आकाश निरव, तारे उजळ,
मनाचे भार होती विरळ।
रुपेरी अबंरी न्हाली रात्र,
गार झुळुकीत उमलली गात्र।
गहन अनंताचा गारवा थर,
शांत शुद्ध कल्याण स्वर।
पानांतून वारा हलके गातो,
नभलहरी मनाशी गुंफतो।
गगनी लपले चंदेरी दान, मन आभाळी गुंजते गान।
अवकाशी विरामस्वर पसरले,
अनंत शोधात पहाटे विखूरले।
- शब्दांची शक्ती - September 28, 2025
- अंधारातील उजेड - September 21, 2025
- अंतर्मुख - September 12, 2025

2 thoughts on “अनंत विराम”
खूप खूप सुंदर 👍
रात्रीच्या आकाशाचे गाणे