मुठभर स्वातंत्र्य, चिमुटभर सत्ता, ओंजळीतील निसटते अधिकार… आश्रित,शोषित,पिडीत,जन्मापूर्वीच मृत्यूसारखे अनेक ढीगभर प्रश्न! माहिती आहेत का ! खरं सांगा माहिती आहे का!
या सोबतच दररोज एक पाऊल पुढे टाकताना…
पुरूषाच्या तुलनेत एका स्त्रीचा प्रवास?
शांत, एकांत आणि कधी निवांत क्षण?
ते घर, ती जात आणि ती एक बाईमाणूस याच्या पुढेही स्त्री एक व्यक्ती असते?
तिच्या हक्काच्या जमिनीविषयी कोणी सांगू शकाल का?
पिढ्यानपिढ्या शोधत असलेली तिचं हक्काचं घर ?
लख्ख आहे बरं! घराचा कोपरानकोपरा तळहाताच्या रेषांना पुसटसं करून…
त्या घराचा पत्ता आणि घरातील तिची जागा…
मला जरा सांगू शकाल का?
शोधू शकाल का तिथे तिच्या अस्तित्वाच्या काही खुणा?
आपल्या कल्पनेत एकाच क्षणी स्वतःला स्थापित आणि विस्थापित करत करत प्रस्थापित होते ती…
दिवसरात्र स्वप्नांच्या मागे धावत, पाठलाग करताना..
कधी क्षणभर स्वतःच्या विश्रामगृहात पहूडताना…
कधी पाहिलंय का तिला?
नात्यांच्या कुरूक्षेत्रात स्वतःशीच रोज लढताना..
अपमान,उपेक्षा, संघर्ष आणि हो तरीही निखळ हास्य नाती जपताना…
कोणी पाहिलयका धडपडताना !
शरीराच्या व्यतिरिक्त…
एका स्त्रीमना अतिरिक्त?
मानलं कधी व्यक्ती म्हणून?
कधी डोकावून पाहिलात आतला व्यक्ती ?
ओलांडलंत कधी ते मौनाच्या उंबरठ्याच्या आतील शब्दांनी भरून वाहिलेलं माप?
एका स्त्रीचं स्वतःच्या समस्त जीवनाला सक्तीनं व्यापणं
अगदी थोडक्यात तरी सांगू शकता का तुम्ही?
एका स्त्रीला बाई-माणसाच्या दृष्टीने समजणं व्यक्ती म्हणून मान्यता देणं !
तिची जीवनाची परिभाषा, तिचा कोश, प्रत्यक्षात मात्र नेमकं जगणं?
जर नाही?
तर मग तुम्हाला काय माहिती आहे?
स्वयंपाकघर आणि शयनकक्षाशिवाय
स्त्रीचं माणूसपण आणि बाईमाणूस असणं!
माहितीही नाही आणि असतीलच तर जाणीव नाही ?
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर - October 11, 2024
- आजीच्या आठवणी… - July 28, 2024
- माहित आहे का ! - July 27, 2024
3 thoughts on “माहित आहे का !”
आपलंच आपल्याशी द्वंद्व
सुरू असलेले
वा… स्त्री मनाचे द्वंद्व तुम्ही खूप छान शब्दात मांडले आहे खूप सुंदर….
वा काय लिहिले👌 एकेक शब्द स्त्री मनाला भेदून आत मध्ये जातो
प्रत्येक शब्दामध्ये एवढे सामर्थ्य आहे की मनाच्या तळावर सुद्धा तरंग उठून जातात
या कवितेवर खरंतर कुठलीच प्रतिक्रिया शब्दात देता येत नाही ती फक्त अनुभवायचे असते कवितेच्या वाचनानंतर आपल्या संपूर्ण शरीरातली स्पंदने डोळे मिटून अनुभवयाची असे काहीसे झाले
शब्दांमध्ये एवढे सामर्थ्य आहे की कविता संपूर्ण मूर्त रूपात डोळ्यासमोर उभी राहिली
अतिशय सशक्त लेखणी आहे आपली
👍 Great 🌹
खरं तर कविता वाचून निशब्द….