शून्याच्या गर्भातून,अनंताचा जन्म झाला,
थेंब जसा सागरात,स्वविसरून विरघळला।
नक्षत्रांचा खेळ हा,गणितात मोजला
एका श्वासाच्या , रहस्यात अजूनही दडला।
देव कुठे शोधावा, मंदिरी वा ग्रंथात?
अश्रू पुसता जेव्हा, तेव्हाच तो भेटला।
विद्या असो विज्ञानाची, वा साधना अध्यात्माची
प्रकाश अंतरीचा, दोन्ही मार्गांनी झळकला।
अनुभव विश्वाचे,वाळवंटातल्या पाऊलखुणा, अनंतात शून्य,शून्यात अनंत सामावलेला।
- शब्दांची शक्ती - September 28, 2025
- अंधारातील उजेड - September 21, 2025
- अंतर्मुख - September 12, 2025

2 thoughts on “थेंब जसा सागरात”
छान
वैचारिक