वादळ झेलुनी उभा राहतो जसा पर्वत,
घाव झेलूनी अधिक कणखर होतो माणूस।
अपयशाच्या राखेतून ठिणगी उजळते,
झुंज पुन्हा-पुन्हा देत प्रखर होतो माणूस।
कष्टांच्या भट्टीत तावून घडते सोने ,
दुःख स्वीकारता अधिक उजळतो माणूस।
अश्रूंच्या सागरातून मोतीच जन्मतो,
दुःख गिळुनीही हसत शहाणा होतो माणूस।
अपमानाच्या काट्यातून धीर उमलतो,
शब्द जखमेतूनही सजग होतो माणूस।
थेंब-थेंब साचुनी सागरच घडतो,
पडत-उठता अखेर स्थीर होतो माणूस।
ज्यांनी झुंज दिलीच नाही आयुष्याशी कधी,
त्यांना कुठे कळे काय समर होतो माणूस।
स्वप्नांच्या शिखरावर पोहोचायचे असेल,
खडतर मार्गानेच अमर होतो माणूस।
- शब्दांची शक्ती - September 28, 2025
- अंधारातील उजेड - September 21, 2025
- अंतर्मुख - September 12, 2025