष्ट होते जेंव्हा।
जगण्याचा थकवा ओघळेल सारा,
एकांतात जीव उमलेन जरा।
क्षणांची गणितं सोडवताना, अनुभवाची सोपी सुत्रे घेताना।
गर्दीचा गोंधळ मागे सरतो,
जगण्याचा मार्गाचा शोध लागतो।
मनाच्या गाभाऱ्यात लख्ख काजवा,
अंधारातून कर्तव्य मार्ग दाखवतो।
क्षणभंगुर जगण्याच्या वाटेवर चालताना
स्वतःशीच संवाददीप कायम जळतो।
- शब्दांची शक्ती - September 28, 2025
- अंधारातील उजेड - September 21, 2025
- अंतर्मुख - September 12, 2025
