दुःख जरासे दाटता, ओठांवर हसू दे,
जगण्याचा गोडवा मग, प्रत्येक क्षणी दिसू दे।
अंतरंगी दीप पेटता, प्रकाश जीवनी भरू दे,
जगही मंदिर होवो,करुणा जरा डोळ्यांत येऊ दे।
कटु शब्द ऐकता, मनात दयाच दाटू दे,
रागाचा दाह जाळुनी, शांती सुवास फुलू दे।
नजर अस्वच्छ होता, निर्मळ, क्षितिज खुलू दे,
प्रत्येक धूसर छायेतही, सौंदर्याचा रंग उमटू दे।
जग सुंदर, लोक सुंदर, दृष्टी जरा निर्मळ होऊ दे,
हृदयातील द यासागर, प्रत्येक हृदयात झिरपू दे।
- शब्दांची शक्ती - September 28, 2025
- अंधारातील उजेड - September 21, 2025
- अंतर्मुख - September 12, 2025