कर्माचा दीप अंतरी, अखंड तेवत राहावा,
अंधार आला तरी, प्रकाश तोच व्हावा ॥1॥
कष्टाचा प्रत्येक थेंब, सागर रूप धरावा,
नियतीच्या हातीही, उत्तर योग्य द्यावा ॥2॥
गांजल्याचे भले करणे, हीच खरी साधना,
स्वार्थाच्या मोहजाळी, क्षण कधी न अडकावा ॥3॥
वाट स्वतःच घडवावी, ठेच लागली तरीही,
पुढेच चालत जावे, आनंद न गमवावा ॥4॥
श्वासाचा एक धागा — कधी तुटून जातो,
जीवन म्हणे प्रवासी — क्षणात विरून जातो ॥ 5॥
फुलांमधली उमेदही — कधी वाळून जाते,
आशेच्या पावलांना — ठेच दगडाची भेटते ॥6॥
तन मन धन सारे — सावलीसारखे क्षणिक,
माणुसकीचा उजेड मात्र — मृत्यूपलीकडे अगणित ॥7॥
कर्मच सोबती खरा — बाकी सर्व परके,
पावलापावलावरती — तेच लख्ख भेटते ॥8॥
- शब्दांची शक्ती - September 28, 2025
- अंधारातील उजेड - September 21, 2025
- अंतर्मुख - September 12, 2025
One thought on “दीप”
दीप कविता एकदम सुंदर विचारांची अतिउच्च प्रतीची झलक