प्रवास अनादीचा

 

आत्मा न मरे, न कधी जन्म घे,
तो प्रवासी असे, अनादीचा रे।

जन्मोजन्मीचा खेळ उभा कारे,
कर्मफळांचे हे तर गोंधळ  सारे।

कोण उगम, कोण चालवितो हे,
प्रश्न असले जरी, उत्तर तेच रे।

नभाच्या पल्याड,सर्व दिशेने
एक परमशक्ती संवाद करिते ।

रूप न तिचं, न तिला नाव रे,
पवित्र प्रकाशी ते गूढ भाव रे।

आकाश गुणांच्या अनंती स्वरे,
त्याच्याच सान्निध्यात अपार जीवे।

सभोवताली तोच व्यापूनि आहे,
त्याच्या स्मरणाने जीव शांत होईन रे।

 

Varsha Karhad - Munde
Latest posts by Varsha Karhad - Munde (see all)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *