नदीची हाक

नदीला कधीच  पुराव्याचे कागद  लागत नाहीत…
आई सारखे तिच्या पोटातच  पुराला साठवून  ठेवते…
धरणं, बांध, अडथळे करूनही
ती शांतपणे सहन करत राहते.
तिच्या प्रवाहातल्या लाटांना
माणसांचा लोभ समजतो…

जो तिचे अस्तित्व संपवायला निघतो
किनाऱ्यावरच्या अतिक्रमणाला
मर्यादेपर्यंतच ती गप्प बसते…
पण एक दिवस, ते अतिक्रमण तिच्या  डोहात आत येऊ पाहते…
तिचा धीर सुटतो,
आणि ती ओसंडून वाहते—
जमिनीला, शेतांना, घरांना, माणसांना आठवण करून देते,
की ही जमीन तिची होती, आहे, राहणारच!
नदी शिकवते—
शांतता ही कमजोरी नाही,
सहनशीलता ही तिची ताकद आहे. पण जेव्हा ती बोलते,
तेव्हा तिच्या रौद्र पाण्यात

खोट्या पुराव्याचे कागद भिजवते अन
संपूर्ण जगाचे शेवटचे सत्य उमटवते…

 

Varsha Karhad - Munde
Latest posts by Varsha Karhad - Munde (see all)

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

2 thoughts on “नदीची हाक”