झुळूक आली तरी झळा लागती आता,
किती विरोधी वाहतो वारा हा आता।
शीड टाकुनी निघाले अथांग सागरी,
फिरुनी येईल किनारा, विश्वास न आता।
ताऱ्यांनाही झाली सवय अंधाराची,
कुठे उजळतो काजव्यांनी जगाचा अंधार आता?
जखमा भरल्या किती हसण्याने कधी,
डोळ्यांत दाटतो आठवांचा पाझर आता।
रणांगणी हरले नाही मी कधी,
किती लढावे? संवाद मनाशी हा आता।
वादळे झाले दगड मैलाचे प्रवासात,
उजेड देतात तेच जळते निखारे आता।
भावना म्हणे उमगली, आधार शब्दांचे आता,
कवितेत मिळतो खरा सहारा मला आता।
- शब्दांची शक्ती - September 28, 2025
- अंधारातील उजेड - September 21, 2025
- अंतर्मुख - September 12, 2025

3 thoughts on “अंधारातील उजेड”
गझल भावपूर्ण, सुसंवादी आणि चित्रात्मक आहे. जीवनातील वेदना, संघर्ष आणि अंतर्मुख अनुभव यांचे सुंदर मिश्रण केले आहे.
तुमच्या गझलेत जखम आणि आशेचा विलक्षण संगम आहे. “झुळूक आली तरी झळा लागती आता” या ओळीत ताजेतवाने वेदना, तर “ताऱ्यांनाही झाली सवय अंधाराची” या शेरमध्ये जगण्याची हळूहळू सवय झाली ही जाणीव प्रत्ययास येते. शब्दांचे सौंदर्य इतके नाजूक आहे की ते फक्त वाचकाला भावविभोर करत नाहीत, तर त्याच्या अंतर्मनाशी गुप्त संवाद साधतात. ही गझल फक्त वाचनासाठी नाही, अनुभवण्यासाठी आहे.
मनाला स्पर्शून जाणारी गझल
👌👌👌👍